Breaking News

Monthly Archives: June 2019

वनखात्याच्या परवानगीअभावी रखडलेले रस्ते मार्गी लागावेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांची सभागृहात मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त वनखात्याच्या परवानगीअभावी ज्या रस्त्यांची कामे अडली आहेत, ती कामे तातडीने होण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलत होते.       कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीत वनविभागाची परवानगी न घेता कंत्राटदारांनी मोरेवाडी ते गावंडवाडी रस्त्याचे …

Read More »

मराठा आरक्षण वैध! ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यभर आनंदोत्सव

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण कायदा अखेर वैध ठरला असून, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकर्‍या व शिक्षण प्रवेशात आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा हा घटनेच्या व कायद्याच्या चौकटीत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि. 27) दिला. दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार …

Read More »

अर्ध्यावरती डाव मोडला…

लंडन : वृत्तसंस्था क्रिकेट जगतात प्रतिष्ठेच्या असलेल्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचे असते, परंतु विश्वचषकात निवड होऊनही दुखापत झाल्यामुळे किंवा अन्य काही कारणास्तव विश्वचषकस्पर्धा अर्ध्यावर सोडण्याची वेळ अनेक खेळाडूंवर आली आहे. यंदादेखील ही मालिका सुरूच आहे. सध्याच्या विश्वचषकात डाव्या हाताच्या अंगठयाला झालेल्या दुखापतीमुळे भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला विश्वचषकातून …

Read More »

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमरदीप बारटक्के विजेता

पनवेल : बातमीदार येथील अस्मिता चेस अ‍ॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे वीरुपाक्ष मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राज्यातील 200 स्पर्धकांचा व पालकांचा सहभाग लाभला. स्पर्धेत फीडे मानांकित खेळाडू, तसेच 9, 12, 15 वयोगटाखालील, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व खुल्या वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. स्वीस लीग पद्धतीने ही स्पर्धा सात फेर्‍यांत …

Read More »

पाकिस्तानने न्यूझीलंडला नमविले

लंडन : वृत्तसंस्था बाबर आझमची संयमी शतकी खेळी आणि त्याला हारिस सोहेल-मोहम्मद हाफीजने दिलेल्या साथीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडवर सह गडी राखून मात केली. 238 धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती, पण आझमने आधी हाफिज आणि त्यानंतर सोहेलच्या साथीने भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडला 237 धावांवर रोखल्यानंतर …

Read More »

आजी-माजी कर्णधारांनी सावरले; भारताच्या 268 धावा

मँचेस्टर ः वृत्तसंस्था भारत आणि विंडीज यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर गुरुवारी (दि. 27) झाला. या सामन्यात 50 षटकांच्या अखेरीस 7 बाद 268 धावा करीत भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 269 धावांचे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहली याने फलंदाजी घेतली. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर रोहित शर्मा …

Read More »

अतिउत्साही पर्यटकांना आवरा

पावसाळा सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे. रायगड जिल्ह्यातील धबधबे व समुद्रकिनारे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येतात. पर्यटकदेखील पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो, परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होतात. कित्येकदा प्राणहानी होते. त्यामुळे …

Read More »

काँग्रेसची कानउघाडणी

राजकीय हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही घडल्या आहेत आणि घडत आहेत. मग निव्वळ झारखंडला झुंडबळींचा अड्डा म्हणून हिणवणे कदापिही योग्य ठरत नाही. राजकीय हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेला समान पद्धतीने हाताळले गेले पाहिजे हे मोदींचे म्हणणे अतिशय योग्यच आहे. त्या-त्या ठिकाणी पोलिसांनी दोषींना ताब्यात घेऊन कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे …

Read More »

‘रयत’च्या केंद्राचे आज खारघरमध्ये उद्घाटन

पनवेल : वार्ताहर रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इक्युबेशनचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद …

Read More »

स्वप्नपूर्ती संकुलात कुत्र्यांची दहशत

पनवेल ः वार्ताहर खारघरमधील सेक्टर 36 मध्ये सिडकोकडून उभारण्यात आलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संकुलात सध्या भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. संकुलात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून या भटक्या कुत्र्यांचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी संकुलातील रहिवाशांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्पात …

Read More »