Breaking News

Monthly Archives: May 2019

जिथे सचिन क्रिकेट शिकला त्या मैदानाच्या पॅव्हेलियनला सचिनचंच नाव

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधील वांद्य्राच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला ‘सचिन रमेश तेंडुलकर’ असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे याच मैदानावर सचिन आयुष्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळला होता. हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण असल्याचं सचिनने म्हटलं आहे. सचिनने  एमआयजी क्रिकेट क्लबच्या मैदानावर कॅम्पसाठी आलेल्या लहानग्यांना सचिनने क्रिकेटचे धडे दिले. या …

Read More »

रायगडच्या दिव्यांग खेळाडूची पॅरा कॅनॉईंग अ‍ॅण्ड कयाकिंग स्पर्धेसाठी निवड

नागोठणे : प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅनॉईंग अ‍ॅण्ड कयाकिंग संघटनेचा दिव्यांग खेळाडू देविदास पाटील याची दि. 21 ते 25 मे दरम्यान पोलंड देशातील पोझन येथे होणार्‍या जागतिक आयसीएफ कॅनॉईंग स्प्रिंट वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड झाली आहे. यापूर्वी या खेळाडूंचा कॅम्प दि. 12 ते 21 मे पर्यंत दुनावरसनी नॅशनल ऑलिम्पिक …

Read More »

मुंबईचा सुपरओव्हरमध्ये विजय

गुणतक्त्यात दुसर्‍या स्थानावर मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादमधील सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाले. या सामन्यात मुंबईनं 162 धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने देखील 20 षटकांत 162 धावांचीच मजल मारली. मनीष पांडेनं अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या षटकारानं सनरायझर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना निर्धारित 20 …

Read More »

मायनॉरिटी गर्ल्स शाळेला संगणक कक्षाची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त मायनॉरिटी गर्ल्स शाळा पनवेलला अनेक वर्षापासून संगणक कक्षाची आवश्यकता होती. प्रसिद्ध समाजसेवक नाजीम नालखंडे यांनी पुढाकार घेऊन आपली स्वर्गवासी आई मैमुना हसन नालखंडे यांच्या नावाने स्थापित केलेल्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वखर्चाने संगणक कक्ष बांधून दिला. या संगणक कक्षाचे उद्घाटन कोकण मर्कंटाईल बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांच्या …

Read More »

चेतन डुकरे यांचा वाढदिवस

पनवेल : भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते चेतन डुकरे यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी चेतन डुकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, देवद अध्यक्ष जगदिश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे, …

Read More »

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजला कर्मवीर पुरस्कार जाहीर

गव्हाण कोपर : रयत शिक्षण संस्थेमार्फत उत्कृष्ट विद्यार्थी व शालेय विकासाचे मूल्यमापन करून कर्मवीर पुरस्कार देण्यात येत असतो. त्याअंतर्गत सन 2018-19चा कर्मवीर पुरस्कार गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनिअर कॉलेजला जाहीर झाला आहे. त्याबद्दल रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयातील सर्व …

Read More »

नेरूळमध्ये उद्घाटन होण्याआधीच उद्यानाचा वापर सुरू

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत तयार केलेल्या नेरूळ येथील उद्यानात जोडप्यांचा वावर सुरू झाला आहे. या उद्यानाचे काम सुरू असताना कामगारांसमोरच अश्लील चाळे करण्यात येत आहेत. त्यात भरीस भर म्हणून या उद्यानातील फुलवलेल्या हिरवळीवर नागरिक खुशाल डुलकी काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून उद्यानाचे …

Read More »

पनवेल कल्चरल सेंटरचे तिशीत पदार्पण

पनवेल : बातमीदार पनवेल कल्चरल असोसिएशनचा 29वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाच्या निमित्ताने पनवेल ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पनवेल कल्चरल सेंटरने 29 वर्षे पूर्ण करीत 30व्या वर्षात पदार्पण केले आहे. पनवेल कल्चरल असोसिएशन गेली अनेक वर्षे पनवेल परिसरातील सांस्कृतिक …

Read More »

महाडमधील बगिच्यांची दुरवस्था ऐन सुट्टीच्या काळात बागेतील खेळणी नादुरुस्त, नगर पालिकेचा अनाठायी खर्च

महाड : प्रतिनिधी परीक्षा संपताच महाडमधील मुलांची पावले बगीच्याकडे वळली मात्र बगिच्यांची झालेली दुरवस्था पाहून बच्चेकंपनी चांगलीच नाराज झाली आहे. महाडमध्ये असलेल्या बागांची दुरावस्था झाली आहे. शहरात छत्रपती शिवाजी चौकातील एकमेव बाग सध्या सुरु असते मात्र या बागेतील खेळणी मोडली आहेत. शहरातील इतर बगीचे तर ओस पडले आहेत. विविध ठेक्याच्या …

Read More »

जंगलात पक्षांसाठी पाणवठे, रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनचा उपक्रम

रोहे : प्रतिनिधी उन्हाळ्यात जंगलातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी   रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनच्या वतिने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात्रेत टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या एकत्र  करुन फांउडेशनच्या कार्यकर्त्यानी त्या जंगलात टांगून ठेवल्या आहेत. त्यात पाणी साठवण करण्यात येत असल्याने जंगलातील पक्षांची तहान भागत आहे. या उपक्रमाबद्दल स्वामीराज फांउडेशनचे सर्वत्र कौतुक …

Read More »