उत्तम पाऊस झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेते-शिवारे भराला आलेली असताना अचानक अवतरलेल्या अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक पीक भुईसपाट केले. चांगल्या पावसामुळे थोडाफार सावरलेला महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला. अशा संकटकाळात सत्तेसाठी भांडण उकरून मित्रपक्षालाच सतत दूषणे देण्याचा कार्यक्रम दुर्दैवाने हाती घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेले काही दिवस साचून राहिलेले संशयाचे विषारी धुके …
Read More »Monthly Archives: November 2019
केपीएल मॅच फिक्सिंगप्रकरणी आणखी दोन खेळाडूंना अटक
बंगळुरू : वृत्तसंस्था कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल)दरम्यान पैसे घेऊन सामना निश्चिती (मॅच फिक्स) केल्याप्रकरणी कर्नाटकचा प्रथम श्रेणी क्रिकेटपटू सी. एम. गौतम आणि माजी खेळाडू अबरार काझी यांना अटक करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये तीन मॅच खेळणारा, तसेच बेलारी टस्कर्स टीमचा कॅप्टन गौतम याच्यासह काझीला कर्नाटकच्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक …
Read More »कामोठ्यात मॅरेथॉन; ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा देणार संदेश
पनवेल : बातमीदार सामाजिक विषय घेऊन मागील चार वर्षांपासून कामोठ्यातील अट्रास्टिक फाऊंडेशनच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदा ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश घेऊन कामोठ्यात मॅरेथॉन होणार आहे. 15 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून वेगवेगळ्या गटांत 3, 5 आणि 10 किलोमीटर अंतरासाठी दौड लगावली जाणार आहे. पनवेल महापालिका, रामशेठ …
Read More »अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेस उत्तम प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा …
Read More »‘हिटमॅन’ बरसला, भारत जिंकला!
दुसर्या टी-20 सामन्यात बांगलादेशवर मात राजकोट : वृत्तसंस्था पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या रोहित शर्माच्या भारतीय संघाने दुसर्या सामन्यात दमदार पुनरागमन केले. बांगलादेशने विजयासाठी दिलेले 154 धावांचे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. कर्णधार रोहितने 85 धावांची खेळी करीत विजयात मोलाचा …
Read More »राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांचा संयुक्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 19वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात …
Read More »पेण फेस्टिवलचे शानदार उद्घाटन
स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत -आमदार प्रशांत ठाकूर पेण : प्रतिनिधी पेण फेस्टिवल गेली 12 वर्षे गाजत असून, लोकप्रिय होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. हा जिल्ह्याचा उत्सव ठरून येथील स्थानिक कलावंत देशपातळीवर चमकावेत, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते पेण फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात …
Read More »फडणवीस यांच्या नेतृत्वातच महायुतीचे सरकार बनेल
नितीन गडकरी यांचा विश्वास नागपूर : प्रतिनिधी राज्यात सुरू झालेला राजकीय पेच लवकरच सुटणार असून, तशी चर्चा शिवसेनेशी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यातील सरकार बनेल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. महायुतीला जनादेश मिळाल्यामुळे भाजप-शिवसेना लवकरच सरकार …
Read More »सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भुयारी मार्ग आणि रस्त्याची पाहणी
नवीन पनवेल, तळोजात दौरा; नागरिकांना सेवा देण्याचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पोदीमार्गे पनवेलकडे जाण्यासाठी सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामाची सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको व रेल्वे अधिकार्यांसह गुरुवारी (दि. 7) संयुक्त पाहणी केली. या वेळी त्यांनी हा मार्ग लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. नवीन …
Read More »तिहेरी हत्याकांडाने माणगाव हादरले; दोन मुलांसह पत्नीची हत्या
माणगाव : प्रतिनिधी घरगुती भांडणावरून एका क्रूर माणसाने आपल्या दोन लहान मुलांसह पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. 7) माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली. या तिहेरी हत्याकांडामुळे माणगाव तालुका हादरला आहे. हत्याकांडाचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष देवजी शिंदे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper