Breaking News

Monthly Archives: December 2019

म्हसळ्यात 60 ते 80 रुपयांत मिळतोय कांदा

म्हसळा : प्रतिनिधी कांद्याच्या चढ्या दरामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. महागड्या दरातील कांदे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याची नामी शक्कल रहिमतपूर (सातारा) येथील टेम्पोवाला बंड्याने आखली आणि त्याचा फायदा म्हसळ्यातील गोरगरीब लोकांना होत आहे. घाऊक बाजारात कांद्याचा भाव प्रचंड वाढल्याने म्हसळा शहरातही कांद्याचे भाव 100 ते 120 रुपयांपर्यंत गेले. …

Read More »

महाडमध्ये मटका अड्ड्यावर छापा; मुद्देमालासह एक अटकेत

महाड : प्रतिनिधी महाड शहरासह परिसरातील गावांमध्ये मटका आणि इतर धंदे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. काही तथाकथित पत्रकार या अवैध धंद्यांना अभय मिळावे म्हणून प्रयत्न करीत असल्याची चर्चा असतानाच शनिवारी (दि. 7) महाड शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एक मटका अड्ड्यावर छापा मारून एकाला मुद्देमालासह अटक केली आहे. महाड तालुक्यात …

Read More »

देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड नाही : पंतप्रधान मोदी

पुणे : प्रतिनिधी सीमेपलीकडील शत्रूंकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण असून, त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण आणि छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते रविवारी …

Read More »

हे स्थगिती सरकार : नारायण राणे

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रशासनातील काहीच कळत नाही. त्यांनी विकासकामांना स्थगिती देऊन विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे जनतेचे सरकार नसून स्थगिती सरकार आहे, असा हल्लाबोल करतानाच राज्याला पोषक नसलेले तीन पक्षांचे पाहुणे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे …

Read More »

दिल्लीत अग्नितांडव, अनाज मंडी परिसरात 43 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत अनाज मंडीत परिसरातील कारखान्यामध्ये लागलेल्या भीषण आगीत होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 8) पहाटे घडली. या आगीत अनेक जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनाज मंडीतील एका इमारतीमध्ये असलेल्या फॅक्टरीला पहाटे 5.20च्या …

Read More »

अलिबाग समुद्रकिनारा चकाचक

अलिबाग : केंद्र  सरकारच्या आवाहनानुसार स्वच्छता पंधरवडाअंतर्गत 1 ते 15 डिसेंबर या कालावधीत ’प्लॉगिंग’ (डस्टिंग वेस्ट कलेक्शन) प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात  अलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयाच्या एनसीसी आणि एनएसएस युनिटतर्फे शनिवारी (दि. 7) अलिबाग समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला. या समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल …

Read More »

बास्केटबॉलपटू सतनाम निलंबित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा पहिला बास्केटबॉलपटू हा बहुमान मिळवणारा सतनाम सिंग भामरा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. त्यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधात्मक संस्थेतर्फे (नाडा) त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान …

Read More »

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा भारताचे पदकांचे द्विशतक

काठमांडू : वृत्तसंस्था भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडला आहे. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर भारताने सहाव्या दिवशी ही किमया साधली. कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान (पुरुष 97 किलो फ्री स्टाइल), सुमित मलिक (पुरुष 125 किलो …

Read More »

रायगडमधून दिसणार खंडग्रास सूर्यग्रहण; सन्डे सायन्स देणार चश्मे

अलिबाग ः प्रतिनिधी चंद्रग्रहण, सूर्यग्रहणाच्या बाबतीत असणार्‍या गैरसमजुती आता बर्‍यापैकी कमी झाल्या आहेत. याचमुळे ग्रहण कसे असते याबद्दल पालकांबरोबरच विद्यार्थ्यांमध्येही कुतूहल वाढत आहे. येत्या 26 डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होत असून तब्बल एका दशकानंतर भारतातून सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, संडे सायन्सतर्फे सुरक्षितपणे सूर्यग्रहण पाहता यावे यासाठी खास चष्मे …

Read More »

नोकरीच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक

तोतया अधिकारी चार महिन्यांपासून फरार कर्जत ः प्रतिनिधी आपण मंत्रालयात गृहविभागात अव्वल सचिव आहोत, असे भासवून अनेकांची फसवणूक करण्याची घटना घडली आहे. तोतया अधिकार्‍याने सरकारी नोकरी लावण्यासाठी तसेच बदली करण्यासाठी व विकासकामांना निधी मंजूर करण्यासाठी लाखो रुपये लांबविले आहेत. दरम्यान, तोतया अधिकारी आपले पितळ उघडे पडल्याने चार महिन्यांपासून फरार आहे, …

Read More »