Breaking News

Monthly Archives: September 2019

गौरा गणपती दर्शन!

पनवेल : भाजपचे युवा नेते के. के. म्हात्रे यांच्या कामोठे निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गौरा गणपतीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले. या वेळी के. के. म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, प्रदीप भगत, रमेश म्हात्रे, सचिन गायकवाड, हॅप्पी …

Read More »

‘सीकेटी’ची मनाली चिलेकर टेबल टेनिसमध्ये प्रथम

पनवेल ः रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय टेबल टेनिस स्पर्धेत इंग्रजी माध्यम, नवीन पनवेलच्या मनाली चिलेकर या (इ. 7वी)च्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आपली गुणवत्ता सिद्ध करीत तिने रायगड जिल्हा चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे. मनालीचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष …

Read More »

एम. एम. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश

पनवेल ः राप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे एम. एन. विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो  स्पर्धेमध्ये 12 सुवर्णपदक तसेच पाच रजत पदक संपादन करून घावघवीत यश मिळवले. यामध्ये 14 वर्षे वयोगटातील दीप संजय धांगडे, हर्ष अनिल गजघटे, तन्मय महेश नाईक, आश्रीवत अमर खोत यांनी …

Read More »

गुरुनानक यात्रा शनिवारी कामोठ्यात

पनवेल ः रामप्रहर वृत्त सुप्रीम कौन्सिल नवी मुंबई गुरुद्वारच्या वतीने दि. 20 सप्टेंबर रोजी कळंबोली गुरुद्वार सहिबा येथे गुरुमत समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुनानक यात्रा पुणेकडून नवी मुंबई व मुंबईत येत असून यानिमित्त दि. 21 रोजी आंतरराष्ट्रीय नगर कीर्तन कामोठे-कळंबाली हायवे ब्रिजखाली यात्रेचे दुपारी 3 वाजता भव्य स्वागत होईल. …

Read More »

भाजप जासई विभाग युवा मोर्चा अध्यक्षपदी नीलेश पाटील

उरण ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सूचनेने पनवेलचे आमदार तथा सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थित जेएनपीटीचे विश्वस्त भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या आशीर्वादाने आणि युवा तालुका अध्यक्ष शेखर तांडेल यांच्या सहकार्याने आणि प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा जासई विभाग अध्यक्षपदी …

Read More »

तामसईवाडीतील आदिवासी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील तामसईवाडी येथील आदिवासी बंधू-भगिनींनी मंगळवारी (दि. 17) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भाजपत स्वागत केले. तामसईवाडीत झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, रमेश पाटील, शांताराम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रामा शिद, सोमा शिद, …

Read More »

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

पनवेलमध्ये 22 सप्टेंबरला रोजगार मेळाव्याचे आयोजन अलिबाग ः जिमाका महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल यांचे विद्यमाने, रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता के. व्ही. कन्याशाळा (ज्युनिअर कॉलेज) वडाळा तळावाजवळ, (ता. पनवेल, जि. रायगड) येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आला आहे. …

Read More »

नवीन पनवेलची वाहतूक कोंडीतून सुटका

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम नवीन पनवेल रेल्वेस्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. सिडको …

Read More »

अखंड प्रेरणास्रोत

देश पुनर्उभारणीच्या कामी त्यांनी दाखवलेली धडाडी अवघ्या देशाला स्तिमित करून गेली आहे. या माणसाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झाला आहे याने तर सगळेच अचंबित होतात. परंतु मोदी तर अपेक्षित कर्तबगारीच्याही पुढे झपाट्याने कूच करीत निघाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, 17 सप्टेंबर रोजी 69 वर्षांचे झाले. 2014 साली जनमताच्या एका प्रचंड …

Read More »

पनवेल रेल्वे स्टेशनवर स्वच्छता रॅली

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पाळण्यात येणार्‍या स्वच्छता आठवड्याची सुरुवात सोमवारी (दि. 16) करण्यात आली. सकाळी 11 वाजता स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांची रॅली काढून नागरिकांत स्वच्छतेविषयी जागृती करण्यात आली. ’स्वच्छता हीच सेवा’ मानून मध्यरेल्वे मध्य रेल्वे, आगरवाल समाज पनवेल वेल्फेअर असोशिएशन, लायन्स क्लब …

Read More »