खारघर : येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा सीबीएससीचा निकाल 100 टक्के लागला. खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी शाळेच्या प्राचार्या राज अलोनी आणि सहकारी शिक्षकांचे अभिनंदन केले.
Read More »Monthly Archives: May 2019
चि. मंगेश आणि चि. अक्षय यांचा विवाह सोहळा
खारघर : सुप्रसिद्ध भजन गायक निवृत्तीबुवा चौधरी यांचे नातू आणि उमेश चौधरी यांचे पुत्र चि. मंगेश आणि चि. अक्षय यांचा विवाह सोहळा सोमवार (दि. 6) रोजी पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून दोन्ही दाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
Read More »मोहोपाडा बाजारपेठेत पाणपोईची सोय
रसायनी : प्रतिनिधी सम्यक सामाजिक संस्थेचे रसायनी विभागाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त मोहोपाडा पोलीस चौकीजवळ पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा परिसरातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी मोहोपाडा बाजारपेठेत येत असतात त्यांना पिण्याचे थंडगार पाणी उपलब्ध व्हावे याकरिता मोफत थंड पाण्याचे जार ठेवून पाणपोई सुरू केली आहे. रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र …
Read More »वाढत्या कंटेनरच्या रांगेमुळे वाहतूक कोंडी
उरण : प्रतिनिधी कोप्रोली परिसरात लागलेली कंटेनर ट्रेलरची रांग कोप्रोली येथील ऑलकार्गो गोदामापर्यंत लागत असल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होत आहे. सायंकाळच्या वेळी कामावरून येणार्या कामगारांना या मुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर गोदाम प्रशासनाचे अधिकारी अधिकाधिक कंटेनर हाताळणीचा व्यवसाय होऊन उत्पन्नात जास्तीत जास्त भर टाकण्याकडे लक्ष केंद्रित करून …
Read More »आणखी किती बळी?
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अधूनमधून जातिपातीच्या विद्वेषातून नवविवाहित जोडप्यांचे बळी जात आहेत, निव्वळ जातिपातीच्या भेदापायी आपल्याच अपत्याची हत्या करण्यापर्यंत संतापदग्ध पालक जात आहेत, हे कसे समजून घ्यावे? नगरमधील ऑनर किलिंगची ताजी घटना असो वा स्वत:च्याच कुटुंबियांविरोधात स्वसंरक्षणासाठी न्यायालयाची दारे ठोठावणार्या नवविवाहितांविषयीच्या बातम्या… हे सारेच विचारात पाडणारे आहे. साडे तीन मुहुर्तांपैकी एक …
Read More »केवाळे, हरिग्राम घाट स्वच्छ
गाढी नदी संवर्धनाचा दुसरा टप्पा यशस्वी पनवेल : बातमीदार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सुरू केलेल्या गाढी नदी स्वच्छतेचा दुसरा टप्पा रविवारी उत्साहात पार पडला. गाढी नदीला लागून असलेल्या हरिग्राम, केवाळे घाट परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. काही स्थानिक नागरिकांनीदेखील या उपक्रमाला प्रतिसाद दिला. पनवेलच्या गाढी नदीला पूर्वीचे प्रदूषणविरहित रूप आणण्यासाठी पनवेल …
Read More »कळंबोलीत बेकायदा प्रवासी वाहतुकीवर कारवाई
पनवेल : बातमीदार मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग जेथून सुरू होतो त्या कळंबोली मॅकडोनाल्ड बसथांब्यावर बेकायदा प्रवासी वाहतूक करणार्या वाहनचालकांना कळंबोली पोलिसांनी दणका दिला. वाहतूक पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा असताना येथील दलालांना कळंबोली पोलिसांनी धडा शिकविल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मुंबईतून बाहेर पडल्यानंतर पुण्याकडून घाटमाथ्यावर जाण्यासाठी कळंबोली मॅकडोनाल्ड बसथांबा प्रसिद्ध आहे. सुटीच्या …
Read More »देशभरात सहा वर्षांत 656 वाघांचा मृत्यू
अवैध शिकारी वाढल्या नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरात 2012 ते 2018 या सहा वर्षांच्या कालावधीत 656 वाघांचा मृत्यू झाला. यापैकी 31.5 टक्के म्हणजेच 207 वाघांचा मृत्यू अवैध शिकार व विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला आहे. ही धक्कादायक माहिती नॅशनल टाइगर कंझर्वेशन अथॉरिटी (एनटीसीए) यांनी जारी केलेल्या आकडेवारीवरून समोर आली आहे. 2014मध्ये …
Read More »डोक्यावरील विगमध्ये लपवले सोने
पुणे ः प्रतिनिधी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या एका व्यक्तीकडून 31 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. पुणे विमानतळावरील कस्टमच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली. शेझाद बाबा मिया मोमीन या व्यक्तीकडून हे सोने जप्त करण्यात आले. एअर इंडियाच्या विमानाने शेझाद बाबा मिया मोमीन पुणे विमानतळावर आला असता कस्टमच्या …
Read More »मतदानादरम्यान हॉटेलमध्ये आढळल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स
बिहार ः वृत्तसंस्था सोमवारी बिहारमध्ये पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना मुझफ्फरपूर येथील एका हॉटेलमध्ये दोन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे हे हॉटेल मतदान केंद्रापासून अगदी जवळच्या अंतरावर होते. हॉटेलमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स सापडल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेक्टर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper