Breaking News

Monthly Archives: September 2019

नवरात्रोत्सवावर आचारसंहितेचे सावट

राजकीय जाहिरातदार घटले; मंडळांना आर्थिक चणचण खोपोली : प्रतिनिधी नवरात्रोत्सव मंडळांना राजकीय नेते व कार्यकर्ते दरवर्षी जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी देतात, मात्र यावर्षी आचारसंहितेमुळे जाहिरातींवर बंधने आल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी मंडळांना निधी देण्यास हात अखडता घेतला आहे. त्यामुळे यंदा नवरात्रोत्सव मंडळांसमोर आर्थिक चणचण निर्माण होत आहे. आगामी …

Read More »

खोपोलीत पीएमसी बँकेबाहेर ग्राहकांची दुसर्या दिवशीही गर्दी

खोपोली : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लादल्यावर पीएमसी बँकेत खळबळ उडाली आहे. खातेदारांनाही धक्का बसला आहे. पीएमसी बँकेचे खोपोलीत हजारो खातेदार आहेत. आपल्या खात्यातील रक्कम व ठेवींचे काय, याबाबत ठेवीदार चिंतेत सापडले आहेत. याचा जाब विचारण्यासाठी दुसर्‍या दिवशी बुधवारीही सकाळपासून पीएमसी बँकेच्या खोपोली शाखेत व शाखेबाहेर खातेदारांनी गर्दी केली होती. …

Read More »

जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बनले शिक्षक

शिक्षकांना दिले आरोग्य, स्वच्छता आणि प्लास्टिकबंदीचे धडे कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवरूषी हे कर्जत येथील शिक्षण परिषदेत शिक्षक बनले. त्यांनी शासन राबवत असलेल्या प्लास्टिकबंदीबाबत तसेच आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याची शिकवण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. कर्जत तालुका …

Read More »

भाजप कार्यकर्त्यांना बळ

नागोठणे जि.प. गटांतर्गत नियुक्तिपत्रे नागोठणे : प्रतिनिधी भाजपच्या वतीने नागोठणे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष, बूथ समितीतील सदस्य यांची आढावा बैठक येथील शिवगणेश सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीत युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते नव्याने नियुक्ती केलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजपचे शेखर गोळे यांची रोहे …

Read More »

लक्ष्मी आय समूहामध्ये चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया

पनवेल : रामप्रहर वृत्त लक्ष्मी आय समूहामध्ये असलेल्या आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे एका चिमुरडीच्या डोळ्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून, या मुलीची 80 टक्के दृष्टी परत आली आहे. इंदापूर, पुणे येथे राहणार्‍या निकिता सकपाळ (वय 5 वर्षे) हिच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली होती व त्यामुळे या डोळ्याची तिची फक्त एक टक्के …

Read More »

ओएनजीसीमधून पुन्हा गॅस गळती

उरण : रामप्रहर वृत्त काही दिवसांपूर्वी उरणमधील ओएनजीसीतील एका प्लांटला लागलेल्या आगीत पाच जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असताना, ओएनजीसीच्या एका प्लांटमधून नाफ्ता गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्लांटजवळील गावातील रहिवाशांचे तत्काळ स्थलांतर करण्यात आले आहे. ओएनजीसी प्लांटमधून रात्रीपासून नाफ्ता रसायनाची ही गळती सुरू झाली. ही …

Read More »

तुपगाव राजिप शाळेत निकृष्ट पोषण आहार

मोहोपाडा : वार्ताहर चौक परिसरातील तुपगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असून या आहारामुळे काही विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन काही विद्यार्थ्यांना जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवत आहे. हा प्रकार तुपगाव ग्रामपंचायत स्वच्छता पोषण आहार कमिटी अध्यक्ष विजय ठोसर व तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव यांनी शालेय …

Read More »

देशी-विदेशी मद्याचा साठा हस्तगत

पनवेल : वार्ताहर पनवेल विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलिसांनी धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तालुक्यातील कसळखंड येथे छापा टाकून एका इसमास देशी-विदेशी मद्याच्या साठ्यासह ताब्यात घेतले आहे. पनवेल विधानसभा निवडणूक जाहीर होताच मोठ्याप्रमाणात गावागावांमध्ये मद्याचा बेकायदेशीर साठा …

Read More »

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात निवडणूक कक्ष

पनवेल : वार्ताहर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या अनुषंगाने परिमंडळ 1 व परिमंडळ 2 अंतर्गत येणार्‍या सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये निवडणूक आयोगाच्या आदेशाने निवडणूक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. परिमंडळ 1 व परिमंडळ 2 अंतर्गत असलेल्या पनवेल विधानसभा, उरण विधानसभा, बेलापूर विधानसभा व ऐरोली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाच्या …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सौरदूत योजना कार्यशाळा

खारघर : रामप्रहर वृत्त सौर दिवे कार्यशाळेचे बुधवारी (दि. 2 ऑक्टोबर) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2019 रोजी विद्यार्थी सौरदूत योजनेंतर्गत 100 पेक्षा जास्त देशांमध्ये एकाच वेळी सौर दिवे बनविण्याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. विविध महाविद्यालय व शाळांमध्ये ही …

Read More »