Monthly Archives: May 2019

विराट आणि रोहितला सौरवचं रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधलं सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या बघता इथली परिस्थिती बॅट्समनना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या अशाच राहिल्या, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सौरव गांगुलीचं 20 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. प्रत्येक चार वर्षांनंतर होणार्‍या क्रिकेट …

Read More »

अमेरिकेची इराणला धमकी

नवी दिल्ली ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इराणला नष्ट करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करू. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका, असे ट्रम्प यांनी खडसावले आहे. …

Read More »

पेन्शनर्सच बँकेला देणार जिवंत असल्याचा ऑनलाइन पुरावा

मुंबई ः प्रतिनिधी पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी पोर्टल सुरू करून याबाबतची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही …

Read More »

बँक ऑफ बडोदाच्या शेकडो शाखा होणार बंद?

मुंबई ः प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे. देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे 1 एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात …

Read More »

महायुती 45 जागा जिंकणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजी मारून केंद्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता जनतेला आहे. त्यातच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवलेले अंदाज एनडीएसाठी विशेषत: भारतीय जनता पार्टीसाठी सुखावणारे आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युती 45 जागा …

Read More »

सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला; एक्झिट पोल इफेक्ट

मुंबई ः प्रतिनिधी रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. काल सकाळी मार्केटने 900 अंकांनी उसळी घेतली, तर निफ्टीही 200 अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही 69 पैशांनी मजबूत झाला आहे. लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये  रविवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी …

Read More »

पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पाच महिन्यांत 1337 जणांना मदतीचा हात; प्रोत्साहन देण्याची गरज पुणे ः प्रतिनिधी रस्त्यात आढळलेल्या 70 वर्षांच्या जखमी अवस्थेतील मनोरुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे, रिक्षात हरविलेली बॅग दागिन्यांसह महिलेच्या स्वाधीन करणे, मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने घर सोडून गेलेल्या तरुणीला शोधून पालकांच्या ताब्यात देणे, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला जीवदान अशा एक ना …

Read More »

पक्षी-प्राणी गणनेसाठी कर्नाळा अभयारण्यात ट्रॅक कॅमेरे

पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा अभयारण्यातील पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी वन्यजीव विभागामार्फत शनिवारी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी अभयारण्यातील विविध भागात ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले होते. दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यजीव विभागामार्फत पक्षी-प्राण्यांची गणना करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो. पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी …

Read More »

मुरूडमध्ये पर्यटकांची अलोट गर्दी; समुद्रकिनारे गजबजले

मुरूड-जंजिरा ः प्रतिनिधी शनिवारी बुद्धपौर्णिमेची आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी साधून हजारो पर्यटक मुरूड, काशीद समुद्रकिनारी येऊन धडकले आहेत. शनिवारपासूनच पर्यटकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली होती. पर्यटकांनी स्वतःच्या चारचाकी गाड्या घेऊन येणे अधिक पसंत केले. त्यामुळे मुरूडच्या समुद्रकिनारी असणार्‍या लॉजेसभोवती गाड्यांची गर्दी दिसून आली. मुरूडसह काशीद समुद्रकिनाराही शेकडो पर्यटकांनी …

Read More »

देवाकडे मी कधी काही मागत नाही ; 18 तासांच्या ध्यानधारणेनंतर मोदी यांची प्रतिक्रिया

रुद्रप्रयाग ः वृत्तसंस्था निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.19) सकाळी मीडियाशी संवाद साधला. जवळपास 17 ते 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदी यांनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बर्‍याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असे या वेळी मोदी …

Read More »