पनवेल ः रामप्रहर वृत्त सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना प्रशांत गायकर, संतोष आमले, मच्छिंद्र पाटील, सचिन तांबे, विलास गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक मदत करण्यात आली. सायरस इराणी, दीपक पाटील, विक्रांत पाटील, मोहम्मद शेठ, राजेश कदम, शंकर जाधव, मनोज ठाकूर, मनिषा भागवत, भरत जोशी, स्वाती म्हात्रे, महें़द्र गायकवाड, आनिल गायकवाड, कमलाकर पाटील, …
Read More »Monthly Archives: September 2019
‘पंचकर्म’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डी. वाय. पाटील आयुर्वेदिक रूग्णालयाचे प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. आशिष म्हात्रे आणि त्यांचे सहकारी डॉ. परेश कटारिया लिखित पंचकर्म या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच डॉ. विजय पाटील आणि विश्वस्त शिवानी पाटील यांच्या हस्ते …
Read More »डॉ. नीता पाटील फाऊंडेशनच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम
मोहोपाडा ः वार्ताहर डॉ. नीता पाटील फाऊंडेशनची सभा मोठ्या उत्साहात झाली. या सभेला रायगड मुंबईतील 75 व्यावसायिकांनी उपस्थिती लावली होती. सभेला राजू टपाल आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे उपस्थित होते. फोरमच्या अध्यक्ष डॉ. नीता पाटील, डॉ. अमितकुमार गोईलकर आणि शिवश्री प्रभाकर भोईर यांनी या सभेचे सुंदर आयोजन केले. …
Read More »उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत
महानिर्मितीला 20 कोटींचा फटका उरण ः रामप्रहर वृत्त उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसापासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा सोमवारपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका वीज संचातून 115 मेगावॅट वीजनिर्मिती झाली आहे. मात्र गॅसअभावी वीजनिर्मिती गेले 10 दिवस बंद राहिल्याने या प्रकल्पाला 20 …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. नानासाहेब धर्माधिकारींचे नाव
पनवेल : सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे ‘महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय’ नामकरण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तीर्थरूप डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक दशकांपासून आध्यत्मिक, सामाजिक क्षेत्रात अविरतपणे मौलिक कार्य सुरू आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला …
Read More »रस्ते आणि पाणपोईंचे नवीन पनवेलमध्ये भूमिपूजन
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडकोची अर्धवट असलेली कामे पूर्ण करूनच महापालिकेकडे हस्तांतरित केली जातील, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते सोमवारी (दि. 16) नवीन पनवेल येथे रस्ते आणि पाणपोई भूमिपूजन समारंभात बोलत होते. नवीन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत …
Read More »कार्यकर्ता हीच भाजपची ताकद
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरणमध्ये प्रतिपादन उरण : वार्ताहर कार्यकर्ता हीच भाजपची ताकद असून, आज विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पक्ष अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, …
Read More »नड्डा यांच्या मार्गदर्शनाने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यासह संपूर्ण देशभरात भाजपच्या विजयाची लाट असून, अथांग सागरी किनारपट्टी लाभलेल्या कोकणातदेखील तीच लाट आहे. ही लाट येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अशीच कायम ठेवून विरोधकांच्या अपप्रचारावर त्सुनामी निर्माण करण्यासाठी आणि रायगडसह कोकणात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे …
Read More »पनवेल तालुक्यातील 36 शाळांना मिळणार नवसंजीवनी
शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा परिषद अंतर्गत येणार्या प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी शिक्षणप्रेमी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणी व पाठपुराव्याला यश आले असून, पनवेल तालुक्यातील 36 शाळांच्या दुरुस्तीला जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पनवेल तालुक्यातील शाळांच्या इमारती बिकट असल्याने त्यांची …
Read More »नवभारताचे भाग्यविधाते पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऐतिहासिक परंपरा, भौगोलिक अनुकूलता, नैसर्गिक संपन्नता आणि विविधतेतील एकता अशी अनेक वैशिष्ट्ये असलेला आपला भारत देश जगाला हेवा वाटावा असाच आहे, मात्र असे असूनही आपल्या देशाला जागतिक स्तरावर हवा तसा मान-सन्मान मिळत नव्हता. किंबहुना भारताला नेहमीच दुय्यम स्थान मिळत असे. आज जगभरात भारताच्या यशाचे, विकासाचे अन् प्रगतीचे गोडवे गायले जात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper