Breaking News

Monthly Archives: September 2019

खारघर येथील सीकेटी विद्यालयात हिंदी दिवस साजरा

खारघर ः रामप्रहर वृत्त ज.भ.शि.प्र. संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी विश्व हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्र्रमास प्राचार्य के. के. म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. वाणिज्य विभागप्रमुख आणि हिंदी विषयाचे शिक्षक प्रमोद शेळके, विज्ञान विभाग प्रमुख दुर्गादेवी मौर्या, परीक्षा विभागप्रमुख अस्मिता म्हात्रे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्ना …

Read More »

12 हजार वाहनचालकांवर कारवाई

द्रुतगती महामार्गावर 20 लाख 79 हजारांचा दंड वसूल पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. विशेषतः भरधाव वेगात लेनची शिस्त न पाळल्यामुळे हे अपघात होत असतात. अनेकांना यामध्ये आपला जीव गमवावा लागतो. लेनची शिस्त न पाळणार्‍या वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत तीन महिन्यात …

Read More »

मोजमाप

1970च्या दशकापर्यंत एक पाव, दोन पाव, अर्धा, तीन पाव पाऊण, चार पाव पूर्ण एक, पाच पाव सव्वा, सहा पाव दीड, सात पाव पावणेदोन, आठ पाव दोन, नऊ पाव सव्वादोन, 10 पाव अडीच,  अकरा पाव पावणे तीन, बारा पाव तीन, पुढे 13 पाव सव्वातीन अशा पावकी दीडकीचे पाढे शिकलेली तरुण पिढी …

Read More »

इजा, बिजा आणि तिजा! काँग्रेस पक्षानेही केले शतकमहोत्सवी खताळ-पाटलांकडे दुर्लक्ष!

4 ऑगस्ट रोजी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात उत्कृष्ट संसदपटू म्हणून कार्य करणार्‍या आणि आयुष्याचे शतक फटकावणार्‍या नेत्यांबद्दल चर्चा केली. त्या चर्चेत एक महत्त्वाचे नाव आमचे स्नेही समीर मणियार आणि बा. बा. वाघमारे यांच्याकडून पुढे आले ते होते भिकाजी जिजाबा खताळ-पाटील यांचे. समाजवादी चळवळीत वाहून घेतलेल्या दत्तात्रय बाळकृष्ण ताम्हाणे उर्फ दत्ता ताम्हाणे …

Read More »

‘नैना’चा मार्ग मोकळा

विकास आराखडा, नगर रचनेला शासनाची मंजुरी नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पातील अंतरिम विकास आराखड्यातील 23 गावे वगळून उर्वरित गावांच्या विकास आराखड्यास आणि प्रारंभिक नगर रचना क्र. 1ला राज्य शासनातर्फे सप्टेंबर 2019मध्ये मंजुरी देण्यात आल्याने नैना प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात …

Read More »

पनवेलमध्ये भाजपतर्फे विकासाचा झंझावात

नगरसेवकांच्या निधीतून विविध कामांचा शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांकडून अनेक कामे सातत्याने करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत विजय चिपळेकर, नरेश ठाकूर, संजना कदम आणि अनिता पाटील यांच्या नगरसेवक निधीतून करण्यात येणार्‍या विकासकामांचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल …

Read More »

पनवेलमध्ये उद्या रोजगार मेळावा

अलिबाग : जिमाका बेरोजगार उमेदवारांसाठी राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पनवेलच्या वतीने रविवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता पनवेल येथील के. व्ही. कन्या शाळेत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर …

Read More »

गुड न्यूज! कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात

पणजी : वृत्तसंस्था अर्थव्यवस्थेला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. देशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट करात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (दि. 20) पत्रकार परिषदेत दिली. कोणतीही सवलत न घेणार्‍या कंपन्यांच्या करामध्ये कपात करून दर 22 टक्के करण्यात आले …

Read More »

म्हसळ्यात तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई

म्हसळा : प्रतिनिधी शहरातील शाळा नं 1 समोर असलेल्या सत्यनारायण तंबाखू विक्री केंद्र व भोला पान टपरीवर गुरुवारी (दि. 19) म्हसळा पोलीस व तालुका आरोग्य विभागाने 2003च्या कलम 24नुसार कारवाई केली. शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी शाळेच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या …

Read More »

प्रशांत कणेरकर आत्महत्या प्रकरण

पोलीस अधिकार्‍यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले अलिबाग : प्रतिनिधी सहाय्यक पोलीस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात, राज्य गुप्तवार्ता विभागातील तीन पोलीस अधिकार्‍यांचे अटकपूर्व जामीन अर्ज अलिबाग सत्र न्यायालयाने फेटाळले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणेरकर यांनी 16 ऑगस्ट रोजी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात आत्महत्या केली होती. या प्रकरणी कणेरकर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार …

Read More »