पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड शटलर्स बॅडमिंटन अॅकॅडमीच्या वतीने इन हाऊस बॅडमिंटन टुर्नामेंट 2019चे आयोजन नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय येथे शुक्रवारी (दि. 15) करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी रायगड बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष …
Read More »Monthly Archives: November 2019
भारताचा बांगलादेशवर डावाने विजय
इंदूर : वृत्तसंस्था बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने एक डाव 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करीत बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावांवर संपुष्टात आणला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंदूर येथील होळकर मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला. फलंदाजी …
Read More »खंडाळा घाटाची वाट बिकट
सांग कसो दिसतो खंडाळ्याचो घाट, असे वर्णन कवींनी खंडाळा बोरघाटाचे केले आहे. सुंदर, देखणा नेत्रांना सुखावणारा खंडाळा घाट सध्या अपघातांच्या मालिकांनी पुन्हा चर्चेत आला आहे. हे अपघात निव्वळ मानवी चुका व यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळेच घडल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. युती शासनाने 2001मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार केला. त्याअगोदर मुंबई-पुणे …
Read More »अहिराणीचा सामाजिक अनुबंध
अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा अख्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादित असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक …
Read More »फत्तेशिकस्त
कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल. राजगडावर जिजामाता तर पन्हाळगडावर शिवाजीराजे आहेत. राजगडावर ताबा मिळवण्याचा शाहिस्तेखानाचा प्रयत्न जिजाऊ राजगडावरून युद्ध करून अयशस्वी करतात. लाल किल्ला आणि पुणे सध्या शाहिस्तेखानच्या (अनुप सोनी, सावधान इंडियावाला) ताब्यात आहे. नामदार खान (समीर धर्माधिकारी) हा …
Read More »जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी सिडको अनुकूल
पनवेल : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनी आणि कळंबोली वसाहतीतील अल्प उत्पादन गटातील घरांची अवस्था बिकट आहे. स्लॅब कोसळण्याचा घटना वाढतच चालल्या आहेत. याकडे प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी लक्ष वेधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. त्याची दखल घेत सिडकोने पुनर्विकासासाठी अनुकूलता दर्शवली आहे. कळंबोली, नवीन पनवेल आणि …
Read More »‘रायगडभूषण’ निवडीसाठी तज्ज्ञ समिती नेमणार
अलिबाग : प्रतिनिधी खिरापतीसारख्या देण्यात येणार्या रायगडभूषण पुरस्काराची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे, निवृत्तीवेतन धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पाहिल्या मंगळवारी पेन्शनर आदालत भरविणे, असे दोन महत्त्वाचे निर्णय शुक्रवारी (दि. 15) झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सभेत एकमताने घेण्यात आले. नियोजन भवन येथे ही सभा झाली. रायगडभूषण पुरस्कार एकाच व्यक्तीला दोनवेळा …
Read More »बाईक न दिल्याने विद्यार्थ्याने शाळेत पेटवून घेतले
पनवेल, कळंबोली : प्रतिनिधी, बातमीदार, शाळेत जायला वडिलांनी मोटरसायकल न दिल्याने एका अकरावीच्या विद्यार्थ्याने कळंबोली येथील सुधागड हायस्कूलच्या बाथरूममध्ये स्वतःला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 15) घडली. शिवम दीपक यादव (17) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो गंभीररीत्या भाजला आहे. त्याला ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. …
Read More »नुकसानग्रस्त शेतकर्यांना तत्काळ मदतनिधी द्यावा
देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 15) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना तातडीची मदत करण्यासाठी निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी या भेटीदरम्यान फडणवीस यांनी केली. त्यावर राज्यपाल …
Read More »माणगावमध्ये कंपनीत स्फोट : 18 कर्मचारी भाजले; पाच जण गंभीर
माणगाव : माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रात क्रिप्टझो कंपनीत शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी स्फोट होऊन लागलेल्या आगीत 18 कर्मचारी भाजले आहेत. जखमींना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. क्रिप्टझो कंपनी फायर ब्रिगेडसाठी आग विझवण्याची सिस्टीम बनविण्याचे काम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper