पनवेल : वार्ताहर प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न करू, असे ठोस आश्वासन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 29) या संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांना दिले. प्रहार संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष सुरेश मोकल यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्यांनी …
Read More »Monthly Archives: November 2019
कर्जतमध्ये रानडुकरांचा उच्छाद, बेकरे गावात 50 एकरवरील भातपिकाचे नुकसान
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील जंगलाला लागून असलेल्या बेकरे गावात रानडुकरे मुक्तपणे संचार करीत असून, रात्रीच्या वेळी भातशेतीचे नुकसान करीत आहेत. आतापर्यंत 13 शेतकर्यांच्या एकूण 50 एकर जमिनीवरील भातपीक डुकरांनी तुडवून टाकले आहे. या नुकसानीची शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. बेकरे या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या गावाला जंगलाचा वेढा …
Read More »अभिनंदन! शिरढोण (ता. पनवेल) : निकिता जगदीश चौधरी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार महेश बालदी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »रसायनीजवळ भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू
मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी सांगली येथे विवाह सोहळा आटोपून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परतणार्यांची स्विफ्ट कार टँकरला धडकून कारमधील तीन महिला व चालक असे चार जण जागीच ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ शुक्रवारी (दि. 29) पहाटे 5च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. …
Read More »पनवेल आरटीओचा बडगा
1735 चालकांवर कारवाई ; नियमांचे उल्लंघन केल्याने ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित पनवेल : बातमीदार सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या चालू वर्षात 1 एप्रिल ते 31 ऑक्टोबर 2019 या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 1735 वाहनचालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले. यात मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन …
Read More »वळसे-पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 29) पदभार स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी (दि. 29) उद्धव …
Read More »आगरदांडा पोर्ट विकासाच्या ‘मार्गा’वर
केंद्र व राज्य शासनाची गुंतवणूक असणार्या महत्त्वाकांशी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून सन 2020 पर्यंत आगरदांडा बंदरातील सर्व कामे पूर्ण झालेली दिसून येतील व दिघी बंदरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठ्या जहाजांची रेलचेल सुरू होणार आहे. सुमारे 3500 कोटीची गुंतवणूक असणारा आगरदांडा व दिघी प्रकल्पामध्ये जेएनपीटीच्या धर्तीवर या बंदराचा विकास करण्यावर …
Read More »पाण्याची घंटा योग्यच
अनेकदा, एखाद्या तहानलेल्या मुलाने वर्गात पाणी पिऊ का असे विचारल्यावर शिक्षकांकडून ‘सुटीत का नाही प्यायलास, आता तास पूर्ण झाल्यानंतरच पिता येईल’ वगैरे शिस्तीच्या नावाखाली सुनावले जाते. हे असे होण्याऐवजी सर्व मुलांना एकत्रितपणे पाणी प्यायला विशिष्ट वेळ नेमून देणे मुलांकरिता सोयीचेच ठरेल. अडीच-तीन वर्षांच्या मुलांना आताशा शाळेत धाडले जाते ते मुळात …
Read More »विमानतळबाधितांना अंतिम मुदत
15 डिसेंबरपर्यंत गावे रिकामी करण्याचे आदेश पनवेल : बातमीदार नवी मुंबई विमानतळासाठी विस्थापित होणार्या 10 गावांपैकी सात गावांतील ग्रामस्थांनी स्वतःची घरे पूर्णपणे पाडलेली नाहीत. उलवे, तरघर, कोंबडभुजे गावांतील 70 टक्के ग्रामस्थांचाही यात समावेश आहे. ग्रामस्थांनी स्वत:ची घरे पाडून गावे रिकामी करावीत, यासाठी सिडकोकडून अनेकदा अंतिम मुदत देण्यात आली, मात्र ही …
Read More »आरे मेट्रो कारशेडच्या स्थगितीवर भाजपची टीका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि 15 वर्षात आधीच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper