मुंबई : प्रतिनिधी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेध सर्वांनाच लागलेले असताना आयपीएलची जादू काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. मुंबईच्या संघाने यंदाच्या आयपीएल 2019च्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. तोच धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानात येणार्या चेन्नईच्या संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. गुणांच्या आकडेवारीची ही गणितं सोडवली जात असतानाच अभिनेत्री …
Read More »Monthly Archives: May 2019
पंच नायजेल लोंग यांना हटविणार नाही -बीसीसीआय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाजावर काढला होता. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असली, तरी अंतिम सामन्यातून त्यांना हटविणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. विराट व लोंग यांचा मैदानावर वाद झाला होता. सामन्यादरम्यानच्या विश्रांतीवेळी लोंग यांनी रागाच्या …
Read More »मुंबईची फायनलमध्ये धडक
चेन्नई : वृत्तसंस्था चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात विजय मिळवत मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. या विजयासह मुंबईने फायनलमध्ये धडक मारली आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुबंईपुढे 132 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर हे आव्हान लीलया पार केले आणि सामना सहा गडी राखून जिंकला चेन्नईच्या 132 धावांच्या …
Read More »मिनीट्रेनचे इंजिन पुन्हा पडले बंद
पर्यटकांचा अर्धा तास खोळंबा कर्जत : बातमीदार सध्या माथेरानला जाणार्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र तेथील मिनिट्रेनचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी (दि. 8) सकाळी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिनमध्येच बंद पडले आणि प्रवाशी पर्यटकांचा खोळंबा झाला. माथेरानला मिनीट्रेनमधून जाण्यासाठी सकाळपासूनच पर्यटक नेरळ येथे येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता मिनिट्रेनच्या दिवसभरात केवळ …
Read More »शाळेला जातो आम्ही…
जिल्ह्यात दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके अलिबाग : प्रतिनिधी सर्वशिक्षा अभियानातंर्गत सरकारतर्फे रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. ही पुस्तक शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे 16 जून रोजी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. सर्व शिक्षा अभियानातंर्गत जिल्हा परिषद, …
Read More »दुष्काळात फळबागा जगवताना…
फळबाग लागवडीतून शेतकर्यांना हमखास उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये फळबाग लागवडीकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. फळझाडांची वाढ नीट होण्यासाठी योग्य पाणीव्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक ठरतो. तथापि, अलीकडील काळात पाणीटंचाई, दुष्काळासारख्या समस्येमुळे फळशेतीचे नुकसान होत आहे. तथापि, या काळात फळझाडांना ठिबक सिंचन, मडके सिंचन यांचा वापर करून पाणी …
Read More »डॉल्फिनना जपायला हवे
कोकण किनारपट्टीवरील जलचरांचे जीवनचक्र तसेच त्यांच्या नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्तींबद्दल अधिक माहिती मिळण्याची गरज आहे. यासंदर्भातील विशेष अभ्यासाला राज्यसरकारने यापूर्वीच हिरवा कंदिल दाखवला असून मृत मासे किनार्यावर वाहून येण्यामागचे कारण समजण्यास त्यामुळे मदत होईल. मुंबईसह अवघ्या कोकण किनारपट्टीवरील प्रदूषणाचे परिणाम या अभ्यासातून पुढे येऊ शकतील. डॉल्फिनच्या दर्शनासाठी कोकण किनारपट्टीला भेट देण्याबाबत देशभरातील …
Read More »माथेरानमध्ये शिवजयंती उत्सव उत्साहात
कर्जत : बातमीदार : शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून माथेरानमध्ये मंगळवारी (दि. 7) तिथीनुसार शिवजयंती उत्सव अतिउत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवाचे नियोजन शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी केले होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता माथेरान शहरातील श्रीराम चौकात नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »लग्नसराई व सुट्ट्यामुळे बसेसना तुंडब गर्दी
गर्मीमुळे प्रवाशी होतात हैराण रोहे ः प्रतिनिधी : शाळांच्या सुट्ट्या व लग्नसराई यामुळे सध्या लोकांची धावपळ सुरु असून, एसटी बसेस व अन्य खाजगी प्रवाशी वाहनांना तुंडब गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्याच्या पाहिल्याच आठवडयात सर्वत्र प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, वाढत्या उकड्याने सर्वच हैराण होत असून, घामाने …
Read More »कर्जत मोग्रजमध्ये टंचाई…
पाणी पुरवठ्यासाठी सरपंच, सदस्य सरसावले;स्वखर्चाने ट्रँकर सुरू कर्जत : बातमीदार : तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतहद्दीत तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकार्यांनी स्वखर्चाने ट्रँकर सुरू केले आहेत. कर्जत तालुक्यातील मोग्रज भागात असलेल्या मेचकरवाडी, जांभूळवाडी, मोग्रज वाडी, आनंदवाडी, मालेगाव, जाधववाडी, आनंदवाडी या आदिवासी वाड्यात आणि मोग्रज, धामणी, पिंगळस, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper