पनवेल : बातमीदार वयोवृद्ध महिला व पुरुषांना एकटे असल्याचे पाहून व त्यांना बोलण्यात गुंतवून फसवणूक करणार्या आरोपींपैकी एका आरोपीला खांदेश्वर पोलिसांनी उत्तराखंड येथून अटक केली आहे. त्याच्यावर तब्बल दीडशेहुन अधिक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी कडून तीन लाख 61 हजार रुपयांचे 12 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत …
Read More »Monthly Archives: November 2019
अॅड. मनोज भुजबळ यांची फुटपाथ दुरुस्तीची मागणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 15 मधील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील तुटलेले पेव्हर ब्लॉक आणि गटारावरील तुटलेली झाकणे त्वरित बदलण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी केली आहे. नवीन पनवेल सेक्टर 15 मधील रेल्वे स्टेशन समोरील गार्डनजवळील शौचालयासमोरील फुटपाथवरील पेव्हर ब्लॉक तुटलेले आहेत. याशिवाय तेथील गटारावरील झाकणे तुटलेली …
Read More »वेश्याव्यवसाय करणार्या महिलांवर कारवाई, नगरसेविका दर्शना भोईर यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : बातमीदार पनवेल शहरातील शिवाजी चौक ते आंबेडकर चौक, तसेच बसस्थानकाबाहेर वेश्याव्यवसाय करणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याच्या तक्रारी पनवेल पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी गुरुवारी (ता. 21) या महिलांची धरपकड केली. या कारवाईत सहा महिलांना ताब्यात घेण्यात …
Read More »डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृतीची गरज, -डॉ. तुषार गावंड यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी रायगडमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. मुख्यत्वे पावसाची अखेर व हिवाळयाची सुरूवात या काळात फैलावणार्या या आजारावर मात करण्यासाठी स्वच्छता आणि त्यासाठी लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून जनतेने आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. ग्रामपंचायतींनी ‘स्वच्छतेतून आरोग्यम धनसंपदे‘ कडे वाटचाल करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन डॉ.तुषार गावंड …
Read More »आजपासून वरसोलीची जत्रा
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील वरसोली येथील आंग्रेकालीन विठोबाची जत्रा उत्पत्ती एकादशीपासून म्हणजे शुक्रवारपासून 22 ते 26 नोव्हेंबर अशी पाच दिवस भरणार आहे. संबंधित देवस्थान विश्वस्त समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, देवस्थानचे सेवेकरी, विविध व्यवस्थेसाठी व तयारीसाठी जोरदारपणे कामाला लागले आहेत. या जत्रेसाठी केवळ परिसरातीलच नव्हे तर राज्याच्या अनेक भागातून भाविक मोठया …
Read More »खेळाच्या माध्यमातून जीवनात यश मिळवता येते -आरेकर
मुरूड : प्रतिनिधी शरीर ही आपली महत्त्वाची संपत्ती असून, खेळ हे शरीर सुदृढ करण्याचे साधन आहे. जीवनात यश मिळवायचे असेल तर खेळ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन मुरूड नगर परिषदेचे पर्यटन सभापती पी. के. आरेकर यांनी येथे केले. सर एस. ए. हायस्कूल व स्व. म. ल. दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा …
Read More »विस्तार शिक्षण संचालकांची कृषी विज्ञान केंद्राला भेट
रोहे : प्रतिनिधी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी नुकताच किल्ला-रोहा येथील कृषि विज्ञान केंद्राला भेट देऊन तेथील कार्याची पहाणी केली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी डॉ. संजय भावे यांचे स्वागत केले व प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या व कृषि …
Read More »नियोजन विभागाचे काम आता पेपरलेस
अलिबाग : प्रतिनिधी नियोजन विभागाचा संपुर्ण कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत केले जाणार आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार आहेत. परिणामी …
Read More »नागोठण्यातील बिल्डरविरोधात ’महारेरा’कडे तक्रार, आज मुंबईत सुनावणी
नागोठणे : प्रतिनिधी बांधकाम चालू करण्यापूर्वी ’महारेरा’कडे नोंदणी केली नसल्याचा ठपका ठेवत येथील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली असून, उद्या शुक्रवारी (दि. 22) मुंबईत सुनावणी घेण्यात येणार आहे. एखाद्या बिल्डरचे विरोधात नागोठण्यातून महारेराकडे पहिल्यांदाच अशी तक्रार झाली असल्याने निर्णय कसा असेल, याकडे येथील जनतेचे लक्ष केंद्रित …
Read More »मुरुड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधी सदस्यपदाच्या पोटनिवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी फक्त नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी (3 सदस्य), एकदरा (8 सदस्य), सावली, वावडुंगी, चोरडे, आणि नांदगाव (प्रत्येकी एक सदस्य) या सहा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यापैकी नादगांव ग्रामपंचायतीच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper