मोहाली ः वृत्तसंस्था भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसर्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेले 150 धावांचे लक्ष्य कोहलीने शिखर धवन आणि त्यानंतर श्रेयस अय्यरच्या साथीने पूर्ण केले. …
Read More »Monthly Archives: September 2019
दोन पदके निश्चित;अमित, मनीष उपांत्य फेरीत
ईकॅटरिनबर्ग (रशिया) ः वृत्तसंस्था अमित पांघल (52 किलो) आणि मनीष कौशिक (63 किलो) यांनी बुधवारी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील दोन पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने फिलिपिनो कार्लो पालमचा 4-1 असा पराभव केला, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील …
Read More »मोहालीच्या मैदानावर विराट कोहलीचा रुद्रावतार
मोहाली ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. मोहालीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसर्या टी-20 सामन्यात भारताने द. आफ्रिकेवर 7 गडी राखून मात केली. विराटने फलंदाजीदरम्यान नाबाद 72 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, मात्र याच सामन्यात विराटचा रुद्रावतार क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाला. पहिल्यांदा गोलंदाजी …
Read More »भाजयुमो पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या विविध पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून, भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान केली. युवा मोर्चाच्या माणगाव तालुका उपाध्यक्षपदी हसिम अकलेकर, शहराध्यक्षपदी राजेश तेटगुरे, मोर्बा शहराध्यक्षपदी मुकेश पवार, तसेच अल्पसंख्याक मोर्चा तालुका चिटणीसपदी मुश्ताकभाई बंदकर, तालुका सरचिटणीसपदी रफिक नाडकर यांची …
Read More »पेणमध्ये शेकापला पुन्हा एकदा धक्का, झोतीरपाडा उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य भाजपत दाखल
पेण : प्रतिनिधी शेकाप पुढार्यांच्या मनमानी कारभारला कंटाळून पेण तालुक्यातील झोतीरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सदस्यांनी गुरुवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पेण विधानसभा मतदारसंघात सध्या भाजप प्रवेशाची लाट उसळली आहे. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेणमधील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात झोतीरपाडा ग्रामपंचायतीचे …
Read More »पावसामुळे रस्ता बनला धोकादायक, पोशीर-माले रस्त्यावर चिखल आणि खड्डे
कर्जत : बातमीदार पुराच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील पोशीर-माले रस्त्याचा काही भाग वाहून जाऊन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हापासून महिनाभर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तात्पुरत्या स्वरूपात मातीचा भराव टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता. पावसामुळे पुन्हा हा रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाकडे …
Read More »शिबिरात 27 जणांचे रक्तदान
अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि स्वयंसिध्दा संचलित स्पर्धा विश्व अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जंजिरा सभागृहात घेण्यात आलेल्या शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले. प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. जिल्हा नियोजन …
Read More »रोहा रेल्वे स्थानकात स्वच्छता अभियान
रोहे ः स्वच्छ भारत अभियानांतर्गत मध्य रेल्वेच्या वतीने स्वच्छता अभियान पंधरवडा राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी रोहा रेल्वे स्टेशन व परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात रेल्वे अधिकारी मीना, स्टेशन मास्तर सुरेश कुशवाह, आरपीएफ पोलीस निरीक्षक चौधरी, आरक्षण तिकीट मास्तर विजेंद्र सिंग, सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य रोहेकर, विद्या …
Read More »माणगावात एकाच जमिनीचा तिसर्यांदा साठेकरार; फिर्यादीची फसवणूक; दोन आरोपींवर गुन्हा दाखल
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कविळवहाळ बुद्रुक येथील एकच जमीन दोन वेळा विकल्यानंतर त्या जमिनीचा तिसर्यांदा साठेकरार करून एका व्यक्तीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी दोन जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधू बाबू बागवे व संजय साधू बागवे यांनी त्यांच्या मालकीची कविळवहाळ बुदु्रक येथील …
Read More »नागोठण्यात गांधी जयंतीपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी
नागोठणे : प्रतिनिधी म. गांधी जयंतीपासून (2 ऑक्टोबर) नियमित वापरात येणार्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी येणार असून कापडी किंवा कागदी पिशव्यांचाच वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी नागरिकांना केले. ‘स्वच्छता हीच सेवा‘ या अभियानांतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा मंगळवारी (दि. 17) नागोठणे ग्रामपंचायत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper