Monthly Archives: November 2019

श्रीलंका 10 वर्षांनी पाकमध्ये खेळणार दोन कसोटी सामने

इस्लामाबाद : वृत्तसंस्था श्रीलंकेने डिसेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामने खेळणार असल्याचे निश्चित केले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये एका दशकापेक्षाही मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चषकाचाच एक भाग असेल. वन डे कर्णधार दिमुथ करुणारत्ने आणि टी-20 कर्णधार लसिथ मलिंगासह 10 वरिष्ठ खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव …

Read More »

निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, जय भारत, लालबाग स्पोर्ट्सची आगेकूच

मुंबई ः प्रतिनिधी जय भारत क्रीडा मंडळ, साऊथ कॅनरा स्पोर्ट्स क्लब, श्री गणेश क्लब, लालबाग स्पोर्ट्स, जय खापरेश्वर क्रीडा मंडळ, नवोदित संघ यांनी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात तिसरी फेरी गाठली. वडाळा-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या …

Read More »

एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा, झ्वेरेव्हकडून नदाल पराभूत

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याकडून पराभूत व्हावे लागल्यामुळे स्पेनच्या राफेल नदालचे एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र तरीही नदालचे एटीपी क्रमवारीतील अग्रस्थान अबाधित राहणार आहे. राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत आंद्रे आगासी या गटातून स्टेफानोस त्सित्सिपासने पहिले, तर झ्वेरेव्हने दुसरे स्थान पटकावत उपांत्य …

Read More »

क्रिकेटपासून दूर गेलेला धोनी खेळतोय गोल्फ

रांची : वृत्तसंस्था भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासूनच क्रिकेटपासून दूर आहे. एकीकडे धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत असते, तर दुसरीकडे धोनी हा नेहमीच ‘कूल’ असतो. नुकताच धोनीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यात तो केदार जाधव, माजी गोलंदाज आरपी सिंह यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसत …

Read More »

मैदानात शिवीगाळ; गोलंदाजाला दिली शिक्षा

सिडनी : वृत्तसंस्था मैदानातच खेळाडूला शिवीगाळ करणे ऑस्ट्रेलियाच्या जलदगती गोलंदाजाला महागात पडले आहे. सामना सुरू असताना खेळाडूबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटिन्सन याला निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध येत्या आठवड्यात सुरू होणार्‍या पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात येत्या आठवड्यापासून कसोटी सामना सुरू …

Read More »

विराटवर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने उधळली स्तुतिसुमने

इंदूर : वृत्तसंस्था पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश विरूद्ध एक डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. दुसर्‍या डावात मोहम्मद शमीने घेतलेले चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांची मिळालेली साथ याच्या बळावर भारताने दणदणीत विजय मिळवला. मयांक अग्रवालने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली होती. त्यानंतर डोंगराएवढ्या आव्हानाचा …

Read More »

किदम्बीचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिगरमानांकित किदम्बी श्रीकांतने कडवी झुंज देत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. पण हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात त्याला शनिवारी (दि. 16) अपयश आले. श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊ याच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले. गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणार्‍या श्रीकांतने दुसर्‍या गेममध्ये सहा गेमपॉइंट …

Read More »

विराटने मोडला धोनीचा आणखी एक विक्रम!

इंदूर : वृत्तसंस्था सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारताने बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला. या विजयाबरोबरच विराट प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा डावाने मात देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दहावेळा प्रतिस्पर्धी संघाचा डावाने धुव्वा उडवला …

Read More »

महड येथे बँकेत आग; मोठे नुकसान टळले

खोपोली ः प्रतिनिधी खालापुरातील महड गावात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी संध्याकाळी शार्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत संगणक तसेच फर्निचर जळाले असून बँक बंद असल्याने सुदैवाने अनुचित प्रकार घङला नाही. आग तातङीने विझवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. महड भक्त निवासाच्या इमारतीत बँकेची शाखा असून शनिवारी संध्याकाळी पावणेसातच्या …

Read More »

किरवली ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांना धनादेश वाटप

कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायतमधील 21 दिव्यांग बांधवांसाठी आपल्या पाच टक्के निधीतून 50 टक्के अपंग असणार्‍यांसाठी चार हजार व  50 टक्केवरील अपंगत्व असणार्‍या बांधवांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपयांचा धनादेश देऊन विशेष सहाय्य करण्यात आले. गुरुवारी सकाळी 11 वाजता किरवली ग्रामपंचायतीच्या झालेल्या मासिक बैठकीत किरवली ग्रामपंचायत हद्दीतील किरवली, देऊळवाडी, …

Read More »