पनवेल ः वार्ताहर मागच्या सोमवारी कामोठेत घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी सुरेश चव्हाण याने आपल्या लहान भावाच्या पत्नीची गळा आवळून हत्त्या केल्यानंतर तिच्यावर त्याने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक बाब तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे कामोठे पोलिसांनी आरोपी सुरेश चव्हाण याच्यावर हत्येसह बलात्काराचा देखील गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी सुरेश चव्हाण हा …
Read More »Monthly Archives: September 2019
सौरभ वर्माची विजेतेपदाची हॅट्ट्रिक
हनोई : वृत्तसंस्था भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने व्हिएतनाम खुल्या बीडब्लूएफ टूर सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. सौरभचे हे या वर्षातील तिसरे विजेतेपद ठरले. त्याने यंदा हैदराबाद आणि स्लोव्हेनिअन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. सौरभने चीनच्या सन फेई झियांगवर संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसर्या मानांकित सौरभने 1 तास …
Read More »बीयूडीपीच्या घरांना सिडकोचा दिलासा; अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण निर्णय
पनवेल, कळंबोली ः रामप्रहर वृत्त सिडको वसाहतीतील बीयूडीपीच्या (अल्पगट) घरांना बांधकाम मुदतवाढीसाठी लागणारी रक्कम तीन टक्केच भरावी लागणार आहे. आता येथील रहिवाशांना पाच लाखांचा ऐवजी सिडकोला एक लाख रुपये अदा करावे लागणार आहेत. त्यामुळे हजारो सदनिकाधारकांना याचा फायदा होणार आहे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने प्राधिकरणाने हा महत्त्वपूर्ण …
Read More »मालिका बरोबरीत, तरीही ‘अॅयशेस’ ऑस्ट्रेलियाकडे
लंडन : वृत्तसंस्था अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत इंग्लंडने अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली आहे. मागच्या वर्षीची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. म्हणूनच अॅशेस चषक त्यांच्याकडे कायम राहिला. स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक मार्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी …
Read More »जलतरण स्पर्धेत रायगडचा ‘स्ट्रोक’
10 जणांकडून 45 पदकांची लयलूट अलिबाग : प्रतिनिधी अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील स्पर्धकांनी वर्चस्व प्राप्त केले आहे. 10 जणांनी तब्बल 45 पदकांची कमाई केली. महाराष्ट्र राज्य मास्टर्स एक्वेटिक असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 13 व 14 सप्टेंबर रोजी अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी …
Read More »कांतीलाल कडूंना पनवेलचा आमदार होण्याची सुवर्णसंधी!
पनवेल : रामप्रहर वृत्त शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामार्फत पनवेलमध्ये जिंकायचे असेल, तर या आघाडीने पनवेल विधानसभेची उमेदवारी कांतीलाल कडू यांना देण्याशिवाय पर्याय नाही. ते एकमेव मजबूत उमेदवार असून, त्यांना आता आमदारकीची स्वप्ने पडतात. कांतीलाल कडू यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे विधानसभा उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »पक्ष संघटन मजबूत करा -जे. पी. नड्डा भाजपचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
पनवेल : प्रतिनिधी मतदारसंघ कोणताही असो त्या ठिकाणी आपले संघटन मजबूत करा, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी (दि. 15) येथे केले. ते भारतीय जनता पक्षाच्या ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलनात बोलत होते. सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत …
Read More »गौरा गणपती मंडळाचा स्तुत्य उपक्रम
श्रीगाव (ता. अलिबाग) : सततच्या रहदारीमुळे खराब झालेल्या नदी पुलावरील रस्त्याची सार्वजनिक गौरा गणपती उत्सव मंडळाच्या सदस्यांनी श्रमदानाने डागडुजी केली आणि अनोख्या भक्तीचा परिचय दिला. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (छाया : सचिन पाटील)
Read More »पाकिस्तान भारताशी युद्धात हरू शकतो : इम्रान खान
इस्लामाबाद : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहे, मात्र पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च हे स्वीकारले आहे की ते भारताशी युद्ध जिंकू शकत नाहीत. एकीकडे अणुयुद्धाच्या वल्गना करताना इम्रान म्हणाले की, पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्ध हरू शकतो, पण …
Read More »प्रभाकर मोरेंना अखेरचा निरोप
महाड : प्रतिनिधी माजी ग्रामविकास तथा गृहराज्यमंत्री प्रभाकर (भाऊ) मोरे यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 15) महाडच्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. तत्पूर्वी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्व. मोरे यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. महाड विधानसभा मतदारसंघात विकासाची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper