Breaking News

Monthly Archives: May 2019

झोपडपट्टीतील व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याच्या नोटिसा

घराचे रूपांतर दुकानांमध्ये करून सुरू आहे व्यवसाय पनवेल : बातमीदार झोपडपट्ट्यांमध्ये राहणार्‍या काही रहिवाशांनी जागेचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या पनवेलमधील झोपडपट्ट्यांमध्ये घरांचे रूपांतर दुकानांमध्ये करून व्यवसायाच्या माध्यमातून पैसे कमावले जात आहेत. महापालिकेने झोपडपट्ट्यांमधील या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे ठरविले असून नोटीस बजावून बांधकाम पाडण्याचे सूचित करण्यात …

Read More »

भिवपुरी रोड स्थानकातील पादचारी पुलाचे काम स्थगित

कर्जत : बातमीदार मध्यरेल्वेच्या  भिवपुरी रोड (ता. कर्जत) रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम गेल्या काही दिवसापासून बंद आहे. या पादचारी पुलासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने आतापर्यंत दोनवेळा  मेगा ब्लॉक घेतला होता. दरम्यान, पादचारी पुलाचे काम रखडल्याने प्रवाशांना रूळ ओलांडून जावे लागत आहेत.   भिवपुरी रोड स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी हे मुंबई आणि …

Read More »

गुहागर-बोरीवली एसटी बस कलंडली

पोलादपूर : प्रतिनिधी राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या गुहागर आगाराची गुहागर ते बोरीवली एसटी बस बुधवारी (दि.15) सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर शहरातील कमानीजवळील रस्त्यालगतच्या चरात कलंडली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, पोलादपूर शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ खणलेल्या चरांमुळे महामार्गाची साईडपट्टी अरूंद …

Read More »

कुंडलिका नदी प्रदुषणाच्या विळख्यात

कोळी समाज संघाचा आंदोलनाचा पवित्रा, तहसिलदारांना दिले निवेदन रोहे ः प्रतिनिधी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील रसायनयुक्त सांडपाणी येत असल्याने कुंडलिका नदी प्रदुषित होत आहे. यामुळे नदीतील जलचर मृत्यूमुखी पडत असून, त्याची पैदास कमी होत आहे. मागच्या आठवड्यात कुंडलिका नदी पात्रातील मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे या नदीत मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या  उदरनिर्वाहाचा …

Read More »

नागोठणेत नालेसफाईच्या कामास प्रारंभ

Exif_JPEG_420 नागोठणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे काही अंशी उशिरा चालू झालेल्या नागोठणेतील पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामाला सोमवार (दि. 13) पासून प्रारंभ झाला असल्याची माहिती सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी दिली. नागोठणे शहरात ज्या ज्या ठिकाणी नाले आहेत, अशा सर्व नाल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधित काम वेगाने …

Read More »

कॉलिस आणि मोटारसायकलची ठोकर

मुरुड : मोटारसायकल आणि कॉलिस कारची भालगाव (ता. मुरुड) या गावाजवळ समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार आणि त्याचा सहप्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. भालगांव येथील सुरज घाडगे हे आपल्या मालकीच्या मोटारसायकल (एमएच-04, ईआर-9464)वरून कविता शेलार यांना घेऊन आगरदांडाकडे जात होते. त्याचवेळी नांदला …

Read More »

घनकचरा प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर

पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांचा पत्रकार परिषदेत दावा पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे कामकाज  प्रगतीपथावर असून, ते नियमानुसार सुरू आहे. शासनाच्या आदेशानुसारच या कामाचा ठेका देण्यात आला असून, आजपर्यंत संबंधित ठेकेदाराला ठेक्याची रक्कम अदा करण्यात आलेली नाही, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे …

Read More »

इंग्लंडच्या मैदानांवरील भारताची कामगिरी

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या हा महाकुंभात भारताच्या 9 मॅच 6 मैदानांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एजबॅस्टनचाही समावेश आहे. एजबॅस्टनच्या मैदानातलं भारतीय टीमचं रेकॉर्ड शानदार राहिलं आहे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या 10 मॅचपैकी 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये …

Read More »

जीएस लक्ष्मी आयसीसीच्या पहिल्या मॅच रेफ्री

दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वामध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवरची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. आयसीसीच्या या पॅनलमध्ये भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा समावेश झाला आहे. जीएस लक्ष्मी या आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला आहेत. 51 वर्षांच्या जीएस लक्ष्मी आतापर्यंत …

Read More »

‘रोहितशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही’

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आयपीएल संपल्यामुळे भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनने आतापर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारताला ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या मागच्या दोन महिन्यांमध्ये …

Read More »