Breaking News

Monthly Archives: May 2019

फणसाड अभयारण्यात दोन बिबट्यांसह वन्यजीवांची वाढ

मुरूड ः प्रतिनिधी बुद्धपौर्णिमेच्या मुहूर्तावर फणसाड अभयारण्यातील सर्व वन्यजीवांची प्रगणना करण्यात आली. फणसाड अभयारण्याचे सहाय्य्क वनसंरक्षक बी. बी. बांगर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या   मार्गदर्शनाखाली अभयारण्यातील कर्मचारी याकामी तैनात करण्यात आले होते. प्रगणनेसाठी निसर्गप्रेमी संघटनेतील सदस्यांचीही मदत घेण्यात आली होती. 14 ट्रॅप कॅमेर्‍यांसह तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त करून प्रगणना पूर्ण …

Read More »

हिंसाग्रस्त भागात पुन्हा मतदान घ्या -गोयल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यांतील मतदान 19 मे रोजी संपले आहे. यादरम्यान मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बर्‍याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. याविषयी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली होती. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाणप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या …

Read More »

महामार्गावरील अतिक्रमण हटविण्यापूर्वी रहिवाशांचे पुनर्वसन करा ; नगरसेविका दर्शना भोईर यांची पालिकेकडे मागणी

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेतील रस्ता रूंदीकरण करताना झोपडपट्टीधारकांना  आणि दुकानांना हटवण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. त्यामुळे या बाबीचा गंभीरपणे विचार करून बाधित झोपडपट्टी आणि दुकानांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून मगच अतिक्रमणविषयक कारवाई करावी, अशी विनंती महापालिकेच्या नगरसेविका आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर …

Read More »

महानिर्मितीचे 10 हजार 34 मेगावॅट रेकॉर्डब्रेक वीज उत्पादन

मुंबई ः प्रतिनिधी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून काल 20 मे रोजी दुपारी एक वाजून 28 मिनिटांपर्यंत रेकॉर्डब्रेक म्हणजेच 10034 मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन 7577 मेगावॅट, ज्यात नाशिक 561 मेगावॅट, कोराडी 1500 मेगावॅट, खापरखेडा 951 मेगावॅट, …

Read More »

रायगडमध्ये आठ ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 20 जिल्ह्यांतील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील सहा हजार 719 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहारिया …

Read More »

सोमवार ठरला अपघात वार; 21 ठार, 33 गंभीर जखमी

पनवेल ः प्रतिनिधी रायगड, नाशिक व बुलडाणा जिल्ह्यांत काल घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला असून, 33 जण गंभीर, तर सुमारे 12 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या विविध अपघाताच्या घटनांमुळे रायगड, नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यांत कालचा सोमवार अपघात वार ठरला. या घटनांमुळे अपघातग्रस्त कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. …

Read More »

चावना बंधार्यात डुंबण्याचा मुले घेताहेत आनंद

रसायनी : सध्या पुन्हा एकदा सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या काहिलीमुळे जीव अगदी नकोसा झालेला असताना आणि शाळांना पडलेल्या सुटीमुळे पाताळगंगा नदीवरील चावना बंधार्‍यात मनसोक्तपणे डुंबण्याचा आनंद घेणारी मुले. 

Read More »

चांभार्ली-मोहोपाडा रस्त्यावर गतिरोधक बसवा

रसायनी : प्रतिनिधी दांड रसायनी रस्त्यावरील चांभार्लीचा उतार हा जीवघेणा असून या रस्त्यावरून प्रवास करताना अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. या रस्त्याच्या  उतारालगत दुकाने, कार्यालये आहेत. येथे नागरिकांची नेहमी रहदारी असते. शिवाय रस्त्यालगत शिवनगर वसाहत, एमआयडीसी वसाहत, जय प्रेसिजन कंपनी, एनआयएसएम सेबी प्रकल्प, शिशूविकास बालमंदिर, जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, …

Read More »

आकुर्ली येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त साप्ताहिक स्टार पनवेलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायत आकुर्ली व साप्ताहिक स्टार पनवेलच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व रक्तगट, शुगर तपासणी, तसेच सर्वोपचार शिबिराचे आयोजन आकुर्ली येथील राजीप शाळा येथे करण्यात आले होते. या शिबिरात कळंबोली येथील एमजीएम हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. या …

Read More »

कळंबुसरे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत; ग्रामस्थांची मागणी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील रस्त्यावर मागील चार-पाच वर्षात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून, प्रवासी वाहतूक व अन्य वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने या गंभीर समस्येची तत्काळ दखल घेऊन या कळंबुसरे गावातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची मागणी या …

Read More »