Breaking News

Monthly Archives: June 2019

मुंबई-मालवण एसटीला अपघात; सात प्रवासी जखमी

पनवेल : बातमीदार मुंबई येथून मालवणला जाणार्‍या एसटीला भरधाव आयशर टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एसटीमधील सात प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे सायन-पनवेल मार्गावर कळंबोली येथे घडली. या अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेला असून कळंबोली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातातील सर्व जखमींना उपचार …

Read More »

पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

गव्हाण : रामप्रहर वृत्त येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व टी. एन घरत कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. 5) पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. टाटा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. विद्यालयाच्या परिसरात अनेक प्रकारच्या वृक्षांचे रोपण करत पर्यावरणाचे महत्त्व सांगत कार्यक्रम झाला. …

Read More »

एसटीत पोलिसाला मारहाण; मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार एसटीमधून प्रवास करताना दारू पिणार्‍या तरुणाला हटकणार्‍या पोलीस हवालदार अरविंद पाटील यांना या तरुणाने व त्याच्या साथीदाराने बेदम मारहाण करून पलायन केल्याची घटना रविवारी रात्री पनवेल येथे घडली. या मारहाणीत पाटील हे जबर जखमी झाले असून त्यांना पनवेलमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पनवेल शहर …

Read More »

बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने होणार साजरा

पनवेल : वार्ताहर कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 7) विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व युवा महाराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने भाजपच्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. यामध्ये …

Read More »

पनवेल ते मानखुर्द रस्त्यालगत 11 हजार वृक्षांचे रोपण

पनवेल : प्रतिनिधी गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली केएलई कॉलेज समोर एक्स्प्रेस महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले. यंदा गुरुनानक देव यांचे 550वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने पनवेल ते …

Read More »

स्वच्छता अभियानात सक्रियतेने सहभागी व्हा : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : प्रतिनिधी  आपल्या पुढाकाराने पनवेल महापालिका हद्दीतील परिसर स्वच्छ होणार आहे. त्यामुळे आपला परिसर स्वच्छ राखण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी स्वच्छता महाभियानात सक्रियतेने सहभागी व्हावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.   माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त 1 ते 10 जूनपर्यंत पनवेल महापालिका हद्दीत …

Read More »

रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन सोहळा

महाड ः अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड संस्थेतर्फे गुरुवारी (दि. 6) तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला देशभरातून हजारो शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीच्या वतीने महाड येथील पत्रकार परिषदेत देण्यात आली. तारखेप्रमाणे 6 जून रोजी येणारा शिवराज्याभिषेक दिन लोकोत्सव व्हावा यासाठी समितीच्या माध्यमातून शिवभक्तांनी …

Read More »

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

पनवेल: प्रतिनिधी जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या संबंधित शाळाचालकांनी  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नये, तसेच पालकांनी अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी केले आहे. अनधिकृत शाळेत …

Read More »

निसर्ग रक्षणासाठी सहभागी व्हा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निसर्ग मित्र, पनवेल संस्थतर्फे बुधवारी दि. 5 जून रोजी  चिपळे पूल येथे आयोजित करण्यात आलेल्या गाढी नदीच्या साफसफाई मोहिमेत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभाग घेत सर्वांनी निसर्गाचे रक्षण करण्याच्या या प्रयत्नात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. निसर्ग …

Read More »

पनवेल-माथेरान रोडवर गतिरोधक बसवा -अ‍ॅड. चेतन केणी

पनवेल : वार्ताहर पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच पनवेल-माथेरान रस्ता हॉटेल मरीआई ते मालेवाडी स्टॉपपर्यंत तयार केलेला आहे. सदर रस्त्यावर सेंट मेरी स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल व सेंट अँड्र्यूज स्कूल या शाळा असल्याने या रस्त्यावर मुलांसह त्यांच्या पालकांची आणि नागरिकांची दिवसभर रहदारी चालू असते. सदर रस्ता नवीन, तसेच रुंद झाल्याने …

Read More »