Breaking News

Monthly Archives: May 2019

म्हसळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, कुंभारवाड्यातील मुलांना घेतला चावा

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, शुक्रवारी (दि. 3) कुंभारवाडा परिसरांतील योगेश देऊळकर यांच्या घरी आलेल्या अर्जुन, आरोही यांच्यासह छोट्या 2-3 मुलांना कुत्रा चावल्याची घटना घडली. त्यांच्यावर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबरोबरच म्हसळा शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढले …

Read More »

जादूगार अवधूतने नेरळकरांना हसवले…. जयदीप मंडळाच्या कार्यक्रमात जादूचे प्रयोग

कर्जत : बातमीदार नेरळ येथील जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बुधवारी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा केला. रात्री जादूगार अवधूत यांनी जादूचे प्रयोग सादर केले. त्यावेळी शेकडो बालगोपाळ आणि महिलांनी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. नेरळ पूर्वेचा राजा समजल्या जाणार्‍या जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे दिल्याने कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थी आणि पालकांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (दि, 2) रात्री दहा वाजता स्थगित करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत न कळविणार्‍या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, …

Read More »

गाडीने घेतला अचानक पेट; जीवितहानी टळली

पनवेल : वार्ताहर कर्जत-चौक राज्य मार्गावरून मुंबईचे रमेश ताज हे आपल्या कुटुंबासह त्यांच्या फोर इनडोअर गाडीने कर्जतकडे निघाले असताना त्यांची कार एनडी स्टुडिओजवळ आली असता गाडीने अचानक पेट घेतला. या वेळी दैव बलवत्तर म्हणून गाडी चालकाच्या प्रसंगावधानाने गाडीतील सर्वांचे जीव वाचले, परंतु लागलेल्या आगीत गाडी भस्मसात झाली. मुंबईहून निघालेले ताज …

Read More »

अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने ‘गर्जा महाराष्ट्र माझा’

पनवेल : वार्ताहर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अमरदीप बालविकास फाउंडेशनच्या वतीने तळागाळातील कामगारांच्या सन्मानार्थ हास्य, गीत, नृत्य आणि नाट्य यांचा अभूतपूर्व संगम आणि महाराष्ट्राच्या लोककलेवर आधारित ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा कार्यक्रम नुकताच शासकीय अध्यापक महाविद्यालय, पनवेल येथे मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमाची संकल्पना नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष …

Read More »

भाजप कार्यकर्ते अमरजीत सिंग यांचा वाढदिवस

कळंबोली : भाजप कार्यकर्ते अमरजीत सिंग यांचा वाढदिवस गुरुवारी (दि. 2) कळंबोली भाजप कार्यालयात साजरा झाला. या वेळी कळंबोली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

तोतया अधिकार्याकडून 95 हजाराची लूट

पनवेल : वार्ताहर सीआयडी पोलीस असल्याचे सांगून एका भामट्याने मुंबईहून खारघर येथे फर्निचर पहोचविण्यासाठी आलेल्या व्यक्तीजवळची 95 हजाराची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून पलायन केल्याची घटना घडली. खारघर पोलिसांनी या तोतया सीआयडी पोलिसाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार विजयकुमार जैस्वाल (49) हा मुंबईच्या …

Read More »

गाडीच्या धडकेत 70 वर्षीय महिला जखमी

पनवेल : रामप्रहर वृत्त सायन पनवेल हायवेवर एका अज्ञात गाडीच्या धडकेत 70 वर्षीय महिला जखमी झाली असून या महिलेवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकुबाई दत्तु पवार या कोपरा गावात हळदीच्या कार्यक्रमाला निघाल्या होत्या. त्या जाधववाडीसमोरील सायन पनवेल हायवेने रस्ता क्रॉस करून रिक्षा पकडून कोपरा गाव येथे जायचे असल्याने सायन-पनवेल …

Read More »

खाजगी शिकवणी संस्थांना न्याय वागणूक मिळावी

रसायनी : प्रतिनिधी शासनाने घातलेल्या अटी व शर्ती मानण्यास संघटना तयार आहे, पण जाचक अटी नकोत.जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त अधिभार नको. शाळा-महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांबाबत केलेल्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी. आमच्या व्यवसायाला अधिकृतपणे ओळख मिळावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन’तर्फे करण्यात आली. राज्यात आघाडीचे सरकार असताना या संघटनेने सरकारशी चर्चा करून …

Read More »

व्यावसायिकाकडून खंडणी उकळणार्या दोघांना अटक

पनवेल : वार्ताहर खारघर भागात बिल्डिंग मटेरीयल सप्लाय करणार्‍या व्यावसायिकाला त्याचे मटेरीयल सप्लायचे काम बंद करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून अडीच लाख रुपयांची रोख रक्कम आणि आय फोन-10 उकळणार्‍या दोघांना खारघर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नितीन चावला व साकिब खान अशी या दोघांची नावे असून ते दोघे खारघर सेक्टर-36 …

Read More »