Breaking News

Monthly Archives: November 2019

शपथविधी काळोखात नव्हे, रामप्रहरी झाला; रामाला विसरलेल्यांनी शिकवू नये!, भाजप नेते आशिष शेलार यांचा राऊतांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी आम्ही सकाळी 6 वाजता शाखेत जाणारे स्वयंसेवक आहोत. हा रामप्रहर असतो. शपथविधी रामप्रहरी झाला. या वेळेत सगळी चांगलीच कामे केली जातात, पण जे रामालाच विसरले त्यांना हे काय कळणार? चोरून केलेले काम कोणते हे त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दांत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना …

Read More »

‘येत्या काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार’

मुंबई : आगामी काळात शिवसेनेत मोठा भूकंप होणार आहे. शिवसेनेचा एक गट भाजपला येऊन मिळणार, असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही भाजपलाच पाठिंबा देतील, असा गौप्यस्फोट भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा हे अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील आमदार असून, ते विधानसभेवर तिसर्‍यांदा निवडून आले आहेत. …

Read More »

‘इफ्फी’मध्ये घोडचूक

सत्यजीत रे यांच्याऐवजी दुसर्‍याचा फोटो पणजी : वृत्तसंस्था सध्याच्या घडीला गोव्यात सुरू असणार्‍या 50व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी 2019मध्ये एक भलताच प्रकार घडल्याचे उघडकीस आले. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. इफ्फीच्या संकेतस्थळावर झालेली ही चूक लक्षात येताच अनेकांना धक्का बसला. संकेतस्थळावर एका विभागात गतकाळातील काही लोकप्रिय आणि दिग्गज …

Read More »

रितेश-जेनेलियाच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री रितेश देशमुख आणि त्याची मॉडेल-अभिनेत्री पत्नी जेनेलिया डिसुझा यांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीला स्टार किड्सने हजेरी लावली. अर्थातच, त्यांचे पालकही या वेळी उपस्थित होते. मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या अभिनेता रितेश देशमुख याच्या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू असतानाच त्याची मुले आणि संपूर्ण कुटुंबसुद्धा …

Read More »

रोटरी क्लबच्या वतीने सायकल वाटप

कर्जत ः प्रतिनिधी पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यामंदिर विद्यालयात अनेक गावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, परंतु गावांमधून येणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी चार ते पाच किलोमीटरची पायपीट करावी लागते. ज्या गावात रिक्षा, एसटी जात नाही अशा गावांमधील गोरगरीब, गरजू सुमारे 50 मुलींना रोटरी क्लब ऑफ देवनार यांच्या वतीने शनिवारी सायकलचे वाटप करण्यात …

Read More »

नलक्षवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ

दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी एक डम्पर आणि जेसीबीसह नऊ वाहने पेटवून दिली. या अगोदर झारखंडमध्ये लातेहार जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी 13 नोव्हेंबर रोजी छत्तीसगड येथील सुकमामधील गचनपल्ली गावात डीआरजी (डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्स)कडून करण्यात आलेल्या कारवाईत एक लाखाचा इनाम असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला …

Read More »

फडणवीस सरकारकडून शेतकर्यांना मदत मिळेल : विखे-पाटील

नगर : प्रतिनिधी ओल्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला मदतीची अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडूनच होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांना भरघोस मदतीची असलेली अपेक्षा पूर्ण होईल, असा विश्वास माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 70वा गळीत …

Read More »

खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर सुनावणी सुरू होण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय खासदार संजय काकडे यांनी ‘सिल्व्हर ओक’ला येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. काकडे यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना वेग आला आहे, मात्र आपली ही खासगी भेट असून, …

Read More »

भावी पत्नीच्या उपचारासाठी पतीचे संस्थांना आवाहन

पनवेल : वार्ताहर हुंड्यासाठी मुलीचा छळ केल्याची अनेक प्रकरणे आपल्या कानावर येतात. लग्नानंतर मुलीसह तिच्या कुटुंबीयांना धमकाविण्याचे प्रकार समाजात आजही पाहावयास मिळत असताना पनवेलमधील हरिग्राम येथे राहणार्‍या विजय मोरे या तरुणाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. अश्विनी पंढरीनाथ शेळके (26) या तरुणीसोबत जमलेल्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच तिचे …

Read More »

तळोजा एमआयडीसीत वृक्षतोड; पनवेल महानगरपालिकेकडे तक्रार

कळंबोली ः वार्ताहर एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश सरकारकडून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड केली जात असून, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या वृक्षतोडीविरोधात पनवेल महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. पर्यावरणाचा र्‍हास रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वृक्षारोपणाचा संकल्प करून ‘झाडे लावा, …

Read More »