माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जांभुळवाडी गावाच्या हद्दीत पुलाजवळ अंदाजे 50 ते 55 वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून माणगाव पोलीस तिच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. या घटनेतील महिलेच्या डोक्याला जुनी जखम झालेली असून त्यावर उपचार न केल्याने ही महिला मृत स्थितीत आढळून आली. तिचे …
Read More »Monthly Archives: October 2019
आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभिनंदन
पनवेल : सलग तिसर्यांदा विजय साकारणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विविध मान्यवरांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.
Read More »कोकण रेल्वे होणार सुसाट, दुपदरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू, क्रॉसिंग यंत्रणेमुळे गाड्यांना मिळणार गती
माणगाव : प्रतिनिधी कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. त्याचबरोबर पाच नवीन क्रॉसिंग यंत्रणा उभारण्यात येत असून, इंदापूर (जि. रायगड) रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवण्याचे आणि क्रॉसिंग यंत्रणा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या सुसाट धावतील, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत. …
Read More »अलिबाग-मुरूड रस्त्यावरील खड्डे शेकापला भोवले
अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येत आहे, परंतु 2019 विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त करून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार पंडितशेठ पाटील यांचा दारुण पराभव केला आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही शेकाप विरुद्ध शिवसेना यांच्यात होऊन इतर …
Read More »सोने चमकतच आहे
जगातील अनेक विकसित देश अमेरिकन डॉलरसाठी पर्याय निवडण्याच्या प्रयत्नात आहेत, सोन्याच्या भावात इतकी तेजी येण्याचे हे एक कारण आहे. त्याव्यतिरिक्त सोन्याच्या किमती वाढण्याचे दुसरे कारण म्हणजे अमेरिका आणि चीन यांच्यातील वाढत्या व्यापारीयुद्धातही आहे. त्यामुळे जागतिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी हाच गुंतवणूकदारांना योग्य पर्याय वाटतो आहे. …
Read More »कर्ज थकवल्याने धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर बँकेचा ताबा
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मुंडे यांची नाचक्की झाली आहे. पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीतील धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर …
Read More »सोने विकले नाही : आरबीआय
मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँकेकडील (आरबीआय) सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला असून, बँकेने जुलैपासून बाजारात 1.15 अब्ज डॉलर सोनेविक्री केली आहे, असे वृत्त माध्यमांमध्ये पसरले होते, मात्र आरबीआयने हे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही सोन्याची विक्री किंवा कोणताही व्यापार केलेला नाही, असे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेने तीन दशकांनंतर …
Read More »हरयाणात खट्टर पुन्हा मुख्यमंत्री, चौटालांनीही घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
चंदीगड : वृत्तसंस्था मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी (दि. 27) सलग दुसर्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जननायक जनता पक्षाचे (जजप) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा, …
Read More »शेकापचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे, कामगार नेते महेंद्र घरत यांचा सल्ला
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्ह्यात पानिपत झाले. शेकाप हा अलिबाग व पेण मतदारसंघ आपले बालेकिल्ले समजत होता, मात्र तेही ढासळले. आता काही राहिले नाही. तेव्हा पुढे सन्मानाने राजकारण करता यावे म्हणून जयंत पाटील यांनी शेकापचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावे, असा सल्ला काँग्रेसचे नेते …
Read More »नवीन पनवेलमध्ये साकारला किल्ले श्री राजगड; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : दादाराम मिसाळ नवीन पनवेलमध्ये शनिवारी सायंकाळी शिवशाही अवतरली. निमित्त होते राजे शिवराय प्रतिष्ठानने साकारलेल्या ‘किल्ले श्री राजगड’ प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्याचे. मराठीतील कलाकार, शिवव्याख्याते सौरभ करडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. सिडको आरक्षित पोलीस मैदान, नवीन पनवेल, सेक्टर 7 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper