Breaking News

Monthly Archives: May 2019

पिगोंडे ग्रा.पं.कडून गटारांचे बांधकाम

नागोठणे : प्रतिनिधी Exif_JPEG_420 विभागातील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आणि आंबेघर या दोन गावात गटारे बांधण्याच्या कामाला वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या स्थानिक ग्रामविकास निधीतून हे बांधकाम केले जात आहे. दोन्ही गावांत प्रत्येकी पाचशे मीटर लांबीची गटारे बांधण्यात येणार असून, दोनशे मीटरहून जादा बांधकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण बांधकाम …

Read More »

पोशीर सरपंच, ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

अनधिकृत बांधकामप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा कर्जत : बातमीदार पोशीरमधील अनधिकृत बांधकामावर आदेश मिळूनही कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलेने सरपंच व ग्रामसेवक यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. प्रशासकीय आदेशानंतरही पोशीर ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकामावर कारवाईस नकार दिला आहे. ग्रामपंचायतीच्या या हेकेखोर भुमिकेमुळे हवालदिल झालेल्या तक्रारदार महिलेने अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी …

Read More »

खालापुरात तीन अपघातांत तीन किरकोळ जखमी

खालापुर, खोपोली : प्रतिनिधी  मुंबई-पुणे महामार्गावरील कलोते गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि. 24) सकाळी मोकाट गुरांना वाचविण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुंबई बाजूच्या मार्गिकेवर आडवा झाला. तर त्याच्या धडकेने पुढे जाणारा टेम्पो पलटी झाला. या अपघातात टेम्पो चालक सुधीर दौलत कोकाटे (वय 42, रा. लोणावळा) व आणखी दोन प्रवासी जखमी …

Read More »

भाजपच्या वतीने ठिकठिकाणी विजयी जल्लोष

कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मिळविलेले नेत्रदीपक यश आणि मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयाने हरखून गेलेल्या कर्जत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 23) शहरात नागरिकांना पेढे भरविले. तसेच फटाक्यांची आतषबाजी व ढोलताषांच्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. …

Read More »

मोदी पर्व पुन्हा सुरू

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या राजबिंड्या राजपुत्रापेक्षा तळागाळातून परिस्थितीशी झगडत ध्येयनिष्ठेने प्रेरित होऊन स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर देशातील सर्वोच्च सत्तास्थानी विराजमान झालेले मोदी लोकांना अधिक जवळचे, विश्वासपात्र व विसंबून राहण्याजोगे वाटतात. याखेरीज आणखी एका घटकामुळे लोकांना मोदी हाच उत्तम पर्याय आहे असे ठामपणाने वाटते. ती म्हणजे, राजकीय अस्थिरतेची भीती. कोटी …

Read More »

श्रीरंग बारणे यांना मिळालेले मतदान

श्रीरंग बारणे यांचा २ लाख १५ हजार मतांनी दणदणीत विजय 

Read More »

पनवेल तालुक्यात विजयाचा जल्लोष!

पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने सरशी करीत बहुमत मिळविले, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. त्याबद्दल पनवेल भाजपच्या वतीने ढोलताशा, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. भाजप-शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री …

Read More »

‘लोकांच्या मनात मोदींची हवा नाही, तर तुफान होते’

मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014ची निवडणूक जिंकली, मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकारच्या कामावर 2019ची निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही, असे म्हणणार्‍या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते हे या लोकसभा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट …

Read More »

‘लाव रे फटाक्यांची माळ’ उध्दव ठाकरेंचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खिल्ली उडवली. ‘लाव रे व्हिडीओ’ला ‘लाव रे फटाक्यांची माळ’ने उत्तर मिळाले, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई आज घेणार शपथ

नागपूर ः प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. ते शुक्रवारी (दि. 24) शपथग्रहण करणार असून त्यांच्या रूपाने सर्वोच्च न्यायालयातील मराठी न्यायमूर्तींच्या यादीत आणखी एका मराठी न्यायमूर्तीचा समावेश होणार आहे. गवई यांच्यासह हिमाचलचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, झारखंडचे मुख्य न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि …

Read More »