Breaking News

Monthly Archives: May 2019

11 पोलिसांचा पदक देऊन सन्मान

पनवेल : बातमीदार महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलानाच्या कार्यक्रमानंतर नवी मुंबई पोलीस दलातील 11 पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे पदक (सन्मानचिन्ह) देऊन सन्मान केला. पोलीस विभागात कर्तव्यावर असताना सन 2018 या वर्षामध्ये उत्तम कामगिरी बजावणार्‍या पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना पोलीस …

Read More »

पनवेलमधील शशांक नाग राज्यात पहिला

पनवेल ः प्रतिनिधी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनीही लक्षणीय यश मिळवले आहे. या परीक्षेत पनवेलमधील शशांक नाग हा विद्यार्थी राज्यातून प्रथम आला. त्याला एकूण 98.8 टक्के गुण मिळाले. सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत हंसिका शुक्ला आणि करिश्मा अरोरा या विद्यार्थिनी देशामधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. …

Read More »

पनवेल पालिकेच्या 1956साली बांधलेल्या शाळेच्या नूतनीकरणाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील महानगरपालिकेच्या 1956मध्ये बांधलेल्या शाळेच्या जागी 8.34 कोटी रुपये खर्चून अद्यावत नवीन इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडण्याच्या कामाला गुरुवारी (दि. 2) सुरुवात करण्यात आली.  सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला …

Read More »

‘पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घ्यावा’

मुंबई ः प्रतिनिधी नक्षली हल्ला, दुष्काळी उपाययोजनांसाठी गुरुवारी (दि. 2) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलविली होती. या वेळी बुधवारी नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 15 जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्पण करण्यात आली, तसेच राज्यातील दुष्काळी स्थितीचा, राज्य सरकारतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीचा …

Read More »

नक्षलवादी हल्ल्याची सखोल चौकशी करणार : मुख्यमंत्री

शहीद जवानांच्या वारसांना सरकारकडून मदत गडचिरोली ः प्रतिनिधी कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटातील शहीद पोलीस जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.   या घटनेची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत संपूर्ण चौकशी केली जाईल आणि शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत वाघोडे संघ विजेता

अलिबाग : प्रतिनिधी आरसीएफ थळतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कामगार स्मृतिचषक आदिवासी कबड्डी स्पर्धेत जयान हनुमान वाघोडे संघाने विजेतेपद पटकावले. सुकेळी रोहा संघ उपविजेता ठरला. जय  सोंडाई प्रसन्न-पाली व काजव्याची वाडी यांनी अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवला. जय  हनुमान-वाघोडे संघाचा दया नाईक याला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. …

Read More »

कामगार दिनानिमित्त कर्मचारी मेळावा आणि कबड्डी स्पर्धा

अलिबाग : रामप्रहर वृत्त 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा रायगडची सर्वसाधारण सभा, कामगार मेळावा आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जनरल अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय अलिबाग येथे कामगार दिनानिमित्त कामगार-कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला. या वेळी संघटनेचे …

Read More »

चेन्नईचा दिल्लीवर ‘सुपर’ विजय

चेन्नई : वृत्तसंस्था धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर 80 धावांनी दमदार विजय मिळवला. दिल्लीने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. चेन्नईच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण सलामीवीर शेन वॉटसनला एकही धाव करता आली नाही, पण त्यानंतर सुरेश रैना आणि फाफ ड्यू प्लेसिस यांनी संघाला सावरले. …

Read More »

नागोठण्याचा वीजपुरवठा शुक्रवारी बंद

नागोठणे : प्रतिनिधी तांत्रिक दुरुस्तीनिमित्त नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा शुक्रवारी (दि. 3) दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, या काळात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले …

Read More »

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात 13 लाख 24 हजाराचा अपहार

तत्कालीन अधिकारी, ठेकेदारविरोधात गुन्हा दाखल अलिबाग : प्रतिनिधी आदिवासींसाठी असलेल्या योजनांमधील 13 लाख 24 हजार 527 रुपयांच्या निधीचा अपहार पेण येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीसाठी गठीत केलेल्या पाच सदस्यीय गायकवाड समितीने केलेल्या चौकशीत हा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार दोषींवर गुन्हा दाखल करण्यात …

Read More »