पनवेल ः प्रतिनिधी कडाक्याचे तापमान, असह्य उकाडा, तीव्र पाणीटंचाईने सर्वत्र हाहाकार माजवला असतानाही तालुक्यात सर्वत्र लगीनसराईचा धूमधडाका सुरूच आहे. यामुळे पाणीटंचाई आणि उकाड्यातही वधूवर पित्यांना आपल्या मुलामुलींचे विवाह पार पाडण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे. यंदा पाणीटंचाई व तापमानाने सर्व उच्चांक मोडले आहेत. पनवेलमधील तापमान जवळपास 40 अंशांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे …
Read More »Monthly Archives: May 2019
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा
खारघर : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने सामाजिक दृष्टिकोनातून खारघर सेक्टर 4 मधील निरामय हॉस्पिटल व सेक्टर 12 मधील संजीवनी हॉस्पिटल येथे परिचरिकांचा मिठाई व गुलाबपुष्प देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित प्रभाग समिती (अ) सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक रामजी गेला बेरा, खारघर सरचिटणीस दीपक …
Read More »लॅबचालकासह बोगस एमडी पॅथॉलॉजिस्टला अटक
पनवेल : वार्ताहर एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर नसलेल्या व्यक्तीच्या नावाने रुग्णांच्या रक्त व इतर तपासण्या करून त्याबाबतचे रिपोर्ट देणार्या नवीन पनवेलमधील सिद्धकला कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅबवर खांदेश्वर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लॅबचालक आणि बोगस एमडी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर या दोघांना अटक केली. गत मार्च महिन्यामध्ये पोलिसांनी सदर लॅबवर कारवाई केली होती. …
Read More »शिवाजी चौैकातील तुंबलेल्या नाल्याची तत्काळ दुरुस्ती ; नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न
पनवेल : वार्ताहर शहरातील शिवाजी चौक ते आदर्श नाका परिसरात कोपर्यावर असलेला छोटा नाला तुंबला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून घाणीचे पाणी रस्त्यावर वाहत होते. ही बाब पनवेलमधील नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी तातडीने खाजगी कामगार लावून ही समस्या निकाली काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून …
Read More »मुंबईचा विजयाचा ‘चौकार’
हैदराबाद : वृत्तसंस्था आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 …
Read More »सभापती संजय भोपी यांनी पदभार स्वीकारला ; महापौरांसह नगरसेवकांची उपस्थिती
कळंबोली : प्रतिनिधी संजय भोपी यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती(ब)च्या सभापतिपदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. कळंबोली येथील प्रभाग समितीच्या कार्यालयात महापौर डॉ. कविता चौतमाल यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळते सभापती एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते भोपी यांनी पदग्रहण केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेविका सीताताई सदानंद पाटील, विद्याताई गायकवाड, राजेश्री वावेकर, नगरसेवक समीर ठाकूर, …
Read More »मानवतेच्या पुजार्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
शांती, क्षमा, दयाशील, पवित्र आणि सत्वशील, अंतरशुद्ध, ज्ञानशील, ईश्वरी पुरुष या प्रत्येक शब्दाशी तंतोतंत जुळणारे विनम्रशील व्यक्तिमत्त्व म्हणजे पद्मश्री डॉ. दत्तात्रय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी. 14 मे हा आप्पासाहेबांचा जन्मदिन. समाजप्रेमाची, भक्ती सामर्थ्याची गंगा ज्यांच्या अंगणात अवतरली आणि ज्यांच्या निस्सिम कर्तृत्वाचा नंदादीप चंद्र-सूर्य असेपर्यंत सातासमुद्रापार प्रज्वलित राहील असा करुणेचा महामेरू, …
Read More »मी, ते राज ठाकरे पाहिले….. आणि आज हे !!
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशात आणि मुंबई प्रांतावर कॉग्रेसच सरकार होत. मुंबई सह महाराष्ट्र आणि सौराष्ट्र अस हे मुंबई इलाक्याच नाव होत. मराठीची गळचेपी आणि संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन पेटल तेच मुळात त्यावेळच्या कॉग्रेस सत्तेच्या विरोधात. हे आंदोलन दडपण्याचा आणि ठेचुन काढण्याचा सर्वोतोपरी प्रतत्न मोरारजी देसाई आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी …
Read More »दुष्काळापाठोपाठ भाववाढ?
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कार्यकाळात शेतीमालाचे भाव बर्यापैकी आटोक्यातच राहिले आहेत. विशेषत: सप्टेंबर 2016 पासून मार्च 2019पर्यंत यात फार मोठी भाववाढ न दिसल्याचे या विषयातील जाणकार नमूद करतात. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. या मतदानासोबत लोकसभेच्या 543पैकी जवळपास 89 टक्के मतदारसंघातील मतदान पूर्ण …
Read More »तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान आणि रोजगारासाठी सरसावले पुणे पोलीस
पुणे ः प्रतिनिधी तृतीयपंथीयांशी संवाद साधण्यासही आपल्याकडे कोणी धजावत नाही़. ते रस्त्यावरून जाऊ लागले तर बाजूला होऊन त्यांच्यापासून दूर जाणेच सर्व जण हिताचे समजतात़. अशा वेळी त्यांना नोकरीवर ठेवणे हे अवघडच. त्यामुळे त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे, एखादा व्यवसाय करता यावा यासाठी पुणे पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला असून शहरातील तृतीयपंथीयांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper