Breaking News

Monthly Archives: November 2019

निष्कलंकतेचा निर्वाळा

राफेल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी अजब मागणी देखील काँग्रेसने लावून धरली. वस्तुत: अशा चौकशीमुळे राफेल विमानाचे तंत्रज्ञान, त्यातील गोपनीय शस्त्रास्त्र सुविधा हे शत्रूच्या हातात विनासायास पडले असते. म्हणून अशाप्रकारची चौकशीची मागणी अनाठायी आहे हे कुठल्याही सामान्य बुद्धीच्या माणसासही कळेल. परंतु बालबुद्धीचे नेते आणि त्यांचे पाठिराखे यांना …

Read More »

महाडमध्ये कार अपघात; एक ठार, दोघे जण जखमी

महाड : प्रतिनिधी महाड-रायगड मार्गावर नाते खिंड येथे झालेल्या कार अपघातात एक जण ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. एका पाण्याच्या डबक्यात कार उलटून मंगळवारी रात्री 12 च्या सुमारास हा अपघात झाला. महाडमधील व्यावसायिक नितीन मणिलाल मेहता, बांधकाम व्यावसायिक योगेश कळमकर आणि महाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शैलेश सणस मंगळवारी …

Read More »

शिवसेनेचा दावा मान्य नाही!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तापेचावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली बाजू प्रथमच मांडली आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे, मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप शहा यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून …

Read More »

वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या वनिता चोरघे बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या वनिता चोरघे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चोरघे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी वाकडीचे उपसरपंच विनोद भोपी, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, कचेर पाटील, विलास चोरगे, ग्रामपंचायत …

Read More »

पनवेल, नवी मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्या वर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून नगरसेवकांकडून आतापासूनच हालचाली सुरू होणार आहेत, तर पनवेल आणि मुंबईचे महापौरपद खुल्या वर्गातील महिलांसाठी राखीव …

Read More »

शेतीसाठी बंधारे लोकप्रेरणेने बांधण्याची गरज

पोलादपूर तालुक्यातील ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा प्रकार ‘ना पाणी अडवले ना पैसे वाचविले’ अशा प्रकारे वाया गेल्याने दरवर्षी तालुक्यात ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या धर्तीवर ‘नेमेचि येते मग पाणीटंचाई’ अनुभवावी लागते. पोलादपूर तालुका कृषी विभागाकडून केंद्रशासनाच्या एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत आर्थिक उन्नतीचे प्रयत्न विविध कृषीविकास कामांद्वारे होत असून अनेक …

Read More »

ग्राहकांना चिंता नसावी

ग्राहकांना मोबाइल बिलाची भरणा करण्यात एक दिवसाचीही सवलत न देणार्‍या या कंपनीच्या सार्‍या मागण्या पाहून सर्वसामान्य ग्राहकांना आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. भारतात समन्यायी स्पर्धेला वाव राहिलेला नाही अशी आवई उठवणार्‍या व्होडाफोनचा निर्देश जिओच्या वाढत्या स्पर्धेकडे आहे. व्होडाफोन भारतातून काढता पाय घेणार अशी चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेली असताना या अफवांमध्ये …

Read More »

विवाहितेची मित्राकडून हॉटेल रूममध्ये हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय …

Read More »

सांताक्रूझमध्ये स्कायवॉकला सरकते जिने

मुंबई : प्रतिनिधी सांताक्रूझमध्ये सरकत्या जिन्यांचा स्कायवॉकचे भूमिपूजन करण्यात आले. सांताक्रूझ पूर्वेला नेहरू रोड येथे असलेला हा मुंबईतील पहिलाच सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक असेल व त्यामुळे पादचार्‍यांचा त्रास वाचणार आहे. मुंबईत अनेक ठिकाणी स्कायवॉक बांधले असले तरी ते खूप उंचावर असल्याने त्याचे जिने चढून जाणे त्रासदायक ठरते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, …

Read More »

लग्न मोडण्यासाठी नवरी मुलीनेचे पाठविले प्रियकराकरवी फोटो

चेन्नई : वृत्तसंस्था लग्न थांबवण्यासाठी नवरी मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपले फोटो नवर्‍या मुलाच्या मोबाइलवर पाठवल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले असून, पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला समज दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. नवरी मुलीच्या …

Read More »