Breaking News

Monthly Archives: May 2019

भारत भ्रमण करणारा आफताब रसायनीत

रसायनी : प्रतिनिधी विविध कारणांनी दीर्घ सायकल प्रवास करणारे जगभरात सध्या अंदाजे 1700 सायकलवीर आहेत. यात दिल्लीहून 25 ऑगस्ट 2018 रोजी सायकलवरून भारत भ्रमंतीसाठी निघालेला 23 वर्षीय पदवीधर तरुण आफताब फरीदी 18 मे 2018 रोजी रसायनीतील भटवाडी येथे अक्षर मानव ग्रंथालय अध्यक्ष रोहिदास कवले यांच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याचे स्वागत …

Read More »

बुद्धपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

रसायनी : प्रतिनिधी बुद्धपौणिमा मानवतेचे ज्ञान पुष्प मानवतेच्या झाडावर फुललेले हे पुष्प जे अपरिमित वर्षानंतर एकदाच उमलते. सम्यक सामाजिक संस्था व सम्यक महिला मंडळ यांच्या वतीने रसायनीत शनिवार (दि. 18) रात्रीपर्यंत भीम महोत्सव रिस-कांबा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सम्यक सामाजिक …

Read More »

लोखंडी गेट पडून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

पनवेल : बातमीदार कळंबोलीतील स्टील मार्केटमधील बल रोडलाइन्स कंपनीत काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर कंपनीचा मोठा वजनदार लोखंडी गेट पडल्याने या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कंपनीच्या वतीने लोखंडी गेटची डागडुजी न केल्यामुळे, तसेच त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील कुठल्याच प्रकारची उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. …

Read More »

मोहोपाडा ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर निलंबित

रसायनी : प्रतिनिधी रसायनी व आसपासच्या परिसरातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणार्‍या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन करण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यावर प्रशासकीय अधिकार्‍यांना त्यांच्या प्रभागात आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश …

Read More »

पोलीस ठाण्यासमोरच महिलांची हाणामारी; तीन महिलांविरोधात गुन्हा

पनवेल : वार्ताहर कळंबोली पोलीस ठाण्यासमोरच तीन महिलांमध्ये एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच हाणामारी करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी या महिलांविरोधात सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तीनही महिला कळंबोली जाधववाडी या परिसरातील आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यासमोरील रोडवर एकमेकींना शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यास या महिलांनी सुरुवात केली. …

Read More »

चावणे, जांभिवली, कराडे बुद्रुक येथे जूनमध्ये ग्रामपंचायत निवडणूक

रसायनी : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा मतदार पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून, 20 मे रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जूनमध्ये जाहीर केला जाणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी जून अखेरपर्यंत मतदान होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे. जुलै, सप्टेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या व …

Read More »

कामोठे बसथांब्याचे स्थलांतर व्हावे

सिटीझन्स युनिटी फोरमची मागणी; रखडलेले डावे वळणाचे काम पूर्ण पनवेल : बातमीदार कामोठ्यातील बाहेर पडून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या पनवेल-सायन मार्गावरील काम पूर्ण झाल्यामुळे कळंबोली आणि कामोठे वसाहतीच्या मधे असलेला थांबा कामोठ्याच्या पुलाजवळ नेण्यात यावा, अशी मागणी सिटिझन्स युनिटी फोरमच्या कामोठे शाखेने केली आहे. अनेक वर्षे रखडलेले कामोठ्याचे डावे वळण पूर्ण …

Read More »

एसटीच्या पेण स्थानकाची दुरवस्था

जलवाहिनी फुटली, पिण्याच्या पाण्याची गैरसोय पेण : अनिस मनियार राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या पेण स्थानकामागचे शुक्लकाष्ठ सुरूच असून, या स्थानकामध्ये प्रवाशांना कोणतीच सोयीसुविधा राहिली नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जलवाहिनी फुटून पाणी वाया जात असून, पाणी साठवण टाकी मात्र कोरडी झाली आहे. त्यामुळे या स्थानकांत प्रवाशांना पाण्यापासून वंचित राहावे …

Read More »

महाड न.प.ची घरपट्टी वसुली जोरात

मार्च अखेर तीन कोटी एक लाखांचा गल्ला महाड : प्रतिनिधी नगर परिषदेकडे कर्मचारी तुटवडा असतानादेखील महाडमध्ये घरपट्टी वसुली जोमाने सुरु आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत  वसुली विभागाने आपले लक्ष 84 टक्के पूर्ण केले आहे. आतापर्यंत सुमारे तीन कोटी एक लाख रुपये घरपट्टी वसुली करण्यात आली आहे. घरपट्टी वसुल करणे, हे तसे …

Read More »

नेरळमध्ये नालेसफाईची कामे वेगात

कर्जत : बातमीदार नेरळ गावातील नालेसफाई पावसाळ्यापूर्वी करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासनाने सुरू केला आहे. नेरळ गावात 10 किलोमीटरचे मुख्य नाले असून, 12 किलोमीटरचे उपनाले आहेत. पावसाळा डोळ्यासमोर ठेवून त्यांची साफसफाई करण्यास नेरळ ग्रामपंचायतीने सुरुवात केली. नेरळ ग्रामपंचायत दरवर्षी गावातील मुख्य नाले आणि बाजारपेठ भागातील लहान नाल्यांची साफसफाई करीत असते. नेरळ …

Read More »