Breaking News

Monthly Archives: September 2019

‘त्या’ गैरहजर कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली असून आरोग्य सेवासुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे सातत्याने दिसून येते. अशातच मंगळवारी (दि. 10) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान एक गर्भवती महिला उपचाराकरिता आरोग्य केंद्रात आली असता रुग्णालयात कुणीही आढळून न आल्याने रुग्ण व नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. पाली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णसेवेबाबत प्रश्नचिन्ह …

Read More »

माजी मंत्री प्रभाकर मोरे यांना अखेरचा निरोप

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार महाड ः प्रतिनिधी शिवसेना नेते व माजी ग्रामविकास तथा गृहराज्यमंत्री कै. प्रभाकर (भाऊ) मोरे यांच्यावर रविवारी (दि. 15) महाडच्या वैकुंठ स्मशानभूमीत हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अखेरचा निरोप देत अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी कै. प्रभाकर मोरे यांच्या निवासस्थानी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी भेट देत मोरे …

Read More »

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद

कर्जत ः बातमीदार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून माणगाववाडी आदिवासी आश्रमशाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. मधुरम चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय जनता पार्टी नेरळ, वैष्णव ट्रस्ट आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. नेरळ-माथेरान रस्त्यावरील माणगाववाडी आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान …

Read More »

रोह्यात राष्ट्रवादीला धक्का

वैभव चोरगे, उत्तम नाईक, नवनीत डोलकर भाजपमध्ये रोहे : प्रतिनिधी तटकरे कुटुंबीयांचे तीन पिढ्यांचे राजकीय सोबती असलेले कै. नामदेव चोरगे यांचे नातू, कै. प्रदीप चोरगे यांचे पुत्र व निडीतर्फे अष्टमी ग्रामपंचायतीचे सदस्य वैभव चोरगे, रोहे तालुक्यातील तडफदार नेते नवनीत डोलकर आणि युवा नेते उत्तम सीताराम नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजप …

Read More »

डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन

रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व भारतीय आयुर्विमा रोहा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच या महाविद्यालयाच्या सभागृहात व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन रोहा आयुर्विमा शाखेचे शाखाधिकारी पद्माकर भोईर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघाचे आंबेपूर परिसरात वृृक्षारोपण

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे आंबेपूर मुख्य रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. रेवदंडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रतिवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम विविध ठिकाणी राबविण्यात येतो. यावर्षी अलिबाग तालुक्यातील चौल ते वावे रस्त्याच्या दरम्यान असलेल्या आंबेपूर गावाच्या मुख्य रस्त्यालगत रेवदंडा ज्येष्ठांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या …

Read More »

माथेरान पोलीस बनले देवदूत

कर्जत ः बातमीदार माथेरानमधील आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत असताना येथील आरोग्यसेवेबरोबर रुग्णवाहिकेचादेखील खेळखंडोबा सुरू आहे. शासनाच्या रुग्णवाहिकेसह येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी दिवसरात्र कार्यरत राहून सेवा देत असलेल्या दोन्ही रुग्णवाहिका एकाच वेळी नादुरुस्त झाल्याने एका गरोदर महिलेची प्रसूती काळात प्रकृती खालावल्याने तिच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीत वाहनास बंदी …

Read More »

‘पालीवाला’त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

पाली ः प्रतिनिधी ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन राष्ट्रसेवा करण्याकरिता प्रोत्साहन देण्याच्या उदात्त  हेतूने पालीवाला महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांच्या प्रयत्नातून नुकताच पालीवाला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात …

Read More »

माणगावातील बांधकामे नियमित करा

बिल्डर्स असोसिएशनचे पालकमंत्र्यांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी माणगावमधील बांधकामे शासनाने नियमित करावीत, असेे निवेदन माणगाव बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. माणगाव येथील बांधकामाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याकामी उपविभागीय अधिकारी माणगाव यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यासोबत साधारणपणे सन 2010-11 या …

Read More »

बचतगटांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील

पेण ः प्रतिनिधी बचतगटांच्या प्रगतीसाठी व त्यांचा आर्थिक स्तर वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. पेण नगर परिषद व माविम यांच्या वतीने शहरातील स्थापन केलेल्या सर्व महिला बचतगटांच्या नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियान …

Read More »