Monthly Archives: May 2019

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सगुणाबागेच्या प्रेमात…

सर्व प्रकल्पांची घेतली माहिती कर्जत : बातमीदार : देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या कर्जत तालुक्यातील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी भेट दिली आणि ते सगुणाबागेच्या प्रेमातच पडले. सगुणाबागेत पूर्ण दिवस थांबून कुलगुरूंनी तेथे सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.दरम्यान, सगुणाबागेत सुरू असलेली …

Read More »

पेण नगर परिषद नालेसफाईच्या कामात व्यस्त

पेण : प्रतिनिधी : मान्सुनपूर्व नाले व गटारे सफाईचे काम हाती घेण्यात आले असून, शहरातील 18 पैकी 10 नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाईचे काम येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली. शहरांतील मान्सुनपूर्व नालेसफाईबाबतचा अहवाल शासनाने 31 मेपर्यंत मागविला …

Read More »

मत्स्यव्यवसाय कार्यालये एकाच छताखाली

अलिबागमध्ये नवीन संकुलाचे काम सुरू अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग कोळीवाडा येथे असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी प्रशासकीय इमारत मोडकळीस आल्यामुळे या इमारतीत असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची सर्व कार्यालये इतरत्र हलविण्यात आली आहेत. येथे पुन्हा नवी इमारत बांधाण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सर्व कार्यालये पुन्हा एका छताखाली येणार आहेत. मत्स्यव्यवसाय …

Read More »

कांगोरीगडावर पर्यटनपूरक विकासकामांचा अभाव

महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा …

Read More »

पनवेलमध्ये ‘अक्षर मानव’तर्फे संगीत मैफल

पनवेल : बातमीदार पनवेल येथे अक्षर मानवचे राज्य संगीत विभाग प्रमुख वेदांग धाराशीवे यांची संगीत मैफल रविवार (दि. 12) सिडको गार्डन, सेक्टर 11, नवीन पनवेल येथे रंगली. सिडको बगीच्यातल्या खुल्या रंगमंचावर वेदांग धाराशीवे यांनी राग यमनमधली बंदीश सादर केली. या वेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले. त्यांनी तराणा, जोग या रागातल्या बंदिश …

Read More »

बळीराजाला आधार हवा

राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह रूप धारण करत चाललेली असतानाच, स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवसांनी लांबणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भीषण पाणीटंचाईच्या तोंडावर पावसाचा तीन-चार दिवसांचा विलंबही अडचणींमध्ये प्रचंड भर टाकणारा भासतो. एकंदर परिस्थिती चिंतेत भर टाकणारी असताना शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातली आकडेवारी मात्र निश्चितपणे धीर …

Read More »

चिरनेर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेर-भोम-कळंबुसरे, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 14) उरण तालुक्यातील श्री दत्त मंदिर, चिरनेर-कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती व श्री सत्यनारायणाची पूजा मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी रात्री शिवसंत, प्रसिद्ध व्याख्याते मिलिंद एकबोटे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. …

Read More »

रसायनी येथे उन्हाळी बालसंस्कार शिबिर

रसायनी : प्रतिनिधी जी कॅम्प अबॅकस या संस्थेच्या वतीने उन्हाळी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दोन दिवस विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मोफत मार्गदर्शंन करण्यात आले. जी कॅम्प अबॅकस संस्थेचे संचालक श्रीकांत देवकर व तृप्ती पाटील याच्या माध्यमातून हे उन्हाळी शिबिर उत्साहात झाले. या उन्हाळी बालसंस्कार शिबिरात बाल कलाकार …

Read More »

आनंददायी जीवन जगण्यासाठी फेस्ट शिबिर

रसायनी : प्रतिनिधी  हार्टफुलनेस वेलनेस फेस्ट या तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात हजारो नागरिकांनी ध्यानाच्या आणि स्वास्थकर व्यायामाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष भाग घेतला. या वेळी रायगड, पनवेल, नवी मुंबईसह कल्याण, घाटकोपर, टिटवाळा आदी ठिकाणाहून आलेल्या नागरिकांनी  सहभाग घेऊन सराव केला. या वेळी झुम्बा आणि पॉवर योग सत्रांतून …

Read More »

रिक्षाचालकांमध्ये हद्दवाद

पनवेल : बातमीदार मागेल त्याला रिक्षा परवाना देण्याचा नियम लागू झाल्यापासून शहरात रिक्षांची संख्या वाढली आहे. त्यापाठोपाठ रिक्षा संघटनाही वाढल्या आहेत. रिक्षा संघटनांची आपापले रिक्षा थांबे उभारून हद्दी निश्चित केल्या आहेत. त्यामुळे एका संघटनेच्या थांब्यावरील रिक्षाचालक दुसर्‍या रिक्षा संघटनेच्या चालकाला आपल्या थांब्यावर थांबू देत नाहीत, अशी स्थिती नवी मुंबई, पनवेल …

Read More »