विद्यालयाच्या प्रकल्पाचा प्रथम क्रमांक पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी माध्यम विद्यालयाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यामुळे विद्यालयाच्या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे वांवजे येथील श्री छत्रपती शिवाजी …
Read More »Monthly Archives: December 2019
रायगड पोलीस दल उपविजेते
अलिबाग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग येथे झालेल्या 46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलातील खेळाडूंनी 87 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत रायगड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्पर्धेत रायगडचे पुरुष 75, महिला 21 असे एकूण 96 स्पर्धक सहभागी झाले होते. रायगडने वैयक्तिक 43 सुवर्ण, …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज हायकल गेट बंद आंदोलन
पनवेल : किरकोळ कारणावरून चुकीच्या पद्धतीने कामावरून निलंबित करण्यात आलेल्या कामगारांच्या हक्कासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 5) सकाळी 9 वाजता हायकल कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या हायकल कंपनीने क्षुल्लक कारणावरून चार स्थानिक कामगारांना निलंबित केले आहे. या कामगारांना पुन्हा कामावर …
Read More »कुर्ल्यात चिमुरडीवर बलात्कार
मुंबई : प्रतिनिधी हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे सर्वत्र संतापाचे वातावरण असताना देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कुर्ला येथे एका चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. कुर्ला पश्चिमेकडे एका दुकानदाराने चॉकलेट …
Read More »गृहनिर्माण योजना सोडतीतील सदनिकांचे सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वाटप
नवी मुुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाच्या परवडणार्या 9,249 घरांची योजनेची सोडत दि. 26 नोव्हेंबर रोजी नेरुळच्या आगरी-कोळी संस्कृती भवन येथे काढण्यात आली होती. सदर गृहनिर्माण योजनेतील शिल्लक राहिलेली 991 घरे (सदनिका) प्रतीक्षा यादीतील सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला …
Read More »सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग’चे प्रकाशन
मुंबई ः प्रतिनिधी मुंबईच्या दादर येथील कोकण मराठी साहित्य परिषद, मराठी ग्रंथसंग्रहालय आणि ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हे प्रकाशन पद्मश्री व ज्येष्ठ साहित्यिक आणि कोमसापचे संस्थापक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते व कोमसाप कार्याध्यक्ष नमिता कीर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, मुंबई …
Read More »जलशक्ती अभियानातून जिल्ह्यात 22 ग्रामपंचायतींत जलस्तोत्रे बळकट
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फौंडेशन (एमव्हिएसटीएफ) आणि युनिसेफ इंडिया यांनी भारत सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत जल शक्ती अभियानातून रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 22 ग्रामपंचायतीमधील 58 महसूली गावांमध्ये 46 बांधकामे करुन जलस्तोत्रे बळकट केली. केंद्र सरकारने स्वच्छ भारत मिशन पाठोपाठ जल जीवन मिशन हा 2024 पर्यंत ग्रामीण …
Read More »अपघातग्रस्तांना मदत करणार्या ग्रुपचे सामाजिक भान, बसचालकाची एक लाखाची रक्कम केली सुपूर्द
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मंगळवारी (दि. 3) प्रवासी बसचा अपघात झाला. या वेळी खोपोली पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या बसचालकाने एक लाख रुपये ड्रायव्हर सीटखाली ठेवल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांना दिली. त्यांनी ती रक्कम बस मालकाकडे सुपूर्द केली. खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या …
Read More »उरण येथून दिंडीचे शिर्डीकडे प्रस्थान
उरण ः वार्ताहर उरण येथून सोमवारी (दि. 2) सकाळी 9 वाजता श्रींची आरती करून श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान झाले असून श्रींची पालखी मंगळवारी (दि. 10) सकाळी 10 वाजता श्रीक्षेत्र पुण्यधाम शिर्डी येथे पोहचणार आहे या वेळी पालखी उरण शहरातून निघाल्यावर पालखी दिंडीचे जागोजागी स्वागत झाले. या सोहळ्याला बाबांच्या पालखी व …
Read More »आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या!, मराठा आरक्षणासंबंधी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई ः वार्ताहर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच निर्णयात आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यापाठोपाठ नाणार प्रकल्प आंदोलनातीलही गुन्हे मागे घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हेही मागे घेण्यात यावेत, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सोबतच कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासाहित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper