Breaking News

Monthly Archives: December 2019

पनवेल तालुक्यात डेंग्यूचे थैमान, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

पनवेल तालुक्यात डेंग्यूचे थैमान, आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन पनवेल ः बातमीदार पनवेल तालुक्यात नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचे 17 रुग्ण  आढळले असून महापालिका हद्दीतदेखील संशयितांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रभावामुळेे परिसरात घबराट पसरली आहे. तर उरणमध्ये 9 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, …

Read More »

पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांचे भवितव्य अंधारातच

पोलादपूर तालुक्यात अनेक नॉनबँकिंग सेव्हींग्ज, फायनान्स संस्थांनी गेल्या दशकात पोलादपूरकरांची आर्थिक लूट करून गाशा गुंडाळला असताना स्थानिक पतसंस्थांनीही ठेवीदारांची अतोनात लूट केल्याच्या घटना झाल्या. या पतसंस्था व नॉनबँकिंग संस्थांविरोधातील ठेवीदार व स्वल्पबचतदारांचा दबलेला सूर संबंधित पतसंस्था संचालकांच्या राजकीय हितसंबंधांमुळे तसेच वेळोवेळी पैसा परत देण्याच्या भूलथापांमुळे सरकारपर्यंत पोहचलाच नाही. हजारो ठेवीदारांच्या …

Read More »

अनुशेष भरायला हवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभीपासूनच दिव्यांगांसाठी पुढाकार घेऊन अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यात विविध स्वरुपाच्या करसवलती, बँकांकडून कर्ज घेताना कमी व्याज दर, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये स्कॉलरशिप आदींचा समावेश आहे. परंतु नोकर्‍यांच्या बाबतीत पाहिले तर आजही अपंग व्यक्ती आणि सर्वसाधारण व्यक्ती यांना उपलब्ध असणार्‍या संधींमध्ये मोठी तफावत आढळते. आजच्या घडीला जगाची …

Read More »

एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठांचे हाल, सर्व्हर सतत बंद असल्याने अनेक तास राहावे लागते रांगेत उभे

पनवेल  ः प्रतिनिधी ट्रायमॅक्स कंपनीचा सर्व्हर सतत बंद पडत असल्याने एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांचे रांगेत उभे राहून हाल होत आहेत. एसटी महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी चार हजार किमी मोफत प्रवासाची योजना जाहीर केली. त्यासाठी स्मार्ट कार्ड घेणे आवश्यक आहे. हे कार्ड घेण्यासाठी आगारात लांबच लांब रांगा लागत आहेत, पण त्यासाठी …

Read More »

नागोठणे येथील विद्यालयात एड्स जनजागृती कार्यक्रम

नागोठणे : प्रतिनिधी जागतिक एड्स निर्मूलन दिनाचे औचित्य साधून रिलायन्स कंपनीचा सीएसआर विभाग, भाएसोचे फार्मसी महाविद्यालय आणि इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील फार्मसी महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) दुपारी एड्स जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्याचे उद्घाटन नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाचे डॉ. भरत अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. रिलायन्स रुग्णालयाचे …

Read More »

पाली पोटल कालव्याची दुरुस्ती कधी पूर्ण होणार?

कडाव : प्रतिनिधी राजनाला कालवा हा कर्जत तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी  वरदान ठरला आहे. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आल्यामुळे राजनाला कालव्याच्या परिसरातील शेतकरी भाताचे दुबार पीक घेतात, मात्र मागील चार-पाच वर्षांपूर्वी या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या कामातील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या कालव्याला …

Read More »

दुचाकीची रुग्णवाहिकेला धडक; हेदवलीजवळ अपघातात एक जखमी

सुधागड : रामप्रहर वृत्त  पाली-खोपोली राज्य महामार्गावरील हेदवली गावानजीक असलेल्या टॉपर कंपनीजवळ मंगळवारी (दि. 3)संध्याकाळी रुग्णवाहिका आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णवाहिका (एमएच-04, जीपी-504) पालीकडून खोपोलीच्या दिशेने जात होती, तर दशरथ दत्तू पवार …

Read More »

मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी फरार रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोळी येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून आरोपी मुख्याध्यापक फरार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुडकोळी येथील हायस्कूलचे मुख्याध्यापक सुदाम हाशा वाघमारे यांनी 22 नोव्हेंबर रोजी दुपारी …

Read More »

पेब किल्ल्यावरून घसरून ट्रेकर दरीत

सात तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाले जीवदान; सह्याद्री रेस्क्यू टीमची कामगिरी कर्जत : बातमीदार विकटगड (पेब) हा किल्ला सह्याद्रीच्या माथ्यावर वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर भ्रमंतीला ट्रेकर्सची कायम पसंती असते. मंगळवारी पुण्याहून पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या ग्रुपमधील एका तरुणाचा पाय घसरून तो सुमारे 350 फूट खोल दरीत घरंगळत गेला, मात्र सह्याद्री रेस्क्यू …

Read More »

रायगड वाहतूक पोलीस दलाला मिळाले बळ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड पोलीस दलात चार इंटर सेफ्टर व्हेईकल दाखल झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर अतिवेगाने वाहन चालविणार्‍या बेजबाबदार चालकांना आता स्पीड गनच्या कॅमेरात टिपले जाणार आहे, तसेच वाहनाच्या मालकाकडून दंड वसूल केला जाईल. महामार्गावरील सुसाट वाहन चालविणार्‍यावर पोलिसांचे लक्ष राहावे यासाठी राज्य सरकारने राज्यात 92 …

Read More »