Breaking News

Monthly Archives: November 2019

पनवेल मनपातर्फे संविधान दिन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक, नगरसेविकांसह प्रमुख वक्ते …

Read More »

संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्गार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजचा 26 नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण विधिवत संविधान स्वीकारले होते. संविधान आमच्यासाठी सर्वांत मोठा ग्रंथ आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 26) काढले. संविधान दिनानिमित्त ते संसदेमध्ये बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, भारताचे संविधान आपल्याला नागरिकांना …

Read More »

भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन साजरा

पनवेल : येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारताचा संविधान दिन मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, शहर सरचिटणीस …

Read More »

अमरदीप बालविकास फाऊंडेशनचा दीपोत्सव सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त तारा येथील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित दीपोत्सव 2019 या कार्यक्रमाचे आयोजन अमरदीप बालविकास फाऊंडेशन आणि युसूफ मेहेरअली सेंटर तारा यांच्या वतीने तारा तेथील भानूबेन प्रवीण शहा हायस्कूलच्या हॉलमध्ये रविवारी (दि. 24) करण्यात आले होते. या कार्यक्रमात गीत, संगीत आणि नृत्य यांचा अनोखा संगम असलेला ‘करू …

Read More »

सीकेटी महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिन मंगळवारी (दि. 26) उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. रॅली नंतर महाविद्यालयामध्ये शहीद …

Read More »

खांदा वसाहतीत आणखी एक उद्यान होणार

सभापती संजय भोपी यांचे सिडकोला मागणीचे पत्र पनवेल : प्रतिनिधी खांदा वसाहतीत काही उद्याने आहेत, मात्र ती अपुरी पडत आहेत. येथील रहिवाशांची गैरसोय दूर व्हावी याकरिता सेक्टर 8मधील उद्यानाकरिता राखीव असलेल्या भूखंडाचा विकास करावा, अशी मागणी प्रभाग समितीचे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे केली आहे. त्यांनी याबाबत कार्यकारी अभियंत्याला निवेदन …

Read More »

सिडको महागृहनिर्माण योजनेची सोडत

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजनेतील 9,249 आणि स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 810 घरांसाठीची संगणकीय सोडत मंगळवारी (दि. 26) रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवन येथे सकाळी 11.00 वा. यशस्वीरीत्या झाली. सदर सोडतीच्या निकालाचे थेट प्रेक्षपण वेबकास्टिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे अर्जदारांना घरबसल्या संपूर्ण सोडत …

Read More »

कधी फुटणार वाहतूक कोंडी?

पनवेल रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला सिडकोने नवीन पनवेल वसाहत बनवली. या वेळी सिडकोच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी भविष्यात होणार्‍या विकासाचा वेध न घेतल्याने आज नवीन पनवेलमध्ये वाहतुकीची समस्या भीषण झाली आहे. त्यातच परिवहन खात्याने रिक्षांचे परवाने खिरापतीसारखे वाटले. त्याचे परिणाम पनवेल रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.वाहतूक पोलीसांची …

Read More »

प्रदूषणाची जबाबदारी

स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने सोमवारीच सर्वात प्रदूषित अशा देशातील दहा परिसरांची यादी जारी केली आहे. या सर्व ठिकाणी पीएम 10 या प्रदूषकाची पातळी 500च्या वर आहे. यात छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमधील ठिकाणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणाचा समावेश या यादीत नसला तरी त्याचा अर्थ आपल्याकडील हवा …

Read More »

गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

पनवेल : वार्ताहर गांजा जवळ बागळल्याप्रकरणी तिघा जणांना तक्का परिसरातून विशेष पथकाने आज ताब्यात घेतले आहे. तक्का परिसरातील काही इसमांजवळ गांजा असल्याची खबर अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला मिळताच या पथकाचे प्रमुख पोेलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून या तिघा इसमांना ताब्यात घेतले आहे व …

Read More »