खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या महड गावातील वरदविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी खालापूर, चौक, खोपोली, कर्जत, पनवेल, रसायनी परिसरातील हजारो भक्तांनी गर्दी केली होती. अंगारक चतुर्थीनिमित्ताने कसळखंड येथील रोशन पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी सुंदर अशी मनमोहक रांगोळी काढली होती, तसेच गणेशभक्तांना दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी वाहनांची व पाण्याची व्यवस्था करण्यात …
Read More »Monthly Archives: September 2019
‘खोपोलीत डेंग्यूची साथ नाही’
खोपोली : प्रतिनिधी शहरात मागील आठवड्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले होते. त्या सर्वांच्या रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली असता त्यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी त्यांनी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही केले. लक्ष्मण गायकवाड …
Read More »मुसळधार पावसातही बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि.17) मुसळधार पावसातही भाविकांनी गर्दी केली होती. येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांचा धंदादेखील तेजीत होता. रायगडसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक व पर्यटक मंगळवारी मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. काही तरुण, महिला पायी चालत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आल्या …
Read More »पेण तालुक्यात साखरचौथ गणेशोत्सव
पेण : प्रतिनिधी तालुक्यात सार्वजनिक तसेच घरगुती साखरचौथ गणपतींची मंगळवारी सकाळी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र मंगलमय वातारवण निर्माण झाले आहे. अष्टविनायक मित्र मंडळ, ओरिजनल अष्टविनायक मित्र मंडळ, प्रेमनगर मित्र मंडळ-चिंचपाडा, सुंदरनगर मित्र मंडळ, गुरुदत्त मित्र मंडळ-देवआळी, श्री गणेश …
Read More »नांदगाव हायस्कूल येथे पंचक्रोशीचा राजा विराजमान
मुरूड : प्रतिनिधी नांदगाव हायस्कूलमध्ये मंगळवारी (दि. 17) साखरचौथ गणपती ‘पंचक्रोशीचा राजा‘ विराजमान झाला. फटाक्यांच्या आतषबाजीत व बेंजोच्या तालावर पंचक्रोशीचा राजाचे आगमन झाले. त्याच्या पूजेचा मान अशोक दहिगावकर व त्यांच्या पत्नी लता यांना मिळाला. शैलेश जोशी यांनी पौरोहित्य केले. या वेळी सजावटीद्वारे चांद्रयान मोहिमेची माहिती मुलांना देण्यात आली आहे. या …
Read More »कर्जतच्या चित्रकाराचा अमेरिकेत सन्मान
कर्जत : बातमीदार पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेच्या न्यूयॉर्क येथे भरविण्यात आलेल्या 47व्या वार्षिक अंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात कर्जत येथील चित्रकार पराग बोरसे यांच्या चित्राचा समावेश आहे. सलग दुसर्या वर्षी या प्रदर्शनासाठी निवड होणारे ते एकमेव भारतीय ठरले आहेत. न्यूयॉर्कमधील द नॅशनल आर्ट्स क्लबमध्ये भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात जगातील …
Read More »रोह्यात अडीच टन निर्माल्य जमा; डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
रोहे ः प्रतिनिधी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने येथील श्री सदस्यांनी रोहा अष्टमी परिसरातील गणेश विसर्जनाच्या वेळी दोन टन 700 किलो निर्माल्य गोळा केले आहे. या निर्माल्याचे खत तयार करून ते झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या …
Read More »देवघर ग्रामपंचायतीची चौकशी करावी ; ग्रामस्थांचे ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांना साकडे
म्हसळा : प्रतिनिधी तालुक्यातील देवघर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असून, या ग्रामपंचायतीमध्ये मागील दोन वर्षांत झालेल्या सर्व व्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी देवघर गावातील ग्रामस्थांनी म्हसळ्याच्या गटविकास अधिकार्यांमार्फत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत देवघर ग्रामपंचायत हद्दीत करण्यात येणार्या कामांत मोठ्या …
Read More »तांबस-बारणे रस्ता गेला वाहून; वाहतूक बंद
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी सततच्या पावसामुळे राजनाला कालव्यातून वाहून आलेले पाणी कर्जत तालुक्यातील चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली रस्त्यावरून जात असल्यामुळे या रस्त्याचा तांबस येथील भाग वाहून गेला आहे. त्यामुळे बारणे गावाच्या अलीकडे असलेल्या ग्रामस्थांना पलीकडे कडाव येथे जाणे बंद झाले आहे. कर्जत तालुक्यातील कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव रस्त्यालगत राजनाला कालवा आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यास कालव्यातील …
Read More »‘विधानसभे’साठी प्रशासनही होतेय सज्ज; अलिबागमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती; मतदारांचा प्रतिसाद
अलिबाग : जिमाका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हीव्हीपॅट (ततझ-ढ: तेींशी तशीळषळशव झरशिी र्-ीवळीं ढीरळश्र) मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून, या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper