Breaking News

Monthly Archives: November 2019

मुरूडमध्येही बालदिन उत्साहात साजरा

मुरुड : प्रतिनिधी पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना येथील अंजुमन इस्लाम जंजिरामहाविद्यालयामध्ये गुरुवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी बालदिनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव  करण्यात आला. संस्थेचे खजिनदार अल्ताफ मलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते पं. नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. …

Read More »

बालदिनानिमित्त माथेरानच्या शाळांमध्ये कार्यक्रम

कर्जत : बातमीदार भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या बालदिनानिमित्त गुरुवारी (दि. 14) माथेरानमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, नगरपालिकेचे शिक्षण सभापती संदीप कदम व माजी शिक्षक सुनील कदम हे उपस्थित होते. माथेरान …

Read More »

विजेचा धक्का लागून माकड जायबंदी; प्राणीमित्र सरसावले

खोपोली : प्रतिनिधी शहरातील उषा नगरमधील समर्थ सोसायटी समोरील विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर गुरुवारी (दि. 14) सकाळी एका माकडाला विजेच्या धक्का बसून ते जबर जखमी झाले. त्या जायबंदी माकडाला सुरक्षितपणे काढून वाचवण्यासाठी येथील प्राणी मित्रांनी दोन तास मेहनत घेतली. विजेचा धक्का लागून माकड जायबंदी झाल्याची माहिती शहरातील प्राणी मित्र व अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी …

Read More »

खोपोलीत महिलेवर चाकूहल्ला

खालापूर : प्रतिनिधी खोपोली शिळफाटा येथून कामावरून घरी चाललेल्या एका महिलेवर बुधवारी (दि. 13) सायंकाळी तीन ते चार बिहारी तरूणांनी धारदार चाकूने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा केल्याने हल्लेखोर पळून गेले. सदर महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलांवर हल्ला करण्याची ही तिसरी घटना असल्याने शिळफाटा परिसरात …

Read More »

बिबट्याचे पुन्हा दर्शन, खालापुरातील नागरिकांत भीतीचे वातावरण

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील नावंढे गावातून केळवली रेल्वे स्थानकाकङे जाणार्‍या रस्त्यावर सोमवारी ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले होते. मात्र या बिबट्याने पावसाळी वाढलेल्या गवतातून धूम ठोकली होती. गुरुवारी (दि. 14) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केळवली गावाच्या शिवारात रेल्वेमार्ग ओलांडून बिबट्याने जांभरूंग गावाकडे धूम ठोकल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्याने केळवली, खरवई, जांभरूंग गावात पुन्हा …

Read More »

चिवे आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील चिवे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या दोन  विद्यार्थ्यांची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड झाली आहे. हे दोघेही डिसेंबर महिन्यात छत्तीसगड येथे होणार्‍या 65व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहेत. या निवडीमुळे चिवे आश्रमशाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वाशीम येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी …

Read More »

ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

मुंबई : प्रतिनिधी आयपीएलमधील गतविजेता संघ मुंबई इंडियन्स संघाने एक नवा खेळाडू आपल्या ताफ्यात सामील करून घेतला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याला नव्या मोसमासाठी मुंबईने आपल्या संघात समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. मागील वर्षी बोल्ट हा दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळला होता. बोल्टने 2014मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. …

Read More »

पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

हाँगकाँग : वृत्तसंस्था हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उत्तम कामगिरी करीत पी. व्ही. सिंधूने दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने 19व्या स्थानावर असलेल्या कोरिआच्या किम गा ऊन हिला 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभूत केले. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला 21-15, 21-16 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. त्याआधी सायना …

Read More »

बांगलादेशी फलंदाजांचे लोटांगण

पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात; भारत 1 बाद 86 इंदूर : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ 150 धावांत आटोपला. दरम्यान, …

Read More »

स्थानिकांचं मरण

जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी न घेता आणि सागरी किनारा नियंत्रण नियमावलीचे (सीआरझेड) उल्लंघन करून प्रभावशाली आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवर अनधिकृतपणे बंगले बांधले आहेत. त्यावर कारवाई करण्यासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाने यापुढे अलिबाग समुद्रकिनार्‍यावर एकही बेकायदा बंगला नको असे राज्य सरकारला बजावले आहे. हे चांगलेच झाले, परंतु …

Read More »