2nd October 2019
महत्वाच्या बातम्या
पेठ गाव (खारघर) : येथील गणेश हरिदास जोशी यांची भाजप युवा मोर्चा पनवेल महापालिका उपाध्यक्षपदी, रूपेश विलास तेलवणे यांची प्रभाग क्रमांक 3च्या चिटणीसपदी आणि रणजित बाळकृष्ण घरत यांची भाजप ओवे शहर सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिघांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सोबत महापालिका …
Read More »
2nd October 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
गव्हाण ः रामप्रहर वृत्त भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजच्या वतीने प्लास्टिक व थर्माकोलमुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान राबविण्यात आले. प्रथम विद्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री …
Read More »
2nd October 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त कै. बाळाराम धर्मा पाटील शिक्षण संस्था संचालित सुषमा पाटील विद्यालय अॅण्ड ज्युनि. कॉलेज, कामोठे येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महानगरपालिकेकडून भव्य स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ भारत, सुंदर भारत, प्लास्टिकमुक्त भारत कामोठा परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली. महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून रॅलीस प्रारंभ …
Read More »
2nd October 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ, सुंदर आणि हरित पनवेल देण्याचा संकल्प पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचा तिसरा वर्धापन दिन साजरा करताना मंगळवारी (दि. 1) केला. आचारसंहिता असल्याने ज्येष्ठ कर्मचार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पनवेल महापालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. त्याला या वर्षी …
Read More »
1st October 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या पाच वर्षांत जे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले तेवढेही काम शेकापने गेल्या 50 वर्षांत केलेले नाही. केवळ विरोधाला विरोध करून पनवेलला जागतिक नकाशावर नेण्याऐवजी पडद्यामागे ढकलण्याचे उद्योग करणार्या शेकाप नेत्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या कामानेच सणसणीत चपराक लगावून पनवेलचे नाव जागतिक नकाशावर नेण्याचे …
Read More »
1st October 2019
देश-विदेश, महत्वाच्या बातम्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 125 जागांची यादी मंगळवारी (दि. 1) जाहीर केली. भाजप नेते अरुण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यात 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून, पहिल्या यादीत 12 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …
Read More »
1st October 2019
महत्वाच्या बातम्या
पनवेल : येथील महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड यांचा सभापतिपदाचा यशस्वी कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे नगरसेविका कुसुम म्हात्रे यांनी महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी नगरसचिव विलासराव खापर्डे यांच्याकडे दाखल केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण …
Read More »
1st October 2019
महत्वाच्या बातम्या, मुंबई - नवी मुंबई
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जास्तीत जास्त सभा घेण्यावर भाजपने भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात त्यांच्या सभांचा धडाका पाहावयास मिळणार आहे. महाराष्ट्राबरोबरच हरियाणातही विधानसभेची निवडणूक होणार आहे, पण भाजपने महाराष्ट्रातील निवडणुकीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित …
Read More »
1st October 2019
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेशाचे प्रमाण वाढताना दिसत असून, वाजे येथील शेकाप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. 1) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. पनवेल येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रभाग क्रमांक 20चे …
Read More »
1st October 2019
महत्वाच्या बातम्या, रायगड
कर्जत : प्रतिनिधी कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुरेश लाड यांनी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. आर्थिक बाजू आणि काही भागात पक्षाचेच कार्यकर्ते आपली अडवणूक करीत असल्याचे त्यांनी मंगळवारी (दि. 1) तातडीच्या बैठकीत सांगून एकच खळबळ उडवून दिली. दरम्यान, आमदार लाड न लढल्यास सध्या शिवसेनेत असलेले सुरेश …
Read More »