Breaking News

Monthly Archives: June 2019

कचराप्रश्नी मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या

ग्रामपंचायतीचा सातारा येथे अभ्यास दौरा कर्जत ः प्रतिनिधी : नेरळ गावाची दिवसेंदिवस शहरीकरणाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे, मात्र यासोबत नागरी प्रश्नही वाढत आहेत. या नागरी प्रश्नांमध्ये मुख्य प्रश्न आहे तो कचर्‍याचा. हा प्रश्न अनेक वर्षे भिजत घोंगडे म्हणून पडला होता, मात्र नेरळच्या नव्या सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचर्‍याच्या समस्येला केवळ …

Read More »

कंत्राटी स्वच्छता कामगारांची सुरक्षा वार्यावर

सुरक्षा साधनांविना उतरतात गटारात खोपोली ः प्रतिनिधी : मान्सूनपूर्व गटारी व नालेसफाईची कामे खोपोलीत सर्व प्रभागात सुरू आहेत. यासाठी नगरपालिका सार्वजनिक स्वच्छता विभागाकडून कंत्राटी पध्दतीने अतिरिक्त मनुष्यबळ वापरून कामे केली जात आहेत. यातील बहुतांश कामगार हे मागासवर्गीय व आदिवासी समाजातील आहेत, मात्र या कामगारांना गटारीत व नाल्यात उतरविण्यापूर्वी तेथील गाळ …

Read More »

मोठेभोममधील तरुणांचा स्वच्छतेसाठी पुढाकार

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेरजवळील मोठेभोम गावातील प्रवेशद्वारालगत असलेल्या तळ्यात कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. सदर तळे हे चिरनेर-पनवेल महामार्गावर असल्याने या कचर्‍यामुळे रस्त्यावरील प्रवासी व अन्य वाहनधारकांनाही त्यांच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता, तर या तळ्यात पाण्यापेक्षा कचराच अधिक प्रमाणात असल्याचे दिसत होते. तळ्याची अक्षरशः …

Read More »

चाकू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिकेकडून पनवेल एसटी स्टॅण्ड परिसरातील लक्ष्मी वसाहत या ठिकाणी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असताना आरोपी किशोर काळू राममोकल (वय 31) याने शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान शरीरास इजा होईल असे घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना आरोपी याने सदर …

Read More »

स्वर मुझिक रेकॉर्डिंग स्टुडीओचा गुण गौरव सोहळा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी गावाचे साईभक्त, तसेच संगीत क्षेत्रात खूप आवड असलेले भजनीबुवा म्हणून प्रसिद्ध असलेले स्व. वामन दत्तात्रेय कडू यांचा सुपुत्र स्वर म्युझिक रेकॉर्डिंगचे मालक स्वप्नील वामन कडू याने आज संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली असून उरण तालुक्याचे नाव उंच शिखरावर नेले आहे. त्यानिमित्ताने सोनारी येथे रविवारी …

Read More »

दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला, पावसात मोठ्या अपघाताची शक्यता

रसायनी : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जुना मुंबई-पुणे रस्त्यावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता असून दुचाकी वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याची सूचना देऊन देखील आयआरबी दखल घेताना दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 म्हणजेच जुना मुंबई-पुणे महामार्गाची देखभाल दुरुस्ती आयआरबीकडे आहे. त्याबदल्यात शेडुंग येथे टोलवसुली …

Read More »

रसायनीत शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन शिबिर

रसायनी : प्रतिनिधी राज्य शासनाच्या उन्नत शेती-समृद्ध शेतकरी या संकल्पनेनुसार शेती आणि शेतकर्‍यांच्या विकासासाठी 25 मे ते 8 जून हा उन्नत शेती पंधरवडा म्हणून खालापूर तालुक्याच्या गावोगावी जाऊन कृषी अधिकारी शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करीत आहे. ठाणे आणि रायगड हे जिल्हे शेतीप्रधान जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी या योजनेंतर्गत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

श्रमदानातून केली विहिरीची स्वच्छता

रसायनी : प्रतिनिधी राज्यात पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. विहिरी आणि तलावाच्या पाण्याने तळ गाठल्याने, दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक नागरिकांना तर पिण्याच्या पाण्यासाठी घोडदौड करावी लागत आहे. असाच प्रकार खालापूर तालुक्यातील वनवे गावात दिसू लागलाय. ऐन उन्हाळ्यात विहिरीने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न …

Read More »

विजयश्री पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन संचालित श्री. अण्णासाहेब सहस्त्रबुद्घे आदिवासी आश्रमशाळा, वाकडी शांतिवन येथील उपक्रमशिल शिक्षिका विजयश्री राजेंद्र पाटील यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शुक्रवारी (दि. 31 मे) औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार सोहळ्यात शिक्षक आमदार विक्रम काळे …

Read More »

पनवेल महानगरपालिकेतील अधिकार्‍यांच्या हालचालींवर पालिकेची नजर

खारघर : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने अधिकार्‍यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात हालचाल नोंदवही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 21 रोजी पालिका मुख्यालयाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी परिपत्रक काढून सर्व विभागातील अधिकार्‍यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी संबंधित विभागात नागरिकांना उपलब्ध होत नसल्यामुळे परिवर्तन सामाजिक संघटनेचे महादेव वाघमारे यांनी …

Read More »