पनवेल : बातमीदार महामार्गाच्या बाजूला शेवटच्या मार्गिकांवर अनेक ठिकाणी बेकायदा पार्किंग केल्याचे पाहायला मिळते, मात्र नव्याने रूंदीकरण करून काँक्रिटीकरण केलेल्या जेएनपीटी आम्रमार्गावरही महामार्गाच्या मधोमध पहिल्या मार्गिकेवर बेकायदा पार्किंग केली जात आहे. हाकेच्या अंतरावर असलेल्या कळंबोली वाहतूक शाखेकडून या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. सायन-पनवेल महामार्ग, मुंब्रा-पनवेल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग …
Read More »Monthly Archives: June 2019
स्पर्धा परीक्षा सेमिनार रविवारी
पनवेल : खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात रविवारी (दि. 16) सायंकाळी 5.30 वाजता यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांचे मोफत सेमिनार आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी प्रा. संजय हिरेमठ व इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. या सेमिनारचा लाभ बारावी ते पदवीधर विद्यार्थी घेऊ शकणार असून जास्तीत जास्त …
Read More »श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह
पनवेल : रामप्रहर वृत्त देवसागर साधक समाज (इंचगिरी संप्रदाय)तर्फे श्री समर्थ सद्गुरू दादामहाराज पुण्यतिथी सप्ताह सोहळा जय हनुमान मंदिर, न्हावा खाडी, उत्तरपाडा, ता. पनवेल येथे श्री. स.स. बाळासाहेब महाराज (नंदेश्वर) यांच्या उपस्थितीत होणार आहे. गुरुवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता सोहळ्याला सुरुवात होऊन शनिवारी (दि. 22) दुपारी 12 वाजता माऊलींवर …
Read More »कराडे खुर्द ग्रा.पं. निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचे पारडे जड
रसायनी : प्रतिनिधी कराडे खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदाच्या उमेदवारीत तिरंगी लढत असून सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला आरक्षित आहे. या निवडणुकीत भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार भारती हेमंत चितळे व इतर प्रभागाचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी होतील, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे. आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली, विभागीय अध्यक्ष …
Read More »आगीशी सामना
जीवन हे एका काचेच्या भांड्यासारखे आहे. कधी, कुठे अपघात वा घातपात होईल आणि क्षणात या जगाचा निरोप घ्यावा लागेल याची शाश्वती नाही. मग ते स्वतःच्या चुकीने असो वा कोणतीही चुकी नसताना केवळ दुसर्याच्या निष्काळजीपणामुळे नाहक निष्पापांचे बळी जात आहेत. मागील वर्षी पुण्यातील चौकात होर्डिंग सिग्नलवर उभ्या असणार्या वाहनांवर कोसळून चार …
Read More »दादासाहेब फाळके चित्रनगरी कात टाकतेय!
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ ही सुमारे 55 वर्षांपूर्वी मंत्रालय आणि विधिमंडळातील कामकाजाचे वार्तांकन करणार्या, राजकीय पत्रकारिता करणार्या पत्रकारांची संघटना कृ. पां. सामक, बाळ देशपांडे, पी. के. नाईक, व्ही. के. नाईक, तिवारी आदी पत्रकारांनी स्थापन केली. सुवर्ण महोत्सव पूर्ण केलेल्या या संघटनेने अनेक विषय हाताळले. अनेक कामे केली. जम्मू-काश्मीर, गुजरात, …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी स्व. दि. बां.ची चळवळ सक्रिय करू या!
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बैठकीत आवाहन पनवेल : प्रतिनिधी प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी दि. बा. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने चळवळ सक्रिय करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले. जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती च्यावतीने गुरुवारी (दि. 13) पनवेल येथील आगरी समाज हॉलमध्ये …
Read More »खासदार झालो तरी पाय जमिनीवरच ः श्रीरंग बारणे
खोपोली ः प्रतिनिधी पंचवीस वर्षे सामाजिक काम करीत असताना नगरसेवक ते खासदार झालो, मात्र या कालावधीत माझ्यात कुठलाही बदल झाला नाही, मी काल होतो आजही तसाच असणार आहे आणि आता पुन्हा खासदार झाल्याने माझ्यावरची जबाबदारी खूपच वाढली आहे. मावळ मतदार संघातील प्रश्नांची मला जाण आहे. मग ते पेण अर्बन बँकेचे …
Read More »नैनाच्या पहिल्या टप्यातील कामाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडकोच्या महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या नैना प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील रस्त्यांच्या कामांचे काल शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आणि सिडको अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमीपूजन करण्यात आले. नैना प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या पायलट प्रोजेक्टवर नैना प्राधिकरणने काम सुरू केले आहे. यातील …
Read More »जिल्हा नियोजन भवनाचे आज उद्घाटन
मुख्यमंंत्र्यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या जिल्हा नियोजन भवनाचे उद्घाटन शनिवारी (दि .15 ) दुपारी 3 वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ई-डिजिटल पध्दतीने सहभाग असणार आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, रायगड जिल्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper