पनवेल ः प्रतिनिधी पनवेल, नवीन पनवेल येथे पनवेल महानगरपालिका व ब्रह्माकुमारीजमार्फत मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 7 व 8 डिसेंबर रोजी हे शिबिर होणार आहे. 30 ते 60 वर्षे वयातील स्त्री पुरुषांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन …
Read More »Monthly Archives: December 2019
पनवेलकरांचे आठ तास विजेविना हाल!
पनवेल ः बातमीदार पनवेल शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले नवे गॅस इन्सुलेटेड उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रामधून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरणने प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी उपकेंद्राचे काम करण्यासाठी पनवेल शहरातील वीजग्राहकांना तब्बल आठ तास विजेविना काढावे लागले. त्यामुळे पनवेलकरांची प्रचंड गैरसोय …
Read More »उलवे येथे सुरक्षारक्षकाकडून कंत्राटदाराची हत्या; आरोपीस अटक
पनवेल ः बातमीदार उलवे येथील सेक्टर 25 मध्ये एका सुरक्षारक्षकाने कंत्राटदाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. खगेंद्र बहादूर असे या सुरक्षारक्षकाचे नाव असून एनआरआय पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुनेश्वरकुमार उर्फ मनीष राम बाबू (30) हा सेंट्रिंगच्या कामाचे कंत्राट घेऊन कामगारांच्या माध्यमातून काम करवून घेत होता. मुनेश्वर याला उलवे …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने पनवेलमध्ये अभिवादन कार्यक्रम
पनवेल ः वार्ताहर विचुंबे येथील बौध्दवाडा येथे भारतीय जनता पक्ष व भीमगर्जना मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये गुरुवारी (दि. 5) रात्री 10 वाजता बौध्दाचार्य हिरामण गुरुजींचा पूजापाठ, मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलन होणार आहे. या वेळी …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयात अनावरण
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सोमवारी (दि. 2) थोर निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पाटील यांनी केले. मंदार पाटील यांनी प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल माहिती दिली. जितेंद्र पाटील यांनी बैठकीतील संत शिकवणीचे महत्त्व सांगितले. सरपंच विकास पाटील, ग्रामस्थ सुरेश म्हात्रे …
Read More »नियोजित विमानतळ परिसरातील शाळा जमीनदोस्त
पनवेल ः बातमीदार नवी मुंबई विमानतळासाठी सिडकोने आता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी कोंबडभुजे गावातील शाळा पाडण्यात आली असून बुधवारी उलवेमधील शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. विमानतळासाठी लागणारी 70 टक्के जागा सिडकोला सहजपणे मिळाली. मात्र उरलेल्या 30 टक्के जागेसाठी सिडकोला मोठा संघर्ष करावा लागला. या …
Read More »खोपोलीत स्वच्छता अभियान कामाची पाहणी
खोपोली : प्रतिनिधी नगर परिषदेकडून खोपोली शहरात स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत जोरदार मोहीम सुरू आहे. यात प्लास्टिक बंदी मोहीम राबविणे, कचरा विलीनीकरण, कचरा संकलन व त्याचे वर्गवारीनुसार निस्तारण आदी कामे सुरू आहेत. या कामांची प्रगती व नागरिकांच्या अडचणी व तक्रारी यांचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे. दरम्यान, एखाद्या रहिवासी भागात …
Read More »म्हसळ्यात जागतिक दिव्यांग दिन साजरा
म्हसळा : प्रतिनिधी जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने मंगळवारी (दि. 3) म्हसळे नं 1 शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी रॅलीत घोषणा देऊन समाजामध्ये जनजागृती केली. दिव्यांगांबद्दल सहानुभूती नव्हे तर विश्वास दाखवा, असे मत म्हसळा गटसाधन केंद्राचे विशेष तज्ज्ञ उमेश गोराडे यांनी या वेळी व्यक्त केले. जागतिक दिव्यांग दिन रॅलीमध्ये म्हसळा प्राथमिक …
Read More »भिवपुरी रोड स्टेशनमधील पादचारी पूल खुला न केल्याने प्रवाशांचा रूळावरून प्रवास
कर्जत : बातमीदार भिवपुरी रोड या रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेने उभारलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र तो पूल प्रवाशांसाठी खुला केला नसल्याने प्रवासी रेल्वेमार्ग ओलांडून जात असून ते धोकादायक बनले आहे. त्यामुळे हा पादचारी पूल तत्काळ खुला करावा आणि येथील रेल्वेमार्गाच्या बाजूने कठडे उभे करावेत, अशी मागणी प्रवासी …
Read More »तळोजा येथे ओला चालकास लुटले; तिघे जण गजाआड
पनवेल ः वार्ताहर एका ओला चालकास चौकडीने लुटल्याची घटना घडली असून यातील तिघांना तळोजा पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद शेख (22), गौतम पाटील (19) आणि युसूफ शेख (22) अशी या तीन आरोपींची नावे आहेत. ओला चालक रियाज शेख यांना तळोजा येथील भाडे मिळाले. चार प्रवासी घेेऊन रियाज शेख तळोजा येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper