Breaking News

Monthly Archives: November 2019

राजेश्वरी कुमारीचा नेमबाजीत राष्ट्रीय विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंजाबच्या राजेश्वरी कुमारी हिने 63व्या राष्ट्रीय शॉटगन नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात राष्ट्रीय विक्रम नोंदविला. भारतीय राष्ट्रीय रायफल असोसिएशनने त्यावर मोहोर उमटवली आहे. पात्रता फेरीत राजेश्वरीने 125 पैकी 118 गुणांची कमाई केली होती. तिचा हा विक्रम सीमा तोमर, श्रेयसी सिंग आणि मनीषा कीर यांनी संयुक्तपणे …

Read More »

एक्स्प्रेस वेवर तीन कार एकमेकांना धडकल्या

मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्याच्या पुढे पुणे लेनवर तीन कार एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला. यात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. पुढील कारला ओव्हरटेक करताना कार अनियंत्रित झाली व दुसर्‍या लेनवर गेली. दरम्यान, त्या लेनवर …

Read More »

बीएसएनएल सेवेचा मुरूडमध्ये बोजवारा

इंटरनेटअभावी पोस्टाचा कारभार ठप्प मुरूड : प्रतिनिधी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची मुरूडमधील सेवा वारंवार खंडित होत असून, त्याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने ही सेवा दिवसेंदिवस त्रासदायक ठरू लागली आहे. 11 नोव्हेंबरपासून बीएसएनएलची नेट सेवा बंद असल्याने मुरूड पोस्ट ऑफिसमधील सर्व कारभार ठप्प झाला आहे. तसेच शेकडो मोबाइल बंद …

Read More »

टीम इंडिया कोलकातामध्ये दाखल

पारंपरिक पद्धतीने दणक्यात स्वागत कोलकाता : वृत्तसंस्था भारत आणि बांगलादेश या दोनही संघांसाठी पहिला दिवस-रात्र कसोटी सामना येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. हे सामने गुलाबी चेंडूने खेळावे लागतात. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि 130 धावांनी धूळ चारली. त्यानंतर दुसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघ मंगळवारी (दि. …

Read More »

‘माथेरानच्या राणी’ची पर्यटकांना प्रतीक्षा!

कर्जत : बातमीदार जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या माथेरानला जगाच्या कानाकोपर्‍यातून पर्यटक भेट देतात. वाहनांना बंदी असल्यामुळे पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ अशी माथेरानची ख्याती आहे. येथील ’माथेरानची राणी’ म्हणजे मिनीट्रेन. या मिनीट्रेनचा आनंद घेण्यासाठी परदेशातूनसुद्धा पर्यटक येतात, पण गेल्या काही महिन्यांपासून या रेल्वेमार्गामध्ये आलेल्या अडथळ्यांमुळे माथेरानची राणी यार्डात विश्रांती घेत आहे. त्यामुळे …

Read More »

सावरकरांना ‘भारतरत्न’साठी शिफारशीची गरज नाही

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 19) एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्रालयाने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील सूचक वक्तव्य केले. भारतरत्नसाठी अनेक शिफारशी येत असतात, मात्र सावरकरांना हा …

Read More »

ओवे कॅम्प गावठाणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन पनवेल : रामप्रहर वृत्त ओवे कॅम्प (कोयना प्रकल्पग्रस्त) ग्रामस्थांचा प्रलंबित असलेला गावठाणाचा प्रश्न संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करून मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) ग्रामस्थांच्या बैठकीत दिले. ओवे कॅम्प ग्रामस्थांचा 15 एकर 20 गुंठे जमीन असलेल्या गावठाणाचा प्रश्न …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादी बैठक लांबणीवर

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी आकाराला येत असतानाच नेत्यांच्या चर्चा, बैठका आणि खलबतांमुळे विलंब होत आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी (दि. 19) होणारी बैठकही पुढे ढकलण्यात आल्याने ही सत्ताकोंडी नेमकी फुटणार कधी, असा प्रश्न राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे. काँग्रेस …

Read More »

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सव

नवीन पनवेल : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या वतीने शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत मंगळवारी अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट उरण ः येथील …

Read More »

नामदेव पाटील आणि फुलाजी ठाकूर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप नेते नामदेव पाटील आणि फुलाजी ठाकूर यांचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, रवी जोशी, प्रकाश भगत, पुष्पा पाटील, लक्ष्मण पाटील, गुरू ठाकूर, कल्पेश ठाकूर, बिनदेश ठाकूर, उमेश मौर्य, भगवान सावंत …

Read More »