नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढली आहे, मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार …
Read More »Monthly Archives: May 2019
हत्या करणारे मारेकरी गजाआड
पुणे ः प्रतिनिधी सावकारी करणार्या अजय जयस्वाल यांची हत्या करणार्या दोघा मारेकर्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. विनायक उर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (28) आणि अविनाश दीपक जाधव (21) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़. पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता़. या गुन्ह्याचा तपास करीत असताना …
Read More »नवज्योतसिंग सिद्धूंचे मंत्रिपद धोक्यात
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर असून त्यात काँग्रेसला मोठे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातील चार मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे …
Read More »मावळच्या निकालासाठी उजाडणार रात्र
पिंपरी ः प्रतिनिधी मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल येण्यासाठी सुमारे 15 तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचा अंतिम निकाल मिळण्यास रात्र उजाडणार आहे. मावळ मतदारसंघातील मतमोजणी …
Read More »सहा राज्यांत भीषण पाणीसंकट
केंद्राने दिल्या खबरदारीच्या सूचना; जलपातळी दिवसेंदिवस होत आहे कमी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात वाढत्या तापमानासोबत भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. देशातील सहा राज्यांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या राज्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाणीसंकट पाहता केंद्र सरकारने या सहा राज्यांसाठी खबरदारीची सूचना जारी केली आहे. …
Read More »पाकिस्तानी बोटीतून तटरक्षक दलाने केले 500 कोटींचे ड्रग्ज जप्त
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तस्करविरोधी ऑपरेशनमध्ये भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी (दि. 21) गुजरातच्या जाखाऊ किनार्याजवळ अमली पदार्थाने भरलेली एक पाकिस्तानी बोट पकडली. ‘अल मदीना’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीत अमली पदार्थांची 194 पाकिटे सापडली असून, त्याची किंमत 500 कोटी रुपयांच्या घरात आहे. हे अमली पदार्थ जाखाऊच्या किनार्यावर पोहचवण्यासाठी …
Read More »निवडणूक निकालांसाठी उजाडणार शुक्रवारची पहाट
मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजणीसाठी हा अतिरिक्त वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी रात्री दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. …
Read More »अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासह 11 जणांची हत्या
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अरुणाचल प्रदेशमध्ये एनएनपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. संशयित छडउछ (नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हात असण्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली. अबो …
Read More »विवाहिता बेपत्ता
पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात असलेली एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याने तिचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. अंशुकुमारी रूपेशकुमार लाल (38, रा. बीटीसी कंपनी, प्लॉट नं. 17/3, तळोजा एमआयडीसी) हिची उंची 5 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक लांब असून तिच्या अंगात हिरव्या रंगाची साडी व …
Read More »वज्रेश्वरी मंदिर दरोडाप्रकरणी पाच जण अटकेत
ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणार्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शहापूर परिसर, दादरा व नगर हवेली येथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून, ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper