पनवेल : वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची देवाण घेवाण करीत महाराजांचे आचार विचार लहानांपासून थोरांपर्यंत पोहोचविण्यासाठी उभी राहिलेली चळवळ म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरू केलेली राजे प्रतिष्ठान संस्था. या संस्थेच्या पनवेल येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा येत्या 2 जून रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. या …
Read More »Monthly Archives: May 2019
शिवाजीनगर : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री स्वानंद सुखनिवासी श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवाजीनगर येथे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »जेएनपीटी कामगारांचा नियोजित संप स्थगित
उरण : बातमीदार जेएनपीटी व्यवस्थापनाविरोधात जेएनपीटी कामगार संघटनांनी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार संघटनानी दिलेल्या संपाच्या नोटिशीची दखल घेऊन आज जेएनपीटी व्यवस्थापन व पाचही कामगार संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती. त्या वेळी सध्याच्या परिस्थितीतीमध्ये कोणताही बदल न करता कामगार संघटनांशी चर्चा करून नोटिसीमधील मागण्यांवर तडजोड घडवून …
Read More »तळवलीत शेतकर्यांसाठी कृषी खात्यामार्फत शेती कार्यशाळेचे आयोजन
रसायनी : प्रतिनिधी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील तळवली येथील शेतकर्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी कृषी खात्याकडून शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी असल्यामुळे शेतकरी वर्गासाठी कृषी खात्याच्या माध्यमातून गावांमध्ये शेतकर्यांसाठी क्रॉपसॅप योजनेंतर्गत शेतीविषयक माहिती पुरविण्याचे काम कृषी अधिकारी करीत आहेत. खरीप हंगाम सुरू होत असताना शेतकरी …
Read More »पनवेल कार्यालयात विद्युत मीटरचा तुटवडा
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरात नादुरुस्त विद्युत मीटरच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. या नादुरुस्त विद्युत मीटरमुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा विद्युत देयके पाठविली जातात. हे मीटर बदलून मिळावेत, यासाठी अनेक ग्राहकांनी अर्ज केले आहेत; परंतु महावितरणच्या पनवेल कार्यालयात नवीन विद्युत मीटरचा तुटवडा असल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. महावितरणच्या …
Read More »पुनर्वसनाशिवाय शहरात झोपड्यांना हात लावणार नाही ; पालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भूमिका
पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील झोपडपट्ट्यांमधील व्यवसायिकांना नोटिसा देऊन दुकाने रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र झोपडपट्टीतील रहिवाशांचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुनर्वसन केल्याशिवाय एकाही झोपडीला हात लावणार नाही, अशी माहिती बुधवारी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. पनवेल शहरातील झोपडपट्ट्यांना दिलेल्या नोटिशींमुळे सध्या झोपडपट्टी संघटना निवेदने देऊन कारवाईला विरोध …
Read More »देश मोदींच्या पाठिशी
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली आणि अवघ्या दोन तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस पक्षाचा या निवडणुकीत पार धुव्वा उडाल्याची दारुण स्थिती दुपारपासूनच दिसू लागली. देशभरातील जनतेकरिता देशाची अस्मिता, …
Read More »मुंबई-गोवा महामार्गावर दोन अपघात
माणगांव : प्रतिनिधी मुंबई -गोवा महामार्गावर माणगांवजवळ तिलोरे गांवाच्या हद्दीत बुधवारी (दि. 22) रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ईको कारच्या धडकेने पादचारी जखमी झाला. तर गुरुवारी (दि. 23) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गारळ गांवाच्या हद्दीत ट्रेलर व पिकअप जीप यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. तसेच …
Read More »टंचाईग्रस्त कळंब ग्रामपंचायत हद्दीत झिंक अॅल्युमिनियम टाक्यांतून पाण्याची व्यवस्था
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दुर्गम आणि आदिवासी भागात असलेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद पुढे सरसावली आहे. त्यांनी जलस्वराज्य दोनमधून पाण्याच्या टाक्या उभ्या करून पाणीटंचाई भागात कायम स्वरूपी पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. कळंब ग्रामपंचायतीमध्ये तिन ठिकाणी झिंक अल्युमिनियम टाक्या उभ्या करण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी …
Read More »खोपोली शीळफाटा येथे तीन वाहनांना अपघात ; एकाचा जागीच मृत्यू, तर सहा जण जखमी
खालापुर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील खोपोली शीळफाटा येथे बुधवार (दि. 22) दुपारी मारुती स्विफ्ट, मारुती सियाज व दुचाकी या तीन गाड्यांमध्ये अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार किशोर लांडगे जागेवर मृत्यूमुखी पडले, तर सहाजण जखमी गंभीर जखमी झाले. त्यांना खोपोली येथील रुग्णायलयात दाखल करण्यात आले आहे. स्विफ्ट गाडी (एमएच-01,एइ-5970) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper