Breaking News

Monthly Archives: December 2019

सिडकोमध्ये नागरिकांना आता पास, मजल्यानुसार मिळणार प्रवेश; येत्या सोमवारपासून अंमलबजावणी

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको भवनमध्ये नागरिकांना प्रवेशासाठी आता प्रत्येक मजल्यानुसार विशिष्ट रंगाच्या पासवरच प्रवेश मिळणार आहे. नागरिकांना ज्या मजल्यावर काम आहे त्या मजल्याच्या विशिष्ट रंगाचा पास सुरक्षा विभागाकडून दिला जाणार आहेत. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली यांच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.16) 2019 निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांना …

Read More »

मावरीक इव्हेंटमध्ये कर्जतचे विद्यार्थी अव्वल

कर्जत : बातमीदार महात्मा एज्युकेशन ट्रस्टच्या रसायनी येथील पिल्ले विद्यालयाच्या विद्या संकुलात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मावरीक इव्हेंटमध्ये रायगड जिल्ह्यातील शंभरहून अधिक माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर केल्या होत्या. त्यात कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलने पहिला क्रमांक पटकावला. कर्जत इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी भार्गव घोडविंदे, सिद्धी बडेकर आणि दर्शन …

Read More »

खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर ठरल्या ‘मिसेस महाराष्ट्र’

खोपोली : प्रतिनिधी दिवा पॅजन्टच्या वतीने घेण्यात आलेल्या मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 या स्पर्धेत खोपोलीच्या स्नेहल जोगळेकर यांनी मिसेस कॉन्फिडन्ट व मिसेस महाराष्ट्र हे मानाचे किताब पटकावले. दिवा पॅजन्ट संस्थेतर्फे 5  ते 8 डिसेंबर या कालावधीत ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस 2019 ही स्पर्धा घेण्यात आली. संपूर्ण …

Read More »

तासगाव नदीवर श्रमदानातून बंधारा

माणगाव गटविकास अधिकार्‍यांच्या हस्ते जलपूजन माणगाव : प्रतिनिधी पंचायत समिती माणगाव व ग्रुप ग्रामपंचायत भागाड यांच्या संयुक्त विद्यमाने तासगाव येथील नदीवर श्रमदानातून बंधारा उभारण्यात आला असून, गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांच्या हस्ते जलपूजनही करण्यात आले. माणगाव तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन गटविकास अधिकार्‍यांनी केले आहे. तालुक्यातील भागाड …

Read More »

कबड्डी संघांची भाईगिरी ठेचा!

रायगड जिल्हा म्हणजे कबड्डीचे माहेरघर समजले जाते. येथे कबड्डीच्या जेवढ्या स्पर्धा होतात तेवढ्या स्पर्धा अन्य जिल्ह्यात होत नाहीत, परंतु याच जिल्ह्यात कबड्डी स्पर्धेत जेवढ्या भानगडी होतात तेवढ्या भानगडी इतर कोणत्याही जिल्ह्यात होत नाहीत. रायगड जिल्ह्यातील कबड्डीला भानगडींचा शाप आहे. याला जबाबदार जेवढे खेळाडू आहेत तेव्हढीच रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनदेखील याला …

Read More »

उचलली जीभ…!

नुकत्याच घडलेल्या हैदराबाद येथील एका डॉक्टर युवतीच्या बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर हे विधान त्यांनी करायला नको होते. बलात्काराच्या घटनांमुळे देशातील जनता आधीच हळवी झाली आहे. सोशल मीडियापासून अन्य अनेक माध्यमांपर्यंत सर्वच स्तरांवर बलात्काराच्या घटनांबद्दल असंतोष व्यक्त होत असताना सुज्ञ पुढार्‍यांनी सांत्वनाचा सूर लावणे अपेक्षित असते, परंतु या सुज्ञपणाची अपेक्षा कुठल्याही …

Read More »

थाय बॉक्सिंगमध्येे पनवेलच्या खेळाडूंचे यश

पनवेल : वार्ताहर शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या 14व्या महाराष्ट्र राज्य कॅडेट ज्युनियर आणि सीनिअर थाय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत पनवेल शहर थाय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या कामोठे व खांदा कॉलनी शाखेच्या खेळाडूंनी सहभाग घेत प्राविण्य मिळवले. विजेत्या खेळाडूंची मध्य प्रदेश येथे होणार्‍या राष्ट्रीय थाय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली …

Read More »

332 खेळाडूंवर लागणार बोली

स्टेन, मॅक्सवेल, उथप्पा, मॅथ्यूजचा समावेश मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2020च्या हंगामासाठी 19 डिसेंबरला कोलकाता येथे लिलाव प्रक्रिया होणार आहे. या लिलावासाठी एकूण 971 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून 332 खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या 332 खेळाडूंच्या नावाची यादी आठही संघांच्या …

Read More »

जागतिक मानांकनात स्वस्तिका घोषचा ‘षटकार’

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची टेबल टेनिसपटू सहाव्या क्रमांकावर पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने पुन्हा एकदा सुवर्णयश कामगिरी करीत ज्युनिअर गटातील जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे हा बहुमान मिळविणारी भारतातील ती पहिली टेबल टेनिसपटू …

Read More »

प्रकाश रायकर म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी

म्हसळा : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका अध्यक्षपदी प्रकाश गोपाळ रायकर यांची जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड झाली आहे. ग्रामीण भागातील उपक्रमशील युवक म्हणून रायकर यांची ओळख आहे. या पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मनोज भागवत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या वेळी महेश पाटील, तुकाराम पाटील, …

Read More »