Breaking News

Monthly Archives: December 2019

नेरळचे उपसरपंच शंकर घोडविंदे यांचा सत्कार

कर्जत : नेरळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर निवडून आल्याबद्दल शंकर घोडविंदे यांचा कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपसरपंच शंकर घोडविंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष प्रवीण …

Read More »

बोगद्यातील काँक्रीट कोसळले; महामार्गावर अपघात टळला

खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पूणे द्रूतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याच्या आतील क्राँकीट केलेला मोठा भाग सोमवारी (दि. 9) रात्री  बाजूपट्टीवर कोसळला. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन तडाख्यात न सापडल्याने जिवित हानी टळली. सोमवारी रात्री मुंबई मार्गिकेमध्ये आडोशी बोगद्याच्या आतील क्राँक्रीटचा थर दिलेला मोठा  भाग कोसळला. मोठ मोठे तुकड मार्गिकेच्या बाजूपट्टीवर तसेच …

Read More »

पेणच्या प्रश्नांसंदर्भात संयुक्त बैठक, आमदार रविशेठ पाटील यांनी केले मार्गदर्शन

पेण : प्रतिनिधी निवडून आल्यानंतर आमदार रवीशेठ पाटील पेण तालुक्यातील प्रत्येक विभागातील समस्या जाणून घेत असून, शासकीय अधिकार्‍यांसोबत बैठका घेवून त्या नागरी समस्या मार्गी लावण्याचा धडाका त्यांनी सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने पाणी, खारलॅन्डचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी रविशेठ पाटील यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे. पेण तालुक्यातील पाणीपुरवठा, खारभूमी, …

Read More »

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणीबाणी

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.   शहरातील अनेक भागात पाणी जात नसल्याने तेथील नळ कोरडे ठाक पडले आहेत. या बाबत युवराज रेसिडेन्सीमधील नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदनदेखील दिले आहे.  सुमारे 36 हजार लोकसंख्येला पुरेल या दृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे 1998मध्ये नेरळ ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नळपाणी योजना कार्यान्वीत केली …

Read More »

हुतात्मा स्मारक परिसराच्या सुशोभीकरणास सुरुवात

कर्जत : बातमीदार हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मानिवली या गावात   शासनाने बांधलेल्या हुतात्मा स्मारकाचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मारक परिसराचे सुशोभीकरण केले जात असून नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे येत्या 2 जानेवारी रोजी लोकार्पण केले जाणार आहे. क्रांतिकारक गोमाजी पाटील यांचे सुपुत्र हिराजी हे …

Read More »

चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान

रेवदंडा : प्रतिनिधी  अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्तात्रयांचे स्वयंभू देवस्थान संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील दत्त जयंतीपासून पाच दिवस चालणार्‍या यात्रेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, पुणे, ठाणे आदी ठिकाणाहून सुमारे तीन लाख भाविक येतात. अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठी व वर्षातील शेवटची यात्रा दत्त जयंतीला उत्साहात साजरी होते. चौल …

Read More »

शेडवली रस्ता बनला धोकादायक, खड्ड्यामुळे नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीमधील शेडवली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उखडून  मोठमोठे  खड्डे पडले आहेत. त्यामुळे संपूर्ण रस्ता धोकादायक झाला  असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. रस्त्यांवर मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली परिसर विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना विविध नागरी …

Read More »

जागरण- गोंधळ आंदोलन, विविध मागण्यांसाठी माणकुले परिसरातील ग्रामस्थ झाले आक्रमक

अलिबाग : प्रतिनिधी माणकुले- शिरवली रस्त्याचे तसेच पेयजल योजनेचे काम सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी माणकुले परिसारातील ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. 10) जिल्हाधिकरी कार्यालयासमोर जागरण-गोंधळ आंदोलन केले. अलिबाग तालुक्यातील माणकुले – शिरवली रस्त्याच्या कामाची निविदा 4 जानेवारी 2107 रोजी काढण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत सार्वजनिक …

Read More »

समाजोपयोगी उपक्रमांनी वाढदिवस साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण मढवी यांनी आपला मुलगा वरद याचा पाचवा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. समाजाचे आपण देणेकरी लागतो या भावनेने आणि समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून किरण मढवी यांनी उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवी, नववी …

Read More »

‘यूईएस’मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव

उरण : वार्ताहर यूईएस स्कूल, ज्युनिअर अ‍ॅण्ड सीनिअर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात साजरा झाला. या वेळी विद्यार्थ्यांचे क्रीडागुण पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. त्यांनी तसेच प्रमुख पाहुणे व उपस्थितांनी खेळगुणांना भरभरून दाद दिली. क्रीडा महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दामगुडे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष तनसुख …

Read More »