Breaking News

Monthly Archives: December 2019

वाळूमाफियांमुळे पालीत पाणीटंचाईचे संकट

पाली : प्रतिनिधी अंबा नदीतून पाली (ता. सुधागड) शहराला पाणी पुरवठा होतो. नदीतील पाणी साठून रहावे, यासाठी पाली ग्रामपंचायती मार्फत नदीमध्ये बांध घालण्यात आला आहे.  मात्र वाळू माफियांनी हा बांध अक्षरशः तोडून टाकला आहे. परिणामी नदीचे पाणी कमालीचे घटले असून, पालीतील नागरिकांसमोर पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सुधागड तालुक्यातील …

Read More »

संस्कारधाम विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील खरवली  बिरवाडी येथील संस्कारधाम विद्यालयातील मराठी माध्यमाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस  सुरूवात झाली आहे. या स्पर्धांचे उद्घाटन कबड्डीपटू गणेश पाटील यांच्या उपस्थितीत झाले. शिस्त, जिद्द, आणि चिकाटी हे खेळाचे अविभाज्य अंग असल्याचे गणेश पाटील यांनी या वेळी सांगितले. क्रीडा शिक्षक सकपाळ यांनी या वेळी स्पर्धकांना क्रीडा शपथ …

Read More »

कळंबोलीत वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

पनवेल : बातमीदार कळंबोली पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणार्‍या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवून 29 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना कारवाई करण्यास विरोध करणार्‍या दोन वाहनचालकांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. कळंबोली परिसरातील रस्त्यांवर अनेक ट्रेलर, ट्रकचालक आपली वाहने बेकायदा …

Read More »

दिव्यांग बांधवांचे बेमुदत साखळी उपोषण स्थगित

उरण ः वार्ताहर तालुक्यातील दिव्यांगांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी(दि. 3) अपंग दिनानिमित्ताने तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण केले होते. अखेर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे  गुरुवारी (दि. 5) उपोषण पंधरा दिवसाकरिता स्थगित केले आहे. उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी लिंबूपाणी पाजून बेमुदत साखळी उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्यांच्या पुढील मागण्या …

Read More »

तळोजा येथे ओला चालकास लुटले

पनवेल : रामप्रहर वृत्त एका ओला चालकास चौकडीने लुटल्याची घटना घडली असून यातील तिघांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख (22), गौतम पाटील (19) आणि युसूफ शेख (22) असे या तीन आरोपींची नावे आहेत. ओला चालक रियाज शेख यांना तळोजा येथील भाडे मिळाले. चार प्रवासी घेेवून रियाज शेख तळोजा …

Read More »

पनवेल महापालिका विकसित करणार महिला सुरक्षेसाठी अद्ययावत अॅप

आयुक्त गणेश देशमुख यांचे शिष्टमंडळाला आश्वासन पनवेल ः प्रतिनिधी महिला सुरक्षेसाठी पनवेल महापालिका एक अद्ययावत अ‍ॅप विकसित करणार असल्याचे आश्वासन आयुक्त गणेश देशमुख यांनी खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले. महिलांवर होणारे अत्याचार आणि प्राणघातक हल्ल्यांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. निर्भया आणि डॉ. प्रियांका रेड्डी यांच्याबाबत झालेल्या दुर्घटनेनंतर …

Read More »

एम. डी. डेंन्सिस्ट्री क्लिनिकचे उद्घाटन

पनवेल ः शहरातील साईनगर येथे नव्याने एम. डी. डेंन्सिस्ट्री हे डेंटल क्लिनिक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी डेंटलच्या मालक डॉ. मनाली देवळे यांचे  उपस्थित सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीकरिता सदीच्छा व्यक्त केल्या. …

Read More »

ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी जे. डी. तांडेल

पनवेल ः वार्ताहर लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्थापन केलेल्या पनवेल येथील हुतात्मा हिराजी पाटील ग्रंथालयांच्या अध्यक्षपदी जे. डी. तांडेल यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या संस्थेची 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या सभागहात शुक्रवारी झाली. ग्रंथालयाचे अध्यक्ष अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस मोठया …

Read More »

डायबिटीज शिबिरानिमित्त पनवेलमध्ये पत्रकार परिषद

पनवेल ः वार्ताहर पनवेल महापालिका व ब्रह्माकुमारीजतर्फे फडके नाट्यगृहामध्ये 7 व 8 डिसेंबरला मोफत डायबिटीज मार्गदर्शन शिबिर होणार आहे, या निमित्ताने पनवेलच्या हुतात्मा स्मारक गार्डन येथे गुरुवारी (दि. 5) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पनवेलमधील नामांकित पत्रकारांनी उपस्थित राहून सहकार्य केले. तसेच शिबीराची माहिती तारादीदी व डॉ. …

Read More »

डेरवलीत श्री दत्तजयंती उत्सव

पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील डेरवली या गावात बुधवारी (दि. 11) श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा दुपारी 12 वाजता आयोजित केली आहे. उत्सवातील कार्यक्रमांची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे. दुपारी 2 ते 4 वाजता सेवासूर्य किसन महाराज हरिपाठ मंडळ कळंबोली, ओवळा गायिका कविता वाघ, जिजा …

Read More »