Breaking News

Monthly Archives: May 2019

एनएमएमटीला कधी मिळणार मुख्य व्यवस्थापक?

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई परिवहन विभागाच्या परिवहन मुख्य व्यवस्थापक पदावर शासनाचा अधिकारी प्रतिनियुक्तीवर येणे अपेक्षित आहे, परंतु हे पद गेल्या सहा वर्षापासून रिक्त ठेवले गेले आहे. सध्या या पदावर परिवहनमधीलच कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असणारे शिरीष आरदवाड हे अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत, परंतु शासनाचा अधिकारी यावा …

Read More »

मतदानाच्या दिवशी रोजंदारीवरील कामगार कामाच्या प्रतीक्षेत

पनवेल : प्रतिनिधी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानामुळे आज रोजंदारीवर काम करणार्‍या अनेकांना रोजगार न मिळाल्याने लोकशाहीचा महोत्सव साजरा होत असताना पाणी पिऊन दिवस काढावा लागणार असल्याचे पनवेलच्या गांधी हॉस्पिटलजवळील कामगार नाक्यावरील कामगार बबलू परमारने सांगितले. पनवेलमध्ये गांधी हॉस्पिटलजवळ पुलाखाली,  तसेच नवीन पनवेलमध्ये शिवा कॉम्प्लेक्सजवळ  कामगार नाका आहे. या ठिकाणी रोज …

Read More »

‘पनवेलमध्ये एवढा मोठा मॉल पाहून आश्चर्यचकीत झाले’

पनवेल : प्रतिनिधी मी माझ्या मामाकडे पनवेलला नेहमी येत असे, पण पनवेलमध्ये एवढा मोठा मॉल आहे याची कल्पना नव्हती. एका मराठी माणसाने उभा केलेला मॉल पाहून आपला ऊर निश्चितच भरून येतो. मराठी माणूस व्यवसायात फारसा पडत नसताना मुंबईच्या प्रवेशद्वारी मॉल संस्कृती रुजवण्याचे कार्य मंगेश परुळेकर यांनी यशस्वी करून दाखवलेले पाहून …

Read More »

पावसानं केला खेळ

बेंगळुरू स्पर्धेबाहेर; राजस्थान जर-तरच्या फेर्‍यात बेंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात पावसानं ‘खेळ’ केला. पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पाच षटकांचा खेळवण्यात आलेला सामना अखेर अनिर्णित घोषित करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. त्यामुळं बेंगळुरूचं स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आलं. तर राजस्थानची प्ले-ऑफ प्रवेशाची शक्यताही …

Read More »

कळंबोलीतील पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण

कळंबोली : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र दिनाच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवर, नागरिक आदींना श्रीमती विद्या ठाकूर यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी राज्य राखीव पोलीस दल, जलद प्रतिसाद पथक, दंगल …

Read More »

उरणमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

उरण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 59व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त बुधवारी (दि. 1) सकाळी 8 वाजता उरणचे आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम उरण तहसील प्रांगणात झाला. या वेळी आमदार मनोहर भोईर व उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी उपस्थित नागरिकांना कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. …

Read More »

महाडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहाने साजरा

महाड : प्रतिनिधी विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाने बुधवारी महाडमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यांत आला. महाराष्ट्र दिनानिमित्त महाडमधील चांदे क्रिडांगणावर आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी  पोलिसांतर्फे मानवंदना देण्यांत आली. या कार्यक्रमाला उप विभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, उप विभागीय पोलीस अधिकारी पाटील,  तहसिलदार इंद्रसेन पवार, नायब …

Read More »

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये झेंडावंदन

कर्जत : बातमीदार महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त बुधवारी नेरळ ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच जान्हवी साळुंखे यांचे हस्ते झेंडा फडकविण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सरपंच सुवर्णा नाईक, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, अर्चना भालेराव, मीना पवार, अश्विनी पारधी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुडदे, माजी उपसरपंच सुमन लोंगले, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय मनवे, जयवंत …

Read More »

राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कर्जतमध्ये उत्साहात साजरा

कर्जत : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन कर्जतमध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ झाला. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, प्रांत अधिकारी वैशाली परदेशी – ठाकूर, तहसीलदार अविनाश कोष्टी, पोलीस उप विभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, जिल्हा परिषद सदस्या अनुसया पादिर, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, …

Read More »

पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा गौरव

अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र दिनानिमित्त रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर  ज्या अधिकारी व कर्मचार्‍यांना पोलीस महासंचालक पदक, अंतरिक सुरक्षा पदक तसेच विशेष सेवा पदक प्राप्त झाले आहेत, त्यांना पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी …

Read More »