नागोठणे : प्रतिनिधी प्लास्टिक पिशवीचा वापर न करण्यासंदर्भात नागोठणे ग्रामपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून यासंदर्भात कडक अंमलबजावणी करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी स्पष्ट केले. शासनाच्या निर्देशानुसार नागोठणे ग्रामपंचायतीची प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावरील विशेष ग्रामसभा 17 सप्टेंबरला येथील ग्रामसचिवालयात घेण्यात आली होती. त्यात 50 …
Read More »Monthly Archives: October 2019
मिठेखारची दुर्गामाता
रेवदंडा : प्रतिनिधी मिठेखार येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत असून, परिसरातील भाविक श्रध्दा व भक्तिभावाने दुर्गामातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करीत आहेत. साळाव येथील बिर्ला मंदिरपासून सुमारे एक किमी अंतरावर मिठेखार गाव वसले आहे. गावात प्रवेश करतानाच दुर्गामातेच्या मंदिराचा कळस नजरेस पडतो. गावाच्या उजव्या दिशेला दुर्गामातेचे भव्यदिव्य …
Read More »तोतया व्यक्ती उभी करून जमिनीची विक्री
माणगावात 10 आरोपींवर गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कोस्ते गावामधील एका महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा व्यवहार करताना 19 मार्च 2016 रोजी माणगाव दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया महिलेला उभे करून त्या जमिनीची विक्री करण्यात आली. या प्रकरणी वर्धन वसंत भावे (45, रा. पुणे) यांनी फिर्याद दिल्यानंतर 10 आरोपींवर माणगाव पोलीस …
Read More »बोरघाटात तीन वाहनांचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी बोरघाट उतरताना बुधवारी (दि. 2) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खोपोली बायपास रस्त्यावरून शीळफाट्याकडे येणार्या कंटेनरचे मिळगाव येथील उतारावर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या कंटेनरने पुढील एक टेम्पो व ट्रकला जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात ट्रक उलटल्याने ट्रकमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. पुण्याकडून खोपोलीमार्गे मुंबईकडे जाणार्या …
Read More »पेणमध्ये स्वच्छता श्रमदान मोहीम
पेण : प्रतिनिधी येथील नगर परिषदेतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता हीच सेवा मोहीम राबविण्यात आली. या वेळी पेण शहरातील आरटीओ कार्यालय ते भोगावती नदीपर्यंत श्रमदान करून रस्त्याच्या कडेला पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला, तसेच नगर परिषद कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली. …
Read More »प्लास्टिकमुक्तीसाठी श्रमदानाद्वारे स्वच्छता करा
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी ’स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेच्या काळात विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांनी शहरातील शक्य त्या ठिकाणी श्रमदानाद्वारे स्वच्छता करावी, जेणेकरून शहरातील प्रत्येक कानाकोपरा प्लास्टिकमुक्त झाल्याचे दृश्य पाहायला मिळू शकेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ’स्वच्छता हीच सेवा’ ही …
Read More »उलवे विद्यालयात पोषण दिन उत्साहात साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त आणि पोषण दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे चेअरमन शरद खारकर हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील एस. के. यांनी प्रास्ताविक करून महात्मा गांधींच्या अहिंसा आणि असहकार या मूलतत्त्वाची माहिती दिली. स्वागत सांस्कृतिक विभाग …
Read More »पं. स. सदस्य व भाजप महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांनी न्हावे येथील गावदेवी मंदिर, गव्हाण येथील शांतादेवी मंदिर आणि पनवेल येथील दुर्गादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सोबत नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर आणि सहकारी महिला.
Read More »करंजाडे : गांधी जयंतीनिमित्त भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांच्या नियोजनाखाली आणि वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी व वडघर ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप मुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या वेळी कुमार गौरव, विश्वनाथ शेट्टी, प्रशांत गुजर आदी उपस्थित होते.
Read More »खारघर : पाटीदार समाजाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सोबत भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रिपाइं कोकण अध्यक्ष नगरसेवक जगदिश गायकवाड आदी.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper