मुरूड : येथील आगरदांडा परिसरातील नारळाच्या बागांना लागून असलेला निळाशार समुद्र आणि निळ्या आकाशातील शुभ्र ढग टिपले आहेत सुधीर नाझरे यांनी.
Read More »Monthly Archives: May 2019
सिडको क्षेत्रात 20 टक्के पाणी कपात जाहीर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेत खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील सिडको वसाहतीत सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत भासत असलेला पाण्याचा तुटवडा व वितरण व्यवस्था लक्षात घेता सिडको अधिकार क्षेत्रातील या भागांमध्ये पाणीपुरवठ्यात 18 मे पासून 20 टक्के पाणी कपात जाहीर करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या काळात सिडको अधिकार क्षेत्रातील रहिवाशांनी …
Read More »खारघर येथे संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी
पनवेल : वार्ताहर खारघर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची 363वी जयंती शंभुराजे मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. सकाळी 8 वाजता शंभूराजे मित्र मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी सीबीडी बेलापूरच्या किल्ल्यावरून शिवज्योत प्रज्वलित करून धावत आणली व उत्कर्ष हॉलमध्ये विधिपूर्वक पूजन करून ज्योतीची प्रतिष्ठापना केली. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन …
Read More »पनवेलमधील चायनिज गाड्यांवर कारवाईची मागणी
पनवेल : वार्ताहर पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या चायनिज गाड्यांचा व्यवसाय सुरू असून, या गाड्यांवर खाद्य विक्रीपेक्षा मद्यपान करणारेच ग्राहक जास्ती असतात. यातूनच वादावादीचे प्रकार घडत असल्याने अशा प्रकारच्या गाड्यांवर पनवेल महानगरपालिका, तसेच संबंधित पोलीस ठाण्याने कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. पनवेल शहरातील मुख्य रस्त्यावर, तसेच …
Read More »उन्हाळी सुट्ट्यांमुळे बेकायदा वाहतुकीचे पेव
आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष पनवेल : वार्ताहर शाळांना सुट्या लागल्याने शहरातील नागरिक गावी जाण्यासाठी बस थांब्यांवर गर्दी करीत आहेत. एसटी बसला गर्दी असल्याने बेकायदा वाहतूक करणारे वाहतूकदार या गर्दीचा गैरफायदा घेत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची जादा आर्थिक लूट देखील होत असून …
Read More »बेकायदेशीर लॅबोरेटरीजवर कारवाई करा
नवी मुंबई, पनवेल महापालिका आयुक्तांकडे मागणी पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आणि पनवेल भागातील अनेक पॅथॉलॉजी लॅबचालक महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेकडे नोंदणीकृत नसणार्या व्यक्ती व मान्यताप्राप्त पॅथॉलॉजीस्टची नियुक्ती न करता पॅथॉलॉजी लॅब चालवून दररोज हजारो रुग्णांची आर्थिक लूट करत आहेत. त्यामुळे महापालिकेने अशा पॅथॉलॉजी लॅबचे आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण करून अवैधरीत्या चालणार्या …
Read More »आयसीसी कॉमेंटेटरच्या यादीत दोन मराठी चेहरे
दुबई : वृत्तसंस्था वर्ल्ड कप स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. आयसीसी देखील वर्ल्ड कपसाठीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करत आहे. कॉमेंटेटरमुळे सामन्यात आणखी रंगत येते. वर्ल्डकपसाठी आयसीसीने एकूण 24 कॉमेंटेटरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विविध देशातील माजी खेळाडूंना तसेच कॉमेंटेटरना संधी देण्यात आली आहे. भारताकडून एकूण तीन कॉमेंटेटरची निवड …
Read More »डिव्हिलियर्स 2023चा वर्ल्ड कप खेळणार; पण…!
मुंबई : प्रतिनिधी आपल्या 360 डिग्री फटकेबाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना चक्रावून टाकणार्या एबी डिव्हिलियर्सला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना कोणाला पाहायला आवडणार नाही? दक्षिण आफ्रिकेच्या या स्फोटक फलंदाजाने गतवर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तीन वन डे वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना डिव्हिलियर्सने आपला दबदबा दाखवून दिला. 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेत …
Read More »भारतीय खेळाडूची बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी निवड
मुंबई : प्रतिनिधी बांगलादेशच्या बॅटिंग सल्लागारपदी भारतीय क्रिकेटपटूची निवड झाली आहे. वसीम जाफरची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मिरपूरमधल्या आपल्या अॅकेडमीमध्ये बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने गुरुवारी ही माहिती दिली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी कैसर अहमद म्हणाले, ‘जाफरशी मिरपूरमध्ये बीसीबी अॅकेडमीचा बॅटिंग सल्लागार म्हणून मेपासून …
Read More »केदार जाधव फिट!
मुंबई : प्रतिनिधी वर्ल्डकपच्या 12 दिवसाआधी टीम इंडियासाठी एक खूशखबरी आहे. आयपीएलमध्ये दुखापत झालेला भारतीय खेळाडू केदार जाधव आता फिट झाला आहे. टीम इंडियासोबत 22 मेला तो लंडनला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये दुखापत झाल्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत शंका होती. त्यामुळे चौथ्या जागी कोणत्या खेळाडूला खेळवायचं याचा देखील प्रश्न उपस्थित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper