Breaking News

Monthly Archives: October 2019

बँक ऑफ इंडियाच्या वतीने सतर्कता जागृती मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनात अखंडता सुनिश्चित करण्यासाठी सीव्हीसीच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने बँक ऑफ इंडिया नवी मुंबई झोनने सीबीडी-बेलापूर येथे ईमानदारी-एक जीवनशैली या विषयासह दक्षता जागृती मोहिमेचे आयोजन केले. बँक ऑफ इंडिया आपल्या सर्व कर्मचार्‍यांना त्यांच्या कामात सचोटीची सवय लावून प्रोत्साहित करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या …

Read More »

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताह

पनवेल : वार्ताहर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असून, हा सप्ताह 2 नोव्हेंबर 2019 पर्यंत सुरू राहणार आहे. या सप्ताहानिमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात अलिबाग तालुक्यातील मेडिकल असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, रिक्षा चालक-मालक संघटना, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक व पोलीस पाटील यांची बैठक आयोजित करण्यात …

Read More »

भ्रष्टाचाराची कीड उखडून टाकू या!

अलीकडे भ्रष्टाचाराने चरणसीमा गाठली आहे. तो एवढा वाढलेला आहे की तो आपल्या जगण्यातील एक आजारच बनलेला आहे. असा तसा आजार नाही तर गंभीर आजार बनलेला आहे. तो कसा संपवावा याचा प्रश्न प्रत्येक जनमाणसाच्या मनाला पडलेला आहे. यासाठी शासन त्याच्या पातळीवर काम करीत आहे, पण भ्रष्टाचाराची कीड उखडून टाकण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न …

Read More »

आमदार महेश बालदी यांचा भाजपला पाठिंबा

मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार महेश बालदी यांनी भारतीय जनता पक्षाला आपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना दिलेे. आमदार महेश बालदी यांनी आपल्या पाठिंबापत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत …

Read More »

दिवाळी संध्याने कर्जतकर झाले मंत्रमुग्ध, नवोदित कलाकारांनी केली कमाल; श्रोते सुखावले

कर्जत : प्रतिनिधी शहरातील नानामास्तर नगरमध्ये दिवाळी संध्याच्या निमित्ताने यशोदीप कला मंचच्या नवोदित गायक कलाकारांनी सादर केलेल्या गीतांनी कर्जतमधील रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. या वेळी संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नानामास्तर नगरमधील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या प्रांगणात माजी सरपंच मनोहर पाटील यांनी यशोदीप कला मंचच्या सहकार्याने दिवाळी …

Read More »

क्रिकेटच्या वादातून वढाव येथे मारहाण

पेण ः प्रतिनिधी वढावं येथे क्रिकेटच्या वादातून मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून यात एक जण जखमी झाला आहे. वडखळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी वढाव (ता. पेण) हे गावातील मंदिरात दर्शनास गेले असता एकाने तुम्ही देवाच्या अंगणात क्रिकेट खेळताय, येथे लोक देवाच्या दर्शनास येत-जात आहेत, तसेच …

Read More »

किल्ले बनविण्यात बच्चेकंपनी दंग

अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा अन् उत्साहाचा. लहान मुलांना फटाके, फराळाचे जेवढे आकर्षण असते तितकेच किल्ले बनवण्याचेही असते. आजकाल बाजारात तयार किल्ले उपलब्ध असले, तरी मातीचे किल्ले बनवण्याची मजा काही औरच. जिल्ह्याच्या अनेक भागात दिवाळीच्या दिवसांत बच्चेकंपनी किल्ले बनविण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात …

Read More »

आमदार महेंद्र दळवींनी हाकली जीवा-शिवाची बैलजोड

अलिबाग : प्रतिनिधी गाडीवालं दादा… गाडीवालं दादा होऽऽऽऽऽ! अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र दळवी यांनी सोमवारी (दि. 28) गाडीवालं दादाची भूमिका साकारताना चक्क बैलगाडी हाकलण्याचा आनंदही लुटला. रंगीत टी-शर्ट… एका हातात कासरा, एका हातात काठी घेऊन आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग तालुक्यातील नवगाव-वायशेत मार्गावर बैलगाडी पळवली. त्यांचे हे गाडीवाल्या …

Read More »

रविशेठ यांच्या विजयाने विकासाची दारे पुन्हा खुली झाली -वसंत मोकल

नागोठणे : प्रतिनिधी 10 वर्षांपासून ठप्प झालेल्या शिहू विभागाच्या विकासाची दारे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांच्या विजयाने पुन्हा एकदा खुली झाली असल्याचा विश्वास पेण तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष वसंत मोकल यांनी व्यक्त केला. नागोठणे विभागात पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायतीत सध्या विरोधी पक्षाची सत्ता आहे, तर जिल्हा परिषदेचे सदस्यसुद्धा विरोधी …

Read More »

साखर आदिवासीवाडीत मिठाई भेेट; शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुपचा उपक्रम

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील साखर आदिवासीवाडीतील बांधवांना मिठाई व फराळाचे वाटप करून पोलादपूर शहरातील शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुप या संघटनांच्या सदस्यांनी आगळीवेगळी दिवाळी पहाट साजरी केली. येथील शिवप्रतिष्ठान व टायगर ग्रुप या संघटनांनी दिवाळीनिमित्त साखर आदिवासीवाडीतील प्रत्येक घरामध्ये मिठाई आणि फराळाचे वाटप केले. या उपक्रमात शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद चव्हाण, टायगर …

Read More »