Breaking News

Monthly Archives: June 2019

गाढी नदीच्या साफसफाई मोहिमेत सहभागी व्हा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त निसर्ग मित्र, पनवेल या संस्थतर्फे बुधवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी 6.30 वाजता चिपळे पूल येथे गाढी नदीच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी चिपळे पूल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. …

Read More »

खासदार सुनील तटकरेंच्या सत्कार समारंभातच शेकापच्या महादेव दिवेकरांना अटक

पेण : अनिस मनियार पेण तालुक्यातील ज्येष्ठ शेकाप नेते आणि जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य महादेव दिवेकर यांना अलिबाग येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. 4) अटक केली. एका जागेच्या अपहार व्यवहाराबाबत सुरू असलेल्या खटल्याबाबत न्यायालयाने महादेव दिवेकर यांना हजर करण्याबाबत अटक वॉरंट काढले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे पथकाने ही …

Read More »

शेकापचे अ‍ॅड. परेश देशमुख यांचा पत्नीसह भाजपत प्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधी शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस व विद्यमान चेंढरे ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. परेश देशमुख यांनी आपली पत्नी मीनाक्षी देशमुख यांच्यासह मंगळवारी (दि. 4) भाजपात प्रवेश केला. चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीत मीनाक्षी देशमुख यांना भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे थेट सरपंचपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, असे भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. …

Read More »

एस.टी.ची 71 वर्षे

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच आपल्या एस.टी. महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली त्याला 1 जून रोजी 71 वर्षे पूर्ण झाली. आज आपण या महामंडळामध्ये अनेक स्थित्यंतरे झालेली पाहत आहोत.  या मंडळाचे अध्यक्षपद  पदसिध्द अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच असल्याने आता ना. दिवाकर रावते मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. व्यवस्थापकीय संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी …

Read More »

खोपटा पुलाच्या भिंतीवरील संशयास्पद मजकुराची पोलिसांकडून कसून चौकशी

परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप उरण ः वार्ताहर खोपटा पुलाखालील भिंतीवर लिहिलेल्या संशयास्पद मजकुराची उरण पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. मजकुरातील संदेश तसेच आकडे याबाबतचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रथमदर्शनी हा मजकूर संशयास्पद वाटत असल्याचे उरण पोलिसांनी सांगितले.  खोपटा पुलाखाली एका खांबाच्या भिंतीवर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे …

Read More »

सराईत बलात्कार्यांना फाशीच

बलात्कार करताना संबंधित गुुन्हेगार बळी व्यक्तीच्या आत्मसन्मानाला व स्वत्वाला पूर्णपणे पायदळी तुडवतात. त्यांच्या या घृणास्पद कृत्यामुळे बळी व्यक्तीस जिवंत राहिल्यानंतरही आत्महत्येखेरीज आपल्यासमोर अन्य पर्याय उरलेला नाही असे वाटू शकते. आयुष्यभर त्या अत्याचाराचे मानसिक आणि भावनिक दुष्परिणाम सोसावे लागतात. खेरीज समाजात कलंकित झाल्याच्या भावनेने वावरावे लागते ते वेगळेच. राजधानी नवी दिल्लीत …

Read More »

नवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात

डिसेंबरपर्यंत होणार काम पूर्ण मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भरावाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत 93 टक्के काम पूर्ण झाले आहे. या विमानतळासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाशी संबंधित सवलत करारनाम्यांना मुद्रांक शुल्कातून व गौण खनिजावर आकारण्यात येणार्‍या स्वामित्व धनातून सूट देण्याचा …

Read More »

आमदार प्रवीण दरेकर यांचा पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा

भाजपच्या वतीने महाडमध्ये पाण्याच्या टाक्यांचे वाटप महाड : प्रतिनिधी : महाड-पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांच्या मदतीसाठी भाजपा पुढे सरसावली आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड पोलादपूरमध्ये 5 हजार लिटर क्षमतेच्या जवळपास 50 टाक्या वाटण्याचा संकल्प केला आहे.  जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी …

Read More »

म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिकला बदली

म्हसळा: प्रातिनिधी : म्हसळा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची नाशिक शहर पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली. अत्यंत कमी कालावधीत कोल्हे यांनी म्हसळा तालुक्यात चांगली कामगिरी केली होती. 29 जून 2018 रोजी कोल्हे यांनी म्हसळा पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला होता. कोल्हे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे तालुक्यात  कोणतीही घटना घडल्यास कोल्हे …

Read More »

माथेरान घाटरस्त्याला दरडींचा धोका

लोखंडी जाळ्या बसवण्याची नगराध्यक्षा सावंत यांची मागणी कर्जत: प्रतिनिधी : नेरळ-माथेरान घाटरस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने तयार केला असून घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळत असल्यामुळे प्रवाशांनी भीती व्यक्त केली आहे. या दरडी कोसळू नयेत यासाठी शासनाने लोखंडी जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री …

Read More »